संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे.? क्रमशा.3

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे.? क्रमशा.3
सप्ताहात्त भक्तीरस वाटण्यात गढून गेले होते. इकडे उस्तादाने आपले शागीर्द घेऊन एक गाव गाठले.
• कारस्थान रचले :- चैत्र पौर्णिमा शके १८५७ हसनपिराची प्रसिद्ध जत्रा भरली. संदल, घोडा मिरवणूक आणि दुसऱ्या दिवशी उरूसानिमित्त कुस्त्यांचा जंगी फड भरतो. कुस्त्या खेळण्यासाठी म्हणून हे सर्व पाटलांची पोरं तेथे गेले पण कुस्त्या खेळलेच नाहीत. सर्व गाव आखाड्याकडे कुस्त्या बघायला गेला पण हे सर्वजण कांतरावच्या वाड्यात बैठकीला बसले. विश्वनाथच्या पोटात सुडानी भडकला होता. त्याला झोप लागत नव्हती. अन्नपाणी गोड लागत नव्हते. भगवानबाबांवर या ना त्या कारणाने नाराज असणारे सर्व निवडून आणलेले होते. गडावर जमा झालेले धन घेण्यापासून आडवा येणार बाबा हा एकच विषय चर्चेला होता. काय करावे ? याला गडावरून कसे हाकलावे ? बराच वेळ काथ्याकूट करून खलबत झाले, कारस्थान रचले गेले.
“ब्रह्मचारी संताला फक्त स्त्री संगाचा डाग लावायचा असतो ! याने तो पुरता बदनाम होतो आणि आपण होऊन सर्वसंग परित्याग करून निघून जातो.” कांतरावने सुचविले. हा उपाय सर्वांना भावला, पण स्त्री कोण? बार्शी येथे दिंडी मुक्कामी असताना भोरपी जातीच्या स्त्रीचा वापर करून पाहिला; पण हा सहजच निसटून गेला. त्या भोरपी स्त्रीने आपली नावे सांगितली नाहीत, हे बरे झाले. नाहीतर आपण बदनाम झालो असतो.
आता कोण स्त्री तयार करावी ? कोणती स्त्री हे साहस करायला तयार होईल. या विषयावर अनेक बाजूंनी साधक बाधक चर्चा केली. कोणत्याही पाटलाचे डोके चालेना. बैठक स्तब्ध झाली. धीर गंभीर पण नाकातून उच्चार करत कांतराव म्हणाले, “मंडळी, काळजी कसली करता ! आत्या आहे ना गडावर! तिची चोळी द्या टाकून यांच्या अंथरूनावर, करा बोभाटा, बघा तुम्ही. शी ऽऽ ला पाय लावून पळतो की नाही, गड सोडून.”
वा ! वा. काय शक्कल काढली. सर्वांना पटलं, चिंता मिटली, येत्या एकादशीचा गडाच्या वारीचा मुहूर्त काढला.
मुक्ताबाई काळे, राहाणार धामनगाव. घरची गडगंज श्रीमंती होती, पोटी रत्नासारखी दोन गोंडस मुलं होती. थोरला गुलाब, त्याला बबन म्हणत असत.
धाकटा विठ्ठल, दोघेही गोरेपान, नाकीडोळी देखणे, जणू आईच्या मुखातून पडलेले सुंदर बछडे होते. मुक्ताबाईला सर्वजण आत्या म्हणत असत. आत्याच्या अंगावर किलो दोन किलो सोन्याचे दागिने होते. वज्रटिक, मध्ये पिंपळपान असणारी गळाभर पुतळ्याची माळ, कानात फुलं, साखळी, नाकात मोठी गोल नथ, सर्व अलंकार घालीत असे. अंगावर पिवळसर रंगाचे नऊवारी इरकलचे लुगडे नेसायची. रंगाने गोरी गोरी पान आणि चाफेकळीसारखे नाक असणारी सुंदर देखणी होती. आत्याला भजनाचा छंद होता. सुरेल आवाजात भजन म्हणे. अंबाजोगाई, मुकुंदराजाजवळ भगवानबाबांनी सप्ताह केला. तेव्हा आठ दिवस राबराब राबली. मोकळ्या मनाने धन खर्च केले. आनंद मिळाला. संसारात नाही ते सुख परमार्थात असल्याची जाणीव होऊन वैराग्य प्राप्त झाले. नारायणगडाची भक्त बनली. महिना वारीला गडावर येऊ लागली. परमेश्वरावर गाढ भक्ती जडली, भक्तीत रमून गेली. काही दिवसांनंतर आपली दोन्ही मुले घेऊन आली. गडावर राहून माणिकबाबांची सेवा करू लागली. बावी गावाची
कौशल्या ढाकणे होती, तिला सर्वजण आक्का म्हणत. तिला स्वयंपाकात
मदत करू लागली. आक्काला, आत्या सोबती झाली.
स्वयंपाकाघराचा पूर्ण कारभार आक्का, आत्याकडे आला. कामावरच्या गड्यांचं सगळं करावं, आल्या गेल्यांना हवं नको ते पाहावं. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यन्त हरीनाम जपत परमेश्वराची सेवा समजून पडेल ते काम करावे. धुतल्या तांदळासारखं निर्मळ मन, तशीच निर्मळ भक्ती, परंतु चांडाळांनी भगवानबाबांना आत्याच्या नावाचा डाग लावायचे ठरवले होते. तिच्या ध्यानी मनी, नाही.
वैशाख महिना वारी, शुद्ध एकादशीला अनेक गावचे वारकरी ठरल्या नेमाप्रमाणे आले, बाबांचे कीर्तन झाले. जवळपासच्या गावचे लोक आपापल्या बैलगाड्यात बसून गावी परत गेले. दूर गावचे, पायी आलेले तेथेच मुक्कामाला थांबले. जागराचे भजन झाल्यानंतर कोणी मंदिरात, कोणी कमानीत ओवऱ्यात झोपले.
माणिकबाबा माडीवर जाऊन झोपले. बाबा आपल्या बैठकीतच झोपले. भीमा आणि बापू भिल्ल पायथ्यालाच बसून पहारा देत होते. बापू भिल्लाचा मुलगा उत्तम आणि पत्नी चंपाबाई दाराजवळ झोपली होती. बैठकीच्या समोर पटांगणात बरीच मंडळी झोपली होती. शामराव पाटील सानप, बप्पाजी कान्हू नागरगोजे,
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




