सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.10३

फेटाळलेल्या न. प. विशेष सभेत ‘सत्यशोधक कां-ख्रिस्त-सेवक’ या ‘संग्राम’कार नलावडे यांच्या फुले बदनामीच्या पुस्तिकेचे न. प. सदस्यांना वितरण करण्यात आले. हा ठराव फेटाळल्यावर ग. म. नलावडे यांनी ‘जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचा बोजवारा’ या शीर्षकाची फुले यांची बदनामी करणारी आणखी एक पुस्तिका प्रकाशित केली. दरम्यान, विदर्भात अमरावती येथे याच १९२५ सालात अ.भा. ब्राह्मणेतर पक्षाच्या वतीने चार परिषदांचे एकत्र आयोजन करण्यात आले होते. या परिषदांनाही पुणेकर सनातन्यांनी खोडा घातला. तसेच ११ नोव्हेंबर १९१७ रोजी लोकमान्य टिळकांनी ‘अथणी’च्या जाहीर सभेत बहुजन समाजाचा राजकीयदृष्ट्या उपमर्द केला!
अशा प्रसंगी आता अति झाले म्हणून सनातन्यांना ठोशास ठोसा म्हणून दिनकरराव जवळकरांनी लेखणी उचलली आणि ५२ पृष्ठांचे ‘देशाचे दुश्मन’ पुस्तक पुणे येथील मजूर प्रेसमधून २५ जुलै १९२५ रोजी प्रसिद्ध केले. या ग्रंथाचे मुद्रक ‘मजूर’कार रामचंद्र नारायण लाड असून सत्यशोधक अॅड. केशवराव बागडे आणि केशवराव जेधे या दोघांच्या स्वतंत्र प्रस्तावना या ग्रंथाला लाभल्या आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळकपंथीय कंपू हे देशभक्त नसून दलित-बहुजनद्वेष्टे आहेत. त्यांचे ते शत्रू आहेत. इतकेच काय, टिळक लोकमान्य नसून ते बहुजनद्रोही आहेत. ते आपल्या जातीच्या उन्नतीकरिता इतरांना पायदळी तुडवीत आले आहेत. ही मंडळी लोकमान्य नसून सामाजिक अंगाने तूपरोटी खाणारे आहेत! यांनी सुवर्णमय भारत बुडविला ! ही मंडळी देशाचे दुष्मन आहेत! आदी सूत्रांना समोर ठेवून ‘देशाचे दुष्मन’ पुस्तिकेचे लेखन झाले आहे. या पुस्तिकेमुळे जवळकरांना काही महिने जेलबंद राहावे लागले.
पुणे येथील जेधे मॅन्शनची पाश्र्वभूमी लाभलेल्या प्रस्तुत पुस्तिकेमुळे टिळक अनुयायांच्या भावना न दुखावल्या तरच नवल! लोकमान्य टिळक यांची मुद्दाम अप्रतिष्ठा केली आणि चिपळूणकर घराण्याची बदनामी केली म्हणून चिपळूणकर यांचे पुतणे अॅड. कृष्ण महादेव चिपळूणकर यांनी सिटी मॅजिस्ट्रेट (पुणे) फ्लेमिंग यांच्या कोर्टात दावा दाखल केला. यापूर्वी लोकमान्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांनी १९२५ सालच्या ऑक्टोबरात लोकमान्य टिळक यांची छत्रपती मेळ्याच्या पदांमुळे बदनामी झाली म्हणून फ्लेमिंग यांच्या न्यायालयात फिर्याद केली होती. या प्रकरणाचा २६ एप्रिल १९२६ रोजी निकाल लागून दिनकरराव जवळकर
सत्यशोधकांचे अंतरंग
आणि रामचंद्र लाड यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला, तर पुढे ‘देशाचे दुष्मन’ केसचा निकाल १५ सप्टेंबर १९२६ रोजी लागून दिनकरराव जवळकर, रामचंद्र लाड, अॅड. केशवराव बागडे आणि केशवराव जेधे यांना न्यायमूर्ती फ्लेमिंग यांनी साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली. पुढे लगेचच पुणे येथील सेशन कोर्टात सरन्यायाधीश जे.डी. लॉरेन्स यांच्या कोर्टात अपील करण्यात आले. या अपिलात सत्यशोधक विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चारही सत्यशोधक आरोपींचे वकील होते (विना मानधन). बिनीचे सत्यशोधक आणि तत्कालीन अ. भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ना. भास्करराव जाधव यांचीही या केसमध्ये साक्ष झाली. यापूर्वी न्या. फ्लेमिंग यांनी गजानन गणपत फुले यांनी गुदरलेल्या केसमध्ये गजानन फुले हे महात्मा फुले यांचे चुलत नातू असूनही बाबूराव फुले यांच्याकडून न्यायदान करून त्यांना निर्दोष सोडले होते. नेमक्या याच मुद्यावर वज्राघात करून डॉ. आंबेडकरांनी गजेंद्र मोक्ष केला होता. या प्रकरणी चारही सत्यशोधक आरोपी निर्दोष सुटले. दरम्यान, शोकांतिका आणि सुखांतिका असलेल्या ‘देशाचे दुष्मन’ पुस्तिकेवर अनेकांनी वर्तमानपत्रात प्रतिक्रिया नोंदविल्या. काहींनी या पुस्तिकेवर स्वतंत्र ग्रंथ लेखनही केले. सत्यशोधक संपादक श्रीपतराव शिंदे आणि मुकुंदराव पाटील यांनी या पुस्तिकेचे स्वागत केले. ना. भास्करराव जाधव आणि ‘जागृति’कार पाळेकर यांना या पुस्तिकेची भाषा भडक वाटल्याने, त्यांनी या प्रकरणी नापसंती व्यक्त केली, तर डॉ. आंबेडकरांनी प्रस्तुत पुस्तिका आशयसंपन्न असून, लेखन मात्र रुचिहीन शैलीत केले असल्याचा निर्वाळा दिला.
थोडक्यात, जवळकरांच्या या जहाल, प्रक्षोभक आणि भावनेला आव्हान करणाऱ्या पुस्तिकेने सनातनी आणि सत्यशोधकांना आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त केले. या पुस्तिकेने जोतीरावांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथानंतर पुन्हा एकदा ब्राह्मण्यावर जोरकस आघात केला.
दरम्यान, ३० डिसेंबर १९२७ रोजी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पुलंगा (खु.) येथे अकोला जिल्हा पातळीवरील चौथी ब्राह्मणेतर परिषद आणि सत्यशोधक परिषद भरली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान दिनकरराव जवळकरांनी भूषविले होते. त्यानंतर दोन जानेवारी १९२८ रोजी जवळकरांचे नागपूर येथे व्याख्यान झाले.
पुढे १९३२साली जवळकरांनी विदर्भ प्रांताचा दौरा केला. या दौऱ्यात काही
सत्यशोधकांचे अंतरंग / 103
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




