सोलापुरातून ‘युवा भारत रोजगार पार्टी’ची घोषणा; प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, कर्जमाफी, तीन शिफ्ट कार्यालये व निवडणूक सुधारणांसह १० प्रमुख आश्वासने

सोलापुरातून ‘युवा भारत रोजगार पार्टी’ची घोषणा; प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, कर्जमाफी, तीन शिफ्ट कार्यालये व निवडणूक सुधारणांसह १० प्रमुख आश्वासने
सोलापूर | प्रतिनिधी :
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत युवा भारत रोजगार पार्टीचे संस्थापक बसवराज येरनाळे यांनी पक्षाची अधिकृत स्थापना जाहीर केली. यावेळी सुरेश घुमकनाळे, सिद्धाराम बिराजदार, श्रीमती राजश्री जालनापुरे, राजू चव्हाण, हेमंतकुमार जैन आणि बाबास जाधव उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पक्षाने महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सरकारी व निमसरकारी कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, न्यायालये, आरटीओ आदी सर्व कार्यालये तीन शिफ्टमध्ये सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
पक्षाने नागरिकांना जलद न्याय मिळण्यासाठी प्रत्येक राज्यात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्याची, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएमसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची आणि मतदारांना मतदानाची पावती देण्याची मागणी केली.
याशिवाय ₹५० लाखांपर्यंतच्या कर्जांपैकी २५% ते ५०% कर्जमाफी, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांवर सर्व नोंदणीकृत पक्षांनी उमेदवार देणे बंधनकारक करणे, ५५ वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला दरमहा ₹४,५०० ज्येष्ठ नागरिक सन्मान निधी, तसेच सोलापूर–कोल्हापूर सेमी-हायस्पीड रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
पक्षाने सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या जनरल डब्यावर लिहिलेला “दीन-दयाळू” हा शब्द सर्वसामान्य प्रवाशांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारा असल्याचा दावा करत तो हटविण्याची मागणी केली
संपादकीय संदेश
रोजगार, न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा आणि सामाजिक प्रश्नांवर नवीन राजकीय पक्षाने मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरत आहेत. या मागण्यांची अंमलबजावणी कितपत शक्य आहे, यावर आता सरकार, निवडणूक आयोग आणि जनतेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
📞 संपर्क : सत्यशोधक शंकरराव लिंगे
मो. 7387377801
👉 हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राईब करा.
📲 फॉरवर्ड करा.
💬 कमेंट करून आपले मत नक्की नोंदवा.
#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #युवाभारतरोजगारपार्टी #बसवराजयेरनाळे #सोलापूर #पत्रकारपरिषद #रोजगार #सरकारीनोकरी #कर्जमाफी #निवडणूकसुधारणा #महाराष्ट्र #BreakingNews




