सोशल

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

1) अरण तीर्थक्षेत्राचा आराखडा पुढील आठवड्यात शासनाकडे ‘अ’ वर्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

मोडनिंब : श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील आठवड्यात हा आराखडा शासन दरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिष्टमंडळाला दिले.

श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी येथे झाली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी संत सावता महाराजांचे वंशज ह.भ.प. सावता महाराज वसेकर, ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर, हभप साखरचंद महाराज लोखंडे, ह.भ.प. प्रभू महाराज माळी आदी उपस्थित होते. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरणला ‘अ’ तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची घोषणा केली.

१०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. या अनुषंगाने मंत्र्यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी यांना तत्काळ विकास आराखडा तयार करण्यास सांगितले. त्याची कार्यवाही गतीने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button