रे नगर हाऊसिंग फेडरेशनमधील १५,०२४ घरकुलांच्या बांधकामात गंभीर अनियमिततेचा आरोप; SIT चौकशी व दुसरा टप्पा तात्काळ स्थगित करण्याची मागणी

📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
रे नगर हाऊसिंग फेडरेशनमधील १५,०२४ घरकुलांच्या बांधकामात गंभीर अनियमिततेचा आरोप; SIT चौकशी व दुसरा टप्पा तात्काळ स्थगित करण्याची मागणी
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत रे नगर हाऊसिंग फेडरेशन येथे उभारण्यात आलेल्या सुमारे १५,०२४ घरकुलांच्या बांधकामामध्ये गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे काम, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवा विकास सेना, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक अली फारूक शेख यांनी सादर केलेल्या निवेदनात प्रकल्पाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, पाया व संरचनात्मक कामात तांत्रिक त्रुटी, भिंती, छत, प्लास्टर, फ्लोअरिंग आदी कामांमध्ये दोष असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी काम पूर्ण न होता देखील Completion Report सादर करून शासकीय निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाचा दुसरा टप्पा तात्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासून सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्यास कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
🖋️ संपादकीय संदेश
सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या घरकुल योजनांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. निवेदनात करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. या आरोपांची निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर चौकशी होणे आवश्यक असून चौकशीनंतर जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसार संबंधितांवर योग्य कारवाई होणे हीच जनतेची अपेक्षा आहे.
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 संपर्क : 7387377801
✅ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
✅ बातमी लाईक करा.
✅ शेअर करा.
✅ सबस्क्राईब करा.
✅ फॉरवर्ड करा.
✅ कॉमेंट करा.
✅ बेल आयकॉन दाबा.
✅ दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल व ग्रुप फॉलो करायला विसरू नका.
#दिनबंधून्यूज #ShivkrantiTV #सोलापूर #प्रधानमंत्रीआवासयोजना #रेनगर #SITचौकशी #भ्रष्टाचार #घरकुलयोजना #महाराष्ट्र #BreakingNews




