सोलापूर
अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन शासकीय कमिटी नियुक्त करा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती भव्य पुतळा बसवा
- ♦अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन शासकीय कमिटी नियुक्त करा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवा!
- सोलापुरात पालकमंत्र्यांना महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या वतीने दिले पालकमंत्र्यांना निवेदन! पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांना ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन सोलापूर दौऱ्यामध्ये दिले ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन शासकीय कमिटी निर्माण करावी सोलापूर शहरांमध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नाही महात्मा फुले यांचा पुतळा अडगळीत पडला आहे आपण महात्मा फुले यांचे वारस आहात म्हणून आपल्या काळातच सोलापूरमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य पूर्ण आकृती पुतळा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पटांगणामध्ये उभा करून सुशोभीकरण करावे किंवा जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक संभाजी महाराज पुतळ्याच्या समोरील सर्कल मध्ये रिकाम्या जागेमध्ये बसवावा शेतकऱ्यांना खते वीज पाणी बी बियाणे मोफत द्यावीत बिनव्याजी कर्जपुरवठा करावा त्वरित जातनिहाय जनगणना करावी ओबीसींना ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय आरक्षण सरकारी खाजगी सहकार क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे तिसरे शेडूल लागू करावे माणदेश नवनिर्मित जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण सर्व सोयींनी युक्त मध्यवर्ती ठिकाण म्हणून सांगोला शहराची निवड करावी ही नम्र विनंती आपला विनीत सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था बापूसाहेब भंडारे उपाध्यक्ष दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

