सुधाकर रावजी गणगणे साहेब * मंत्री व आमदार असतांना अकोट व तेल्हारा तालुक्यात केलेली कामे :-

सुधाकर रावजी गणगणे साहेब * मंत्री व आमदार असतांना अकोट व तेल्हारा तालुक्यात केलेली कामे :-
अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्यांचा विकास करीत असतांना अकोट व तेल्हारा येथे दोन्ही कार्यालयाची निर्मिती मंत्री असतांना करण्यात आली. दोन्ही तालुक्यात अनेक रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यापैकी एक रस्ता म्हणजे अकोट ते पोपटखेड या रस्त्यावर ५२ नाले होते. या सर्व नाल्यांवर पूल बांधण्यात आले. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील रस्ते विकसित करण्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात आली. अकोट व तेल्हारा येथे जिल्हास्तरीय दर्जाचे न्यायालय स्थापन करून त्यांना विकसित करण्याचे काम मा. सुधाकरराव यांनी केले. सर्व सामान्यांची आरोग्याच्या दृष्टीने सोय व्हावी म्हणून दोन्ही तालुक्यांमध्ये ग्रामीण रुग्णालयांची स्थापना करण्यात आली. अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्याचे ठिकाणी (एम.आय.डी.सी.) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. दोन्ही तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या यशस्वी योजना राबवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. विद्युत पुरवठा नसलेल्या गावांमध्ये विद्युत पुरवठा करुन अनेक गावे प्रकाशमय करण्यात आली. अकोट तालुक्यामध्ये पाटबंधारे खात्याचे सर्व्हे विभागाचे कार्यालय राज्यशासनाचा पाठपुरावा करुन अकोट येथे मा. सुधाकररावांच्या अथक प्रयत्नाने सुरु झाले.
वान प्रकल्पाचे काम सिद्धिस जात असतांनाच या प्रकल्पानंतर त्याच तोडीचे मोठमोठे प्रकल्प सातपुड्याच्या परिसरात व्हावेत, दोन्ही तालुक्यातील पावसाचे पाणी, मोठमोठ्या नाल्यांमधून वाहणारे पाणी थांबवून जिरविण्यासाठी मोठमोठ्या प्रकल्पाचा सर्व्हे करण्यात आला आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून सातपुड्याच्या परिसरातील थेंब थेंब रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने
१) चिचपाणी धरण
२) मुखमल धरण १
३) मुखमल धरण २
४) धारूर धरण
५) दिपमाळा-१
६) दिपमाळा-२
७) निजामपूर धरण
८) पिंप्री धरण
मा. श्री. सुधाकरराव गणगणे यांनी इतर लहान मोठी धरणे मिळून एकूण ९ प्रकारची धरणे प्रस्तावित करण्यात आली होती. अकोट तालुका, दर्यापूर तालुका, अंजनगांवचा परिसर हा सर्व भूभाग सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उद्देशाने खिरकूड येथे एक मोठे धरण बांधण्यासंबंधी प्राथमिक स्तरावर प्रयत्न करण्यात
आले पण नंतर हा विचार सिद्धिस नेता आला नाही, याचवेळेस पाटबंधारे खात्याच्या माध्यमात पोपटखेड येथील धरण मा. सुधाकरराव यांनी प्रस्थापित करून आणले त्यामुळे आजमितीला अकोट पोपटखेड रोल अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. याच काळात पणज येथे सुच्ा एक माल धरण प्रस्तावित होते. तेथील जागेचा शासनाच्या वतीने सर्वे करुन पाठपुरावा करुन आज रोजी त्या धरणांची पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पोपटखेड येथील धरणामुळे अकोट तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. तसेच पोपटखेड, अकोट या भागात पाण्याची पातळी वाढून सर्व भूभाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. एकंदरीत मेळघाट व नरनाळा विभागातील पाण्याचा थेंब अन थेंब जिरवला जावा यासाठी मा. सुधाकरराव सतत प्रयत्नशील होते. त्यापैकी अनेक
प्रयत्नांना त्यांना यश प्राप्त झाले आहे. आजच्या घडीला शेतकरी हवालदिल झाला असतांना मा. सुधाकररावांनी त्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी धरणे बांधण्याचा चंग बांधला. हजारो एकर जमीन सिंचनाखाली आणली. त्यांच्या अनेक प्रकल्पांना यश देखील प्राप्त झाले. सुधाकररावांचे घराणे मूलतः कृषकाचे घराणे ! मुळातच त्यांचा जन्म हा शेतकरी कुटूंबातला असल्यामुळे शेतकऱ्याच्या व्यथा, दुःख, दैन्य आणि दारिद्र्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते म्हणून मंत्री व आमदार ही पदे भोगत असतांना शेतकऱ्यांच्या विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले.
* महसुली विभाग कार्यक्रम :
घरकुल योजना :- बेघरांसाठी घरे आवश्यक आहेत म्हणून महसूल विभागाच्या योजनांचा लाभ अकोट, तेल्हारा तालुक्यातील गोरगरीब, दुर्बल घटकातील व्यक्तींना मिळावा या उद्देशाने सन १९८५-८६ ते १९८८-८९ या काळात मा. सुधाकरराव गणगणे यांच्या प्रेरणेने तथा राजस्व विभागातर्फे अकोट व तेल्हारा तालुक्यामध्ये ४९८ घरकुले बांधण्यात आली होती. तसेच ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजनेखाली अकोट तालुक्यामध्ये १५२ तसेच तेल्हारा तालुक्यामध्ये ५४ घरकुले बांधून लाभार्थीना देण्यात आली होती.
* विधी व न्याय विभागाची स्थापना :-
तेल्हारा येथे नवीन न्यायालय
नव्हते माननीय सुधाकररावजी गणगणे साहेब यांनी केलेली विकास कामे सुरक्षित ठेवणे सुरळीत चालवणे देखभाल करणे नवीन प्रोजेक्ट आणणे रखडलेली काम पुन्हा सुरू करणे यासाठी सुधाकर रावजी गणगणे साहेब यांचे सुपुत्र उच्च विद्या विभूषित कार्यक्षम महेश गणगणे साहेब यांना काँग्रेस पक्षाने दुसऱ्यांदा तिकीट दिले आहे या संधीचे सोने करून अकोट तेलारा मतदारसंघातील मतदाराने प्रचंड बहुमताने महेश गणगणे यांना निवडून द्यावे ही नम्र विनंती .दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोध.क शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




