जरांगे फॅक्टर चालला नाही म्हणून ‘मविआ’चे पानिपत झाले, हे सत्य सांगीतले जात आहे, परंतू जरांगेच्या विरोधातील कोणता फॅक्टर जोरात चालला म्हणून महायुतीचा

जरांगे फॅक्टर चालला नाही म्हणून ‘मविआ’चे पानिपत झाले, हे सत्य सांगीतले जात आहे, परंतू जरांगेच्या विरोधातील कोणता फॅक्टर जोरात चालला म्हणून महायुतीचा
महाविजय झाला, हे का लपवून ठेवले जात आहे?
ओबीसीनामा-38. “आज जाना ओबीसी की जादूगरी क्या चीज है?” भाग-1. ब्राह्मण परवडला पण तथाकथित क्षत्रिय (?) नको?
हा लेख मी मतदान होण्याआधीच लिहीणार होतो. 3Ways Media ला तशी मुलाखतही 18 नोव्हेंबरला देण्याचे निश्चित झाले होते. बऱ्याच कार्यकर्त्यांशी या मुद्द्यांवर मी चर्चाही केली होती. परंतू जाहीरपणे लिहीणे व मुलाखत देणेही मी थांबवले व मतदान झाल्यानंतरच आपण यावर लिहीले पाहिजे, असे ठरविले. याचे कारणही स्पष्ट करणे आवश्यक आहे.
2014 पासून सर्वसामान्यपणे लोकांची मुख्यतः विद्वानांची सहिष्णुता संपलेली आहे. तथाकथित विद्वान विचारवंत इतके जातीग्रस्त व इगोयुक्त झाले आहेत की, कोणतेही सत्म त्यांना पचेनासे झाले आहे. त्यांच्या पुढ्यात एखादी वस्तुस्थिती मांडली की त्यांना लगेच पुरोगामित्वाचे आंबट ढेकर तरी येतात किंवा सेक्युलॅरिझमच्या ओकाऱ्या तरी होतात. त्यामुळे घडणारी वस्तुस्थिती सांगताच सांगणाऱ्यावर गैरलागू आरोप करून त्याला ट्रोल केले जाते.
हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका 5 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडल्या आणी मतदान संपल्यानंतर सर्व टिव्ही चॅनल्सवर विविध संशोधन सर्वे करणाऱ्या संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झालेत. निकालपूर्व एक्झिट पोलमध्ये सर्व टिव्ही चॅनल्सनी काँग्रेस बहुमताने सत्तेत येणार असे ठामपणे सांगीतले. भाजपाला मिळणाऱ्या जागा 19 ते 28 पर्यंतच असतील, असेही सांगण्यात आले. काँग्रेससाठी 44 ते 62 जागा दाखविण्यात आल्यात, म्हणजे काँग्रेस दोनतृतीयांश जागा घेऊन प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल असे सांगण्यात आले. मोदी-गोदी मिडियाने एवढ्या ठामपणे काँग्रेसची बाजू घेऊन बातम्मा दाखविल्या, ही खरेतर अशक्यप्राय बाब होती.
गोदी-मिडियाव्यतिरिक्त योगेन्द्र यादवांसारख्या वैचारिक राजकीय नेत्यानेसुद्धा काँग्रेसच प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल असे भाकीत केले. योगेन्द्र यादव हे पुर्वाश्रमीचे समाजवादी असून आप पक्षप्रणित मेणबत्ती संप्रदायाचे एक फार मोठे नेते आहेत. मोदींच्या भाषेत सांगायचे तर ते “आंदोलन-जीवी” आहेत. अशा विचारवंत माणसाने सांगीतले तर ते खरेच असणार!
8 ऑक्टोबर 2024 रोजी हरियाणाच्या विधानसभेचे निकाल जाहीर होत असतांनाच या सर्व एक्झिट पोल्सवाल्यांचे “टांगे पलटी, घोडे फरार” झालेत. त्माचदिवशी आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल (एक्झिट पोल?) जाहीर करूनटाकला. हरियाणात जे झाले तेच महाराष्ट्रात होईल हे आम्ही ठामपणे का सांगत होतो, याचे कारण जातीव्यवस्थेच्या वस्तुस्थितीचा व ब्राहमणशाहीच्या चाणक्यगिरीचा अभ्यास ! यावर आम्ही जाहीरपणे लिहीणे व बोलणे टाळले. कारण असे मत व्यक्त केल्याबरोबर हित-मित्रांनी शंका व्यक्त केली असती व हितशत्रूनी मला सरळ भाजपमध्येच ढकलले असते. जातीग्रस्त व इगोयुक्त विद्वानांच्या मांदियाळीत वस्तुस्थिती सांगणेसुद्धा फार मोठा गुन्हा असतो.
हरियाणातील जातीव्यवस्थेचं व महाराष्ट्रातील जातीव्यवस्थेचं समीकरण व त्याचा इतिहास अगदीच सारखा असल्यामुळे आम्ही ठामपणे सांगीतले की, जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात होईल. काय आहे हे साम्म? 2013 साली तिकडे हरियाणात काँग्रेसचे जाट-जमिनदार जातीचे भुपेन्द्र हुडा मुख्यमंत्री होते. त्याचप्रमाणे इकडे महाराष्ट्रात काँग्रेसचेच मराठा जातीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. 2013 साली या दोन्ही जमिनदार-क्षत्रिय जातीच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या क्षत्रिय जमीनदार जातींना ओबीसी- दर्जा देऊन आरक्षण देण्याचा कायदा आपापल्या विधानसभेत मंजूर करून घेतला. याचा परिणाम ओबीसींवर मोठ्याप्रमाणात झाला. ओबीसी अस्वस्थ झाला. त्याचा परिणाम लगेच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांवर झाला. जाट जातीचं राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी ओबीसींनी भाजपाला मतदान केले. भाजप सत्तेत आल्यामुळे जाट मुख्यमंत्री गेला आणी जाटेतर मुख्यमंत्री खट्टर हे सत्तेत आलेत.
इकडे महाराष्ट्रात तेच घडले. मराठा आरक्षणामुळे 2014 साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकात ओबीसी फॅक्टर निर्णायक झाला. ओबीसींनी भाजपाला मतदान करून पृथ्वीराज चव्हाण या मराठा मुख्यमंत्र्याला घालवलं व काँग्रेसचे सरकारही सत्तेतून हद्दपार केलं. जाट जातीचं व मराठा जातीचं एकछत्री राजकारण संपविण्यात ओबीसींना यश आले. महाराष्ट्रात ब्राह्मण फडणवीस मुख्यमंत्री झालेत. ‘ब्राह्मण परवडला पण मराठा नको’ अशी म्हणच तेव्हापासून रूढ झाली.
2016 साली हरियाणाच्या जाट आरक्षणाला सुप्रिमकोर्टाने नाकारले व महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला हायकोर्टाने अवैध ठरविले. सुप्रिम कोर्टाने जाटांचे आरक्षन अवैध ठरविताच जाटांनी ओबीसीविरोधी दंगली सुरू केल्या. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सुप्रिम कोर्टात लढणाऱ्या खासदार राजकुमार सैनी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्यात. या जीवघेण्या खूनी हल्ल्यातून खासदार सैनी कसेतरी वाचले. मात्र गावोगावच्या ओबीसी विरोधात जाळपोळ, मारझोड, बलात्कार असे सर्व क्रूर नीच कृत्ये जाटांनी केलीत. या दंगलींमुळे ओबीसीविरूद्ध जाट हे महाधृवीकरण घट्ट झाले व त्याचा सर्वात जास्त फायदा भाजपाला झाला.
इकडे महाराष्ट्रात असेच ओबीसीविरुद्ध मराठा धृवीकरण घट्ट झाले तर भाजपाला फायदाच होईल, असा विचार करून फडणवीसांनी षडयंत्रे रचायला सुरूवात केली. 2016-17 सालापासून सरकारी रसद पुरवून लाखांचे मोर्चे काढायला सुरूवात केली. ओबीसीतून मराठा आरक्षण व एट्रॉसीटी एक्ट रद्द करण्याच्या मागण्यांमुळे महाराष्ट्रातील
ओबीसी व दलित भयग्रस्त झाला. या मोर्त्यांमुळे ओबीसीवरुद्ध मराठा धृवीकरण घट्ट झाले मात्र त्याचा फायदा भाजपाला होऊ शकला नाही. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे होते की, काँग्रेसने दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टाने नाकारल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय थंडावला होता, त्याला भडाग्मी देण्याचा उद्योग फडणवीसांनी केल्यामुळे ओबीसी भाजपावर नाराज झालेला होता. 29 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठा आरक्षणाचे विधेयक मंजुर केले. फडणवीसांनी ओबीसींना गृहीत धरले व मराठा आरक्षण दिल्यामुळे मराठा वोटबँकही आपल्याच खिशात येईल, असा समज करून घेतला. परंतू झाले उलटेच !
जातीव्यवस्थेचा सर्वात जास्त सखोल व सुक्ष्म अभ्यास करणारे संघी हुशार लोक फडणवीसांच्या पदरी असतांनाही फडणवीसांना आपल्या चूकीचे फळ भोगावे लागले. जाट, पटेल, मराठा आदि तथाकथित क्षत्रिय जातींचं एक जात-वैशिष्ट्य माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी परवाच्या टिव्ही मुलाखतीत सांगीतलं, ते असे-“मराठा माणूस कधीही चुकूनही मराठेतर व्यक्तीला किंवा मराठेतर पक्षाला मतदान करीत नाही.” 2019 च्या लोकसभा निवडणूकित भाजपाचं ओबीसी मतदान घटलं आणी मराठा मतदान मिळालेच नाही. परिणामी फडणविसांचं मुख्यमंत्रीपदही गेलं आणी सरकारही गेलं!
एवढा मोठा कु-अनुभव पाठीशी असतांना 2023-24 साली पुन्हा तोच मराठा आरक्षणाचा खेळ नव्या रंगात व नव्या ढंगात कसा सुरू करण्यात आला व त्माचे काय परिणाम काय झालेत ते आपण लेखाच्या पुढील भागात पाहू या! तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्म कि जय हो !
– प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी
शिवक्रांती टीवी दिन बंधूंय संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




