महात्मा फुले यांची भूमिप्रिय स्वातंत्र्यनिष्ठा

महात्मा फुले यांची भूमिप्रिय स्वातंत्र्यनिष्ठा
– प्रा. भालचंद्र नेमाडे
हिंदुस्थानसारख्या शतकांनुशतके गुलामी संस्कृतीची सवय झालेल्या देशात मोठमोठ्या प्रतिभाशाली व्यक्ती जन्मल्या तरी त्यांच्या चरित्राभोवती अत्यंत प्रतिरोधी कुणाच्याही शक्तीपलीकडचे गुंतागुंतीचे सामाजिक अवगुंठन इतके भयानक असते की, अशा व्यक्तींचा अविष्कार सरळपणे होत नाही. वस्तुतः तेराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत मराठी बंडखोरांनी भाषेच्या माध्यमातून नाना तहेच्या आक्रमणांविरुद्ध जी भूमिप्रिय स्वातंत्र्यनिष्ठा दाखवली त्याचा इतिहास पाहता विसाव्या शतकात जगभर चाललेली स्वातंत्र्याची बकवास किती क्षुद्र आहे हे तुलनेने लक्षात येते. परंतु गुलामी संस्कृतीचे एक वैशिष्ट्य असे की, परकीय संस्कृतिमूल्यांच्या दबावामुळे परंपरेतूनच निर्माण होणाऱ्या बंडखोरीला विपर्यस्त वळण मिळेल असे वातावरण आपोआपच निर्माण झालेले असते. जोतीराव फुले यांच्या गद्याचा विचार करताना ह्या गोष्टी सतत नजरेसमोर ठेवाव्या लागतात. फुल्यांनी जन्मभर केलेला स्वातंत्र्याचा कडवा पुरस्कार आणि ह्या ज्वलंत बंडखोरीने धारेवर धरलेली ब्राह्मणी जातीयता ह्या दोन गोष्टींचा मेळ घातल्याशिवाय त्यांच्या गद्यशैलीचे नीट आकलन होऊ शकत नाही.
फुल्यांनी स्वातंत्र्याचे स्पष्टीकरण पूर्णपणे लेखकाच्या दृष्टिकोनातून केलेले आहे. ते म्हणतात, “मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरुरीची गोष्ट आहे. जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास आपले मनात उद्भवलेले विचार स्पष्ट रीतीने इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात.” ह्या त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूल्याविरुध्द “भट लोकांनी कट” केल्याचे त्यांना सर्वत्र जाणवल्यामुळे हिंदुस्थानातल्या मुसकी बांधून ठेवलेल्या शुद्रांच्या वतीने फुल्यांनी स्वातंत्र्य, बंधुभाव, समता व न्याय ह्या मूल्यांना विरोधी असलेल्या ब्राह्मणी परंपरेविरुद्ध पहिल्या पुस्तकापासून तर शेवटच्या पुस्तकापर्यंत युद्ध पुकारलेले दिसते. ह्या ब्राह्मणी परंपरेविरुद्ध युद्ध पुकारणारे नेते, मराठीत चक्रधर-नामदेव यांच्यापासून तुकारामासकट लोकहितवादीपर्यंत अनेक आहेत. परंतु फुल्यांच्या बाबतीत मात्र मराठीतली गेल्या
१. महात्मा फुले : समग्र वाङ्मय-संपादक: धनंजय कीर व स. गं. मालशे,
⑤शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




