सोशल

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.10

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे? क्रमशा.10

मोठा बिकट प्रसंग उद्भवला. आम्हा सामान्य लोकांना त्या प्रसंगातूनच बाबांचे खरे स्वरूप पाहावयास मिळाले.”

वाबांची प्रकृती मोठी बांधेसूद आणि मनमोहक, स्वरूपाला तपश्चर्येच्या तेजाची जोड लाभली आहे. मुखकमल नेहमी आनंदी आणि आकर्षक. किती वेळही पाहात राहिले तरी मन भरत नाही. डोळ्याची भूक भागतच नाही. बाबांसारखा सुस्वरूप मनुष्य आमच्या पाहाण्यातच नाही. बाबांकडे पाहून जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करणे महाकठीण आहे. रागीट, तिरसट स्वभावाचा माणूसही बावांना पाहाताच सरळ होतो. जन्माच्या दुःखी माणसानेही बाबांच्याकडे पाहिल्यास तो सुखी होतो. एवढे सर्व रूपाचे भांडार बाबांना जन्मतःच लाभले. त्याला कडकडीत ब्रह्मचर्याची झालर असल्यामुळे दुधात साखर असा योग आलेला आहे.

• पुन्हा एक कट उघड : बार्शी गावात एक सुस्वरूप खी आली. घरी येण्यासाठी आग्रह करू लागली. बाबांनी होकार दिला आणि निघाले. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे दहा-पंधरा लोक बरोबर चालू लागले. त्या स्त्रीने सर्वांना न येण्याची विनंती केली. सर्वजण थांबले पण बाबासाहेब पाडळीकर चालू लागले. बाईने त्यांनाही सोबत येण्यास मज्जाव केला. बाबा म्हणाले, “मी एकटा येत नाही.’ बाई म्हणाली, “माझे तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचे काम आहे. तुम्ही एकटेच चला.” पण बाबा काही जाईनात. शेवटी बाबांनी मला बरोबर येण्याचा इशारा केला व चालू लागले. बाई थोडी दुःखी झाली. घरी गेल्यानंतर मला ढाळजात बसण्यास सांगून बाबास घरात घेऊन गेली. बाबाला वाटले, या बाईचे खरोखरच काही महत्त्वाचे काम असेल. दुसऱ्या समोर सांगण्याची भीती वाटत असेल.

बाबांना बसायला पाट टाकला, फराळाचे ताट समोर ठेवले. तशाच प्रकारचे ताट मलाही आणून देण्यास विसरली नाही. बाबा फराळ करत असताना भलतेच हावभाव करू लागली. नेत्र कटाक्षाचे बाण फेकू लागली. बाबांनी दखल घेतली नाही. मग मात्र ती अश्लील शब्दाने बाबांना मोहात घेण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा बाबांनी फराळाचे ताट ढकलून दिले. बाहेर जाण्यासाठी उठून उभ राहिले. त्याबरोबर बाईने एकदम मिठी मारली. या आकस्मिक विचित्र घटनेने बाबा प्रथम भांबाऊन गेले. “गुळजकर, अहो गुळजकर आबा देवा; आहो

आबा देवा; पळा लवकर पळा, घात झाला !” हाक मारू लागले. बाबांच्या יין आबा स्वरातील आरोळीने मी धावतच घरात गेलो. ते दृश्य पाहून मला राग आला. तिच्या श्रीमुखात, दोन भडकाविल्या आणि बाबांना घेऊन बाहेर आलो. आम्ही आमच्या ठिकाणावर आलो. या गोष्टीचा बाबा बरेच दिवस उस्मारा करीत असत आणि दुःखी होत असत. अशा शुद्ध आचणाचे आहेत हे भगवानवावा !”

“बरोबर आहे ना देवा, म्हणून तर दुर्जनांनी अपवाद घेतला, बाबांनी संशयाचे मूळच उपटून टाकले आहे. चांडाळांचे दात पडले. आता घ्या म्हणावं अपवाद ? प्रत्यक्ष देवरूपी बाबांना छळण्याचे पाप माथी मारून घेतले. त्यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. वंशाला दिवा लावायला माणूस राहणार नाही. जशी करणी, तशी भरणी, त्यांना फेडावीच लागणार आहे.” मानसिंग पाटील बोलत होते.

मुक्तेश्वरातील सात दिवसाच्या ज्ञानेश्वरीचे निरूपणाची सांगता झाली. काला होऊन सर्व भाविक आपापल्या गावी गेले. बाबा गुळजला नृसिंहाच्या मंदिरात येऊन राहिले. चारपाच दिवस झाले, सायंकाळची वेळ असावी. सहज फिरायला म्हणून बाबा आपल्या चार दोन सहकाऱ्यांसह गंगा किनारी गेले. गंगेचा तो प्रवाह पाहून बाबांना पोहण्याची लहर आली. लगेच कपडे काढले आणि पाण्यात उडी टाकली. पोहत पोहतच जाऊ लागले. ही बातमी मानसिंग पाटलांना कळल्याबरोबर त्यांनी चार-पाच भोई लोक भोपळे घेऊन मदतीला पाठवले. ते लोक येण्याच्या अगोदरच बाबा सुरळेगावाला पोहोचले, नारायणबाबांचे दर्शन घेऊन परत फिरले.

बाबा नृसिंहाच्या मंदिरात आल्यानंतर मानसिंग पाटील रागाने खूप बोलले. “ही काय आंघोळीची वेळ आहे ? उगाच दुखऱ्या अंगाने अवेळी गंगेत उडी टाकून जीवाला धोका पत्करून घ्यावयाचा? गार पाण्याने शरीर भिजल्यामुळे सर्दी पडश्याचा त्रास नाही का होणार? नारायणबाबाच्या दर्शनाला जायचे होते तर घोडे होते, पाण्यातून जाण्यातच काय हौस वाटली?” पाटील तावा-तावाने बोलत होते. बाबांनी निमूटपणे ऐकूण घेतले, फक्त गालातल्या गालात मुरक्या मुरक्या हसले.

बाबांनी रात्री कीर्तनात या प्रसंगाचा उल्लेख केला. “स्वामी महाराज आणि

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button