🔥 “दोन सप्टेंबरचा काळा जीआर म्हणजे ओबीसींच्या आत्महत्यांचा बीज!” — सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे नागपूरमधील धडाकेबाज उद्घाटन भाषण! 🔥

r l l
🚩 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 🚩utu.b
🔥 “दोन सप्टेंबरचा काळा जीआर म्हणजे ओबीसींच्या आत्महत्यांचा बीज!” — सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे नागपूरमधील धडाकेबाज उद्घाटन भाषण! 🔥
🗣️ सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी नागपूर येथील “नागपूर गीता मंदिर वर-वधू-पालक परिचय मेळावा आणि ‘शुभमंगलम्’ पुस्तिका विमोचन सोहळा” या कार्यक्रमात जोरदार भाषण करताना भाजप सरकारवर ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोप केला.
ते म्हणाले — “दोन सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा! विजय बोचरे यांसारख्या आत्महत्या थांबवा! ओरिजनल आरक्षण धारकांनीच ओरिजनल धारकांना मतदान करून बदला घ्यावा!”
🌹 अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर, क्रांतिजोती माळी विकास संस्था नागपूर आणि नागपूर गीता मंदिर मेळावा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रम पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून ६००–७०० युवक–युवती व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
🌼 दीपप्रज्वलन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते झाले.
या वेळी गोविंद वैराळे, मधुसूदन देशमुख, कैलास जामगडे, विठ्ठल तोडकर, गौतम क्षीरसागर, शिवशंकर काऊलकर, गणेश मानकर, निळकंठराव राऊत, सौ. रोहिणीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला आघाडीच्या वृषालीताई वैराळे, गायत्रीताई भुसारी, पुष्पाताई बनकर, दिपालीताई भेदे, स्नेहाताई साखळे, लताताई लांजेवार, वर्षाताई चिचमलकर, मंगला ताई येनकर, वंदनाताई कडुकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
🌷 हा मेळावा म्हणजे समाजातील ऐक्याचा आणि स्वाभिमानाचा नवा दीप ठरला!
📲 संपादक — सत्यशोधक शंकरराव लिंगे (अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर)
📞 7387737871
🚩 बातमी लाईक करा 👍, शेअर करा 🔁, सबस्क्राईब करा 🔔, फॉरवर्ड करा 📤 आणि कमेंट करायला विसरू नका! 🚩



































