सोशल

“दुष्काळाशी झुंज देणाऱ्या मानदेशाने पुन्हा दिला आदर्श — कष्टकरी लेकरांचा साधेपणातील स्वाभिमानी विवाह संपन्न”

“दुष्काळाशी झुंज देणाऱ्या मानदेशाने पुन्हा दिला आदर्श — कष्टकरी लेकरांचा साधेपणातील स्वाभिमानी विवाह संपन्न”

 

📍 दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली

आटपाडी तालुका म्हणजे दुष्काळ, संघर्ष आणि कष्टाची भूमी… पण त्याचबरोबर स्वाभिमान, जिद्द आणि साधेपणाचीही ओळख असलेला मानदेश!
या मानदेशातील कष्टकरी समाजाने पुन्हा एकदा समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवत अतिशय साधेपणात विवाह सोहळा पार पाडला.

दिघंची येथे चि. प्रशांत दत्तात्रय कबीर M.A. (Economics) रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली आणि चि. सौ. का. नम्रता नंदकुमार जाधव M.A. (Economics) रा. आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली यांचा शुभविवाह अत्यंत साध्या आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

वर चि. प्रशांत हे कै. दगडू धर्मा कबीर (माळी) यांचे नातू व श्री. दत्तात्रय दगडू कबीर (माळी) यांचे सुपुत्र आहेत.
तर वधू चि. सौ. का. नम्रता या कै. सदाशिव जानू जाधव (माळी) यांच्या नात व श्री. नंदकुमार सदाशिव जाधव (माळी) यांच्या कन्या आहेत.

या दोन्ही कुटुंबांची जीवनकहाणी म्हणजे संघर्ष आणि श्रमाचा इतिहास आहे. कुणी मुंबईच्या गोदीमध्ये हमाली करत संसार उभा केला, कुणी शंभर किलोची पोती पाठीवर वाहून मुलांना शिक्षण दिले, तर कुणी लाकूड फोडण्याची आणि मोलमजुरीची कामे करून संसार सांभाळला. आज त्या कष्टाचे चीज होत असून त्यांच्या मुलांनी M.A. (Economics) पर्यंत शिक्षण घेऊन समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे या विवाहात कोणताही दिखावा, बडेजाव, लाखोंची सजावट, डीजे, फुशारकी किंवा मानपानाचा दिखाऊ खर्च नव्हता. सकाळी आलेले वऱ्हाड, साधेपणात पार पडलेली हळद, विवाह आणि त्यानंतर सर्व समाजाने एकत्र खाली बसून घेतलेले भोजन — एवढ्याच साधेपणात हा विवाह सोहळा आनंदाने पार पडला.

या विवाह सोहळ्यास अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे व सौ. सुनंदा शंकरराव लिंगे यांनी उपस्थित राहून नवदांपत्यास शुभ आशीर्वाद दिले. त्यांनी वधू-वरांना सुख, समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि स्वाभिमानी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यात ८०, ७५ आणि ९५ वर्षांच्या ज्येष्ठ मावशांनी स्वतः खाली बसून जेवण केले, हात धुतले आणि स्वतःची कामे स्वतः करत स्वावलंबी जीवनाचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवला. हे दृश्य पाहून उपस्थितांनी “या स्वाभिमानी मानदेशाला सलाम” अशा भावना व्यक्त केल्या.

आज समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो —
जे कष्टकरी लोक आयुष्यभर कष्ट करून, मोलमजुरी करत असूनही इतक्या साधेपणाने आणि स्वाभिमानाने विवाह करू शकतात, तर श्रीमंत समाज अजूनही दिखावा, बडेजाव, मानपान आणि खोट्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत का अडकला आहे?

लग्नांमध्ये लाखो रुपये खर्च करून, कर्ज काढून स्वतः किती मोठे आहोत हे दाखवण्याचा पोकळ प्रयत्न अनेक ठिकाणी दिसतो. चालीरीती, रूढी आणि परंपरांच्या नावाखाली आयुष्याची मोठी कमाई खर्च केली जाते. त्यामुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबली जातात.

पण मानदेशातील हे कष्टकरी लोक समाजाला स्पष्ट संदेश देतात —
“दिखाव्याने नाही, तर मेहनत, शिक्षण आणि स्वाभिमानाने माणूस मोठा होतो.”

जर समाजातील श्रीमंत वर्गानेही या कष्टकरी लोकांचे अनुकरण केले, तर समाज लवकर सुधरेल, कर्जमुक्त होईल आणि नव्या परिवर्तनाचा इतिहास घडेल, अशी भावना या विवाह सोहळ्यातून व्यक्त करण्यात आली.

📢 सोशल मीडिया संदेश

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे

📞 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कॉमेंट करा • बेल आयकॉन दाबा.

दिनबंधू न्यूज WhatsApp ग्रुप व चॅनलला फॉलो करायला विसरू नका.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button