पैगंबर जयंती निमित्त भव्य जुलुस, मोहल्ला व वाहन सजावट, तसेच महिला, विद्यार्थी व गरीबांसाठी विविध कार्यक्रम आयोजित

पैगंबर जयंती निमित्त भव्य जुलुस, मोहल्ला व वाहन सजावट, तसेच महिला, विद्यार्थी व गरीबांसाठी विविध कार्यक्रम आयोजित
संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती सालाबादप्रमाणे यंदाही आनंदमय वातावरणात साजरी होत आहे. पैगंबर जयंती व गणेश विसर्जन एक दिवसाच्या अंतराने असल्याने सामाजिक सलोखा व बंधुभाव राखण्याच्या उद्देशाने यावर्षासाठी जुलुस कमिटीच्यावतीने गुरुवार दिनांक १९/०९/२०२४ रोजी रोजी भव्य जुलूस काढण्यात येणार आहे. जुलुसची सुरुवात विजापूर वेस येथे सकाळी ८.३० वाजता पोलिस आयुक्त मा.एम. राजकुमार, मा.अमजदअली काझी व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वज फडकवुन करण्यात येणार आहे. या मिरवणूकीस प्रारंभ झाल्यानंतर सदरचे जुलूस बेगम पेठ पोलिस चौकी मार्गे किडवाई चौक, सोशल हायस्कुल, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशाह मदार चौक, जेलरोड पोलिस स्टेशन मार्गे, भारतीय चौक, बाराईमाम चौक, समाचार चौक, कौंतम चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती मार्गे, दत्त चौक, शालीमार टॉकीज, लक्ष्मी मार्केट मार्गावरुन पुन्हा विजापूर वेशीत येऊन विसर्जित होईल.
मिरवणूकीच्या सांगता समारंभात सोलापूर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचा हार्दिक सत्कार आयोजित केला आहे. दि.१६/०९/२०२४ रोजी गरीब व गरजूंना जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पैगंबर जयंती निमित्त संस्थेच्यावतीने दोन हुशार व गरजुं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी रक्कम रुपये पंचवीस हजार देण्यात येणार असुन गरीब व गरजूं महिलांना साड्या वाटप, गरजूंसाठी मोफत वैद्यकीय शिबीर, रिमांड होम व गर्ल्स हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पैगंबर जयंती निमित्त दि.१८/०९/२०२४ ते दि.२०/०९/२०२४ पर्यंत तीन दिवस मोहोल्ला सजावट करण्यात येणार असुन जुलुसच्या दिवशी वाहन सजावट करणाऱ्या व विविध स्पर्धेतील विजेत्यांचा प्रत्येकी ३ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व हिंदु-मुस्लिम बांधवांनी जुलुस व बक्षिस समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
अॅड.यु.एन.बेरीया अध्यक्ष- विश्वस्त समिती
अ.वाहिद नदाफ
विश्वस्त
के बदर म. हनिफ बडेपीर विश्वस्त
अखलाके दिना
अध्यक्ष – उत्सव समिती
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयक बेल दाबा




