दिल्लीत सत्यशोधक विचारांचा राष्ट्रीय जागर…! 🚨

🚨 दिल्लीत सत्यशोधक विचारांचा राष्ट्रीय जागर…! 🚨 शंकरराव लिंगे यांचा दिल्ली दौरा s l
यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या “महात्मा फुले गौरव वर्षा” अंतर्गत उद्या दिनांक १६ मे २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय सैनिक भवन, मंगोलपुरी, दिल्ली येथे भव्य सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेची वार्षिक बैठक संपन्न होणार असून त्यामध्ये संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी उपक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर देशपातळीवरील अपंग, विधुर, विधवा आणि कायदेशीर घटस्फोटीत महिला-पुरुषांचा भव्य वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
देशभरातून या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास १००० हून अधिक नोंदण्या झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सामाजिक समता, पुनर्विवाह चळवळ, मानवतावादी विचार आणि सत्यशोधक परंपरेचा संदेश देशभर पोहोचविण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त केला जाणार आहे.
यावेळी “शिक्षा इशारा” या संस्थेच्या विशेष पाक्षिकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी विचारांना नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक उपक्रम ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
✊ फुले-शाहू-आंबेडकर विचारांची मशाल आता दिल्लीच्या भूमीतून पुन्हा प्रज्वलित होणार…!
📢 दिनबंधू न्यूज | Shivkranti TV
🖋️ संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📞 7387377800
👉 हा नंबर आपल्या WhatsApp व सोशल मीडिया ग्रुपमध्ये त्वरित जोडा
👉 बातमी LIKE करा
👉 SHARE करा
👉 SUBSCRIBE करा
👉 FORWARD करा
👉 BELL ICON दाबा
👉 दीनबंधू न्यूज WhatsApp Channel FOLLOW करायला विसरू नका
🔥 सत्यशोधक विचार… सामाजिक परिवर्तनाचा निर्धार…! 🔥
#महात्मा_फुले_गौरव_वर्ष
#सत्यशोधक_शंकराव_लिंगे
#दिल्ली_दौरा
#वधूवर_पालक_परिचय_मेळावा
#शिक्षा_इशारा
#दिनबंधू_न्यूज
#शिवक्रांतीTV
#PhuleShahuAmbedkar
#SocialJustice
#BahujanMovement





