सत्यशोधक विवाह विधी प्राध्यापक श्रावण देवरे क्रमशः आठ

सत्यशोधक विवाह विधी प्राध्यापक श्रावण देवरे क्रमशः आठ
कार्यक्रम कायद्याने राबविले गेलेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जाळून नष्टच केले जात होते. जातीतच विवाह करणे धार्मिक व पवित्र आहे, असा प्रचार सुरू झाला. त्यासाठी मनुस्मृतीसारख्या असंख्य भाकडकथा-पोथ्या लिहून त्या घरोघरी वाचून दाखविल्या गेल्यात. ज्यांचा प्रभाव आजही आपल्या बहुजन समाजावर कायम आहे.
जातिव्यवस्थेच्या ऐनभरातही आंतरजातीय विवाह काही प्रमाणात होत होते
शाक्तधर्म, तंत्रधर्म, नाथधर्म, लिंगायतधर्म हे सर्व धर्म जातिविरोधी होते व वैदिक पंथाच्या विरोधी होते व आहेत. म्हणूनच ते बहुजनांमध्ये लोकप्रिय होते. त्यांना राजाश्रय नसतानाही ते शुद्रादिअतिशूद्रांमध्ये एक सांस्कृतिक आंदोलन म्हणून कार्य करीत राहिलेत. लिंगायत धर्माची स्थापना करणाऱ्या महापुरुष बसवअण्णांनी मधूवरस ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न हरळय्या चांभाराच्या मुलाशी लावले. या आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देणाऱ्या न्हावी (नाभिक) जातीच्या बिज्जल राजाचा खून तत्कालीन ब्राह्मणांनी केला. त्याच्या परिणामी प्रतिक्रांती झाली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या दोन्ही कुटुंबांना व वधू-वरांना हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारले गेले. हजारो लिंगायत धर्मीयांची कत्तल करण्यात आली. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व प्राच्याविद्यापंडित असलेले गिरीश कर्नाड यांनी हा इतिहास “तलेदंड” नावाचे नाटक लिहून जगजाहीर केला आहे. गिरीश कर्नाड हे स्वतः उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत.
आंतरजातीय विवाह :
भारतात मुस्लिम आलेत, त्यासोबत पुरोगामी सुफी पंथही आला. त्यामुळे जातिव्यवस्था थोडी का होईना ढिली झाली. या काळात राजकीय आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाची लाटच पसरली. अनेक मुस्लीम राजांनी हिंदू स्त्रियांसोबत लग्न केले. छत्रपती शिवराय यांच्या आठ पत्नीपैकी एक बायको अस्पृश्य होती व हा विवाह त्यांनी शाक्तधर्माचा स्वीकार करून केला होता. या शाक्त विवाहाचा उद्देश सुस्पष्ट होता. ब्राह्मणीव्यवस्थेला ‘तडाखा’ देणे, हेच एकमेव ध्येय छत्रपती शिवरायांच्या मनी होते. प्राच्याविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करून पुस्तक लिहिलेले आहे. त्यात त्यांनी शिवरायांचा हा “शाक्त विवाह” सिद्ध केलेला आहे.
सत्यशोधक विधी
क्रमशः भाग 8
शिवक्रांती टीवी दिनबंधूंनी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01शिवक्रांती टीवी दिनबंधूंनी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

