शरणगाथा क्रमशा.31

शरणगाथा क्रमशा.31
आत्मस्तुती नको, हीच अंतरंग शुद्धी,
हीच बहिरंग शुद्धी आणि हीच कुडलसंगमदेवास प्रसन्न करण्याची रीत होय.
(समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक २३५)
या महात्म्याने नीती, भक्तीबरोबर एकूणच यशस्वी जीवनव्यवहाराची पद्धतही स्पष्ट केली आहे. इथे ते आपल्या आराध्य ईश्वरतत्त्वाशी संवाद करण्याच्या निमित्ताने आपल्याला सांगत आहेत.
जगण्याची माझी रीती-नीती कशी असावी? कुडलसंगमदेवाने मला चोरी-लबाडीचा मार्ग नको म्हणून सांगितले आहे. एखाद्याशी अकारण झगडा, संघर्ष, कुणाची हत्या हा काही जीवनाचा मार्ग नव्हे. असत्याचा अवलंब करून स्वार्थसाधना करायची किंवा कधी कुणावर राग काढून आपली सरशी समजायची हेदेखील जीवनाचे उद्दिष्ट असत नाही. कुणाही जीवाचा हेवा करणे, कुणाला त्रास देणे, त्यांच्या दुःख-क्लेशाला कारण होणे हे माणसाचे वागणे नव्हे. माझ्या प्रिय अशा कुडलसंगमदेवाने मला हे वारंवार दाखवून दिले आहे की, कुणाची प्रशंसा, स्तुती अथवा लाचारी करीत राहणे, आपलीच आपण पाठ थोपटून घेणे, कुणाची निंदानालस्ती करीत बसणे वा आपल्याच तोऱ्यात वावरणे हे काही शहाणपणाचे लक्षण नव्हे. शूचिता वा पावनता ही अंतर्बाह्य असायला हवी, जसे वरून प्रसन्न दिसावे तसेच आतून-मनापासून प्रसन्न असावे, आत एक नि बाहेर दुसरे हे मानवाचे वागणे नसावे. कुलडसंगमदेवा माझ्या हे सारे नित्य स्मरणात राहावे, म्हणून तू माझ्या पाठीशी राहा.
मंदिरव्यवस्थेला हादरा देऊन ‘इष्टलिंग’ संकल्पनेचा केलेला प्रसार, त्यामुळे मठ, दांभिक महाराज, मंदिरे आणि मध्यस्थांना फार मोठा धक्का बसला. धर्माच्या नावे जगणाऱ्या पोटभरू लोकांचे धंदे बुडाले. लोक मठ-मंदिरांत न जाता, कर्तव्याला- कायक आणि दासोहालाच सर्वाधिक महत्त्व देऊ लागले. सामाजिक समता निर्माण झाली. स्त्रीदास्यत्त्व आणि शूद्रांचे ‘शूद्रत्त्व’ संपले होते. त्यामुळे सामान्य माणूस ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगत होता. जातीयतेच्या भिंती नष्ट झाल्या होत्या. स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळाले होते. सर्व प्रकारच्या अंधरूढींना प्रतिबंध बसला होता. या सर्व सामाजिक बदलामुळे वर्णवर्चस्ववादी, धर्मांध, दांभिक लोक खवळले होते. बसवण्णांना खिंडीत गाठण्याची संधी शोधणाऱ्यांना शीलवंत लावण्याचे लग्न निमित्त झाले. दुसरीकडे बसवण्णा राजसत्तेला चिटकून आहेत, त्यांना अधिकाराचा मोह आहे. त्या अधिकारातूनच त्यांची कथित लोककल्याणाची कामे होतात, अशी टीका करणारी मंडळी कमी नव्हती. राजदरबारातील असंतुष्ट मंत्र्यांसह धर्ममार्तंड आणि पुजारी मंडळी असा विखार पसरविण्यात आघाडीवर होती. अशा सर्व टीकाकारांना बसवण्णांनी या
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




