सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.31

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.31

महात्मा फुले : साहित्य आणि चळवड

१८ त्या त्या धर्म संस्थेचेच प्रतिनिधी असतात. प्रेषित, पोप, घर्मपंडित व पुरोहित अशी अधिकारश्रेणी अस्तित्वात येते. ईश्वराच्या नावावर साळसुदपणे धर्माचा बाजार मांडला जातो. हे सर्व अनावश्यक व अनिष्टच नव्हे, तर पापमूलक व पाखंडीपणाचे आहे अशी पेन यांची धारणा होती. म्हणून त्यांनी या मायावी धर्मसंस्थेच्या मुळावरच घाव घालण्याचे धाडस केले. जुना-नवा करार हे धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत असणे कसे शक्य नाही ते त्यांनी निःशंकपणे दाखवून दिले. प्रॉटेस्टंट पंथीयांनी पोपशाहीविरुद्ध बंड पुकारले; पण बायबल आणि व्यक्तीची सदसद्विवेकबुद्धी यांचे प्रामाण्य त्यांनी स्वीकारले होते. पेन यांनी बायबलला फाटा दिला आणि सदसद्विवेकबुद्धीचा अधिकार मात्र अबाधित राखला. त्याबरोबरच त्यांनी सदसद्विवेकबुद्धीला तर्कबुद्धीची (reason) जोड दिली आहे. मात्र ही तर्कबुद्धी विज्ञानप्रवण असली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. जुन्या नव्या करारांतील अविश्वसनीय, अनैसर्गिक आणि अन्यायकारक कथांचे विश्लेषण करून या कथांमुळे ईश्वराच्या सर्वोच्चपदाचे किती अवमूल्यन होते ते त्यांनी ‘The Age of Reason’ या आपल्या ग्रंथात बिनतोडपणे दाखवून दिले आहे. जगत्पिता परमेश्वर जर एकच आहे, तर त्यांनी व्यक्त केलेले आपले मनोगत त्यांनी घोषित केलेले शुभवर्तमान यांचा आशय नक्कीच एक असला पाहिजे. पण वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांची भाषा व मतप्रणाली यात खूपच तफावत आहे. म्हणून हे ग्रंथ असंख्य सत्प्रवृत्त लोकांनी शतकानुशतके पवित्र व पूजनीय मानले असले, तरी ते ईश्वरप्रणीत आहेत असे समजणे बरोबर नाही. परमेश्वर हा एक आहे. तो न्यायी व समदर्शी आहे. म्हणून ईश्वरप्रणीत ग्रंथ जर कोणता असेल तर तो एकच असला पाहिजे, इतकेच नव्हे, तर तो नित्य प्रगट असला पाहिजे. सर्व काळांतील, सर्व देशांतील लोकांना तो वाचता आला पाहिजे; त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. असा ग्रंथ सुदैवाने प्रत्यक्ष आपल्यासमोर आहे. तो पुरातन काळापासून सर्वांना उपलब्ध आहे. परमेश्वराने निर्माण केलेली सृष्टी हाच तो ग्रंथ होय. त्यात बनावटपणाला वाव नाही. त्यापसून कुणी कुणाला वंचित करू शकत नाही. खऱ्या ईश्वरनिष्ठांचा (Deists) एकमेव पवित्र ग्रंथ सृष्टी हा आहे.
शंत्यांचे बायबल आहे. पेन हे खगोलशास्त्राचे अभ्यासक होते. त्यात कसा

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button