महाराष्ट्र विडी कामगार किमान वेतन कृती समिती, सोलापूर समन्वयक- डॉ. गोवर्धन संचू मो.नं. ९८९०७०४७३० अध्यक्ष- राष्ट्रवादी कामगार सेल (शरदचंद्र पवार)

प्रेस न्यूज
1) महाराष्ट्र विडी कामगार किमान वेतन कृती समिती, सोलापूर
समन्वयक- डॉ. गोवर्धन संचू मो.नं. ९८९०७०४७३० अध्यक्ष- राष्ट्रवादी कामगार सेल (शरदचंद्र पवार)
विडी कामगारांना किमान वेतनाप्रश्नी कामगार मंत्र्याकडून न्याय मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्र्याकडे कांही संघटनेसह धडकणार- डॉ. गोवर्धन सुंबू
महाराष्ट्रातील विडी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरचंद्रपवार कामगार संघटना, कामगार सेना, नवमहाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, राष्ट्रीय मजदूर संघ आदि संघटनेनी विडी कामगारांना किमान वेतन कायदयाप्रमाणे मजूरी मिळावी यासाठी अनेकवेळा सोलापूर पुणे, मुंबई डॉ. गोवर्धन सुंचू, विष्णु कारमपुरी महाराज, सायण्णा तेगळ्ळी, राहुल गुजर, आदि कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन सोलापूर सह महाराष्ट्रातील किमान ५ ते ६ लाख विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतांना कामगार मंत्री सुरेश खाडे, यांनी आजपर्यंत विडी कामगारांना न्याय मिळवून दिले नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.
वास्तविक पाहता, सोलापूर, संगमनेर, अहमदनगर, इंचलकरंजी, वाशिम, नांदेड, जालना, भिवंडी, पुणे, गडचिरोली, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, मालेगांव, आदि जिल्हयात किमान ५ ते ६ लाखाचे आसपास विडी कामगार आहेत. त्यांना सध्याचे सरकार स्थापन इ गाल्यापासून विडी कामगाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. विडी कामगार अत्यल्प मजुरीवर त्यांचे जीवन जगत आहेत. विडी कामगारांना गेल्या ८ ते १० वर्षापासून सहा. कामगार आयुक्त, पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त, महाराष्ट्र कामगार आयुक्त, आदिना अनेकवेळा भेटून विडी कामगारांना किमान वेतन कायदयाप्रमाणे वेतन मिळवून देण्यात यावा, असे विनंती करण्यात आले. परतू कुठलेही अधिकारी यांनी विडी कामगारांना न्याय मिळवून दिलेला नाही. मुंबई एकदा कामगार मंत्रो सुरेख खाडे, यांनी २ ते ३ महिन्यापुर्वी लोकसभेच्या अगोदर बेठक बोलाविले व त्वरीत कांही कारणांस्तव रद्दही करण्यात आले व वरील संघटनेच्या सर्व अध्यक्षांनी संयुक्तीकरित्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये फिरुन कामगारांना कामगार मंत्री कडून न्याय मिळू शकले नाही या बाबत सर्व जिल्हयामध्ये बैठका आयोजित करणार आहोत.
गेल्या तीन वर्षापासून कामगार मंत्र्याकडून विडी कामगारा विषयी एकदाही बैठक घेतलेले नाहीत. अशा निष्क्रीय कामगार मंत्री आहेत म्हणून १५ ऑगस्ट रोजी घटनेचे शिल्पकार व भारताचे प्रथम कायदेमंत्री महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर, पार्क चौक, सोलापूर येथे अभिवादन करुन विडी कामगारांना किमान वेतन मिळावा, यासाठी व महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री यांचे जाहिर निषेध करण्यासाठी वरील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्तरित्या १ तासाचा धरणे आंदोलन करून कामगार मंत्री यांचा निषेध करण्यात येणार आहे.
आपले नम्र.
डॉ. गोवर्धन सुंचू
राष्ट्रवादी कामगार सेल
विष्णु कादमपुरी (महाराज)सेना
सायचण्णा तेग्गेळळी
नवमहाराष्ट्र कामगार संघटना
राहुल गुजर
राष्ट्रीय मजदूर संघ
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




