सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशिर्ष शुध्द चंपाषष्टी शनिवार दि.०७/१२/२०२४

सालाबादप्रमाणे बाळे येथील श्री खंडोबा देवाची यात्रा मार्गशिर्ष शुध्द चंपाषष्टी शनिवार दि.०७/१२/२०२४ पासून सुरु होत असून रविवार दि.८/१२/२०२४, दि.१५/१२/२०२४, दि.२२/१२/२०२४ व दि.२९/१२/२०२४ या चार रविवारी असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते व यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या तीन राज्यातून दर्शनासाठी येत असतात.
तसेच रात्री ठिक ८.०० वा. श्री. खंडोबा देवाची पालखी व विद्युत रोशनाईने सजविलेले सोलापूरात आलेले मानाचे नंदिध्वज यांची मिरवणूक पाहण्याकरीता भरपूर लोकांची गर्दी होत असते व चौथ्या रविवारी रात्री ठिक ८.०० वा. शोभेचे दारूचेः रोषणाई केली जाते. तसेच यात्रा कालावधीत श्री ची पहाटे ५.०० वाजता काकड आरती व सकाळी ठिक ८.०० वा. व रात्री ७.०० वा. दोन वेळा महापूजा अभिषेक करण्यात येते. तसेच दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्यामुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे, इत्यादी विधीचे कार्यक्रम होत असतात.
तसेच भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलिस बंदोबस्त व सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा व पाण्याची सोय केली आहे. तसेच देवस्थान ट्रस्टचीचे चेअरमन विनय विजय ढेपे, सचिव सागर चंद्रकांत पुजारी, उपाध्यक्ष सुरेश पांडूरंग पुजारी, सदस्य आदिनाथ मल्हारी पुजारी, सदस्य कल्लेश्वर रमेश पुजारी व समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या व विविध विधीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेचे व्यवस्थितरित्या नियोजन करित असतात तसेच पौष शु. षष्टी बांगरसट वार रविवार दि.०५/०१/२०२५ रोजी महाप्रसाद वाटप करून सर्व पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे इत्यादी मानकरी व भाविक यात्रेकरू यांना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते.
आपला,
श्री खंडोबा देवस्थान, ट्रस्टी (विनय विजय ढेपे-अध्यक्ष)
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा




