सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 32

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
32
कल्याणकर बा. ह.
(जन्म ६/०८/१९४८-मृत्यू १९-०३-२०११)
सत्यशोधक बा. ह. कल्याणकर हे मौजे गोगदरी, ता. कंधार, जिल्हा नांदेड येथील मूळ रहिवासी असून त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४८ साली झाला. पुढे शिक्षण आणि अध्यापन कार्य करत असताना ते औरंगाबाद येथे वास्तव्यास राहिले. बा. ह. कल्याणकरांचे शालेय शिक्षण कंधार, पाचोटी आदी ठिकाणी झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण नांदेड आणि पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथे झाले. पुढे त्यांनी बीड येथील बलभीम महाविद्यालय, औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाजशास्त्र विभागात समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले, बा. ह. कल्याणकर प्रसंगी कुणाची भीडमुर्वत ठेवत नसत. तरी ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते, हे विशेष. अडीअडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी स्वतःच्या खिशाला खार लावून ते मदत करायचे.
बा. ह. कल्याणकरांचा पिंडच क्रांतिकारी होता. त्यांनी विद्यार्थीदशेत घडून गेलेल्या मराठवाडा विकास आंदोलनात पुढे बीड, औरंगाबाद येथे प्राध्यापक असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात नामांतरवादी म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यासाठी प्रसंगी त्यांना अवहेलनाही सोसाव्या लागल्या. परंतु कट्टर सत्यशोधक बा. ह. कल्याणकरांनी त्याची केव्हाही तमा बाळगली नाही आणि विरोधी कोल्हेकुईला जुमानलेही नाही.
इ. स. १९८८ पासून सत्यशोधक समाज अधिवेशनांचे आयोजन पुन्हा एकदा होऊ लागले होते. विसावे सत्यशोधक अधिवेशन औरंगाबाद येथे तत्कालीन स. समाजाचे अध्यक्ष रायभान रंभाजी जाधव, प्राचार्य गजमल माळी, प्रा. ज्ञानेश्वर नाईकवाडे, अॅड. वसंतराव फाळके, वीर वामनराव लोखंडे, ल. ब. मिसाळ, डॉ. एस. एस. भोसले आदी सत्यशोधकांच्या पुढाकाराने यशस्वी झाले. या अधिवेशनापासून बा. ह. सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले. येथून पुढे होणाऱ्या अधिवेशन, सत्यशोधकी संमेलनात ते सहभागी होऊ लागले, त्यांच्या
स्वभावामुळे प्रसंगी त्यांचे सत्यशोधक कार्यकत्यांशी मतभेदही झाले. मात्र त्यांनी सत्यशोधक समाजाकडे पाठ फिरवली नाही. २०१० मध्ये ते सत्यशोधक साहित्य परिषदेचे अध्यक्षही झाले. २०१० मध्ये केंद्रीय सत्यशोधक कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली. या कार्यकारिणीत ते सन्माननीय पदाधिकारी राहिले.
देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा येथे २४ व २५ डिसेंबर २००६ रोजी सत्यशोधक समाजाच्या वतीने चौथे सत्यशोधकी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बा. ह. कल्याणकरांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत बा. हूं.नी अतिशय मूलगामी सत्यशोधक विचारांची मांडणी केली. पुढे २२ व २३ सप्टेंबर २००७ रोजी जळगाव येथे पाचवे सत्यशोधकी साहित्य संमेलन बा. ह. कल्याणकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. बा. ह. कल्याणकरांनी प्रस्तुत भाषणात महात्मा फुले यांच्या लोकचळवळीचा आढावा घेतला असून ‘शेतकऱ्याचा असूड’ ग्रंथावर विस्ताराने भाष्य केले होते. दरम्यान, फुले-सावित्रीबाई यांच्या कार्याचा आढावा घेत असताना समकालीन पुरोगामी संघटनांचा आणि नेत्यांचाही उल्लेख केला आहे. जाता जाता बहिणाबाईंच्या
कवितांचाही प्रसंगानुसार उल्लेख केला होता. थोडक्यात, सत्यशोधक चळवळ
आणि वाङ्मयाचे धारदार वर्णन या लोकशिक्षकाने केले होते.
बा. ह. कल्याणकर पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाजशास्त्र विभागात सेवारत असताना प्रस्तुत विद्यापीठाअंतर्गत महात्मा फुले प्रतिष्ठानचे सेवानिवृत्त होईपर्यंत मानद संचालक राहिले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांतून शिबिरे घेऊन महात्मा फुले यांचे विचार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रुजविले.
बा. ह. कल्याणकरांनी ‘युगकर्ता’ आणि ‘पुरोगामी लोकमित्र’ सारख्या अस्सल पुरोगामी नियतकालिकांचे संपादन केले. बा. है. च्या ‘तांबडं फुटलं’ काव्यसंग्रहाला ‘सोव्हिएत लँड नेहरू आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. काव्य, कादंबरी आणि समीक्षा हे वाङ्मयीन प्रकार त्यांनी लीलया हाताळले! अशा या लोकशिक्षकाचे वयाच्या ६३व्या वर्षी शनिवार, दिनांक १९ मार्च २०११ रोजी सायंकाळी आठ वाजता औरंगाबादेतील एम. जी. एम. रुग्णालयात निधन झाले, त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचा देह मरणोत्तर शासकीय वैद्यकीय रुग्णालय, औरंगाबाद येथे दान करण्यात आला.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




