सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.27

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.27

महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ

१४ धर्माशी तुलना करून निर्णय करावा असे वाटले. तशा बुद्धीने खिरती धर्माचा अभ्यास करताना त्यात आमच्या धर्माप्रमाणेच कितीएक गोष्टींवर संशय न घेता केवळ विश्वासानेच त्या घ्याव्या लागतात असे दिसून आले. त्याजवरून आम्हा खिस्ती धर्माचा अभ्यास करणाऱ्या मित्रमंडळींचा इत्यर्थ असा ठरला की, ज्याअर्थी कितीएक गोष्टींमध्ये मतभेद आहे व त्यांशी सर्वांचा मेळ पडत नाही. तेव्हा कोणताही धर्म प्रत्यक्ष ईश्वराने दिलेला असेल असे म्हणवत नसेल. ज्या गोष्टीत सर्व धर्माची मूलतत्त्वे सारखी मिळतात व ती सद्सद्विचारशक्तीस अनुसरून आहेतच, तो जो स्वाभाविक धर्म तो सर्वत्र लागू असल्यामुळे तो मात्र खरा. त्या धर्माचा सारांश इतकाच की, एक ईश्वर आहे, त्याची भक्ती करावी व सर्वत्र मान्य अशी जी नीतितत्त्वे त्या धोरणाने वर्तन करावे व मुख्य सिद्धांत परोपकार हे पुण्य व परपीडा हे पाप हा साधारण धर्मविचार ठरला. त्यामुळे खिस्ती होण्याचा बेत रहित झाला. हा विचार ठरण्यास कै. बाबा साने आमच्या एका मित्राचे वडील यांचा विशेष उपयोग झाला. १५ त्यानंतर लवकरच इ. स. १८४५ मध्ये बाळा गोपाळ जोशी हा पुण्याचा ब्राह्मण तरुण ख्रिस्ती होऊन डॉ. मरे मिचेल यांच्याबरोबर मुंबईस राहण्यास गेला. इ.स. १८४६ मध्ये रे. जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला.

पेन यांची धर्मचिकित्सा

हिंदू समाजातील सनातनी लोक आणि खिस्ती धर्मोपदेशक यांचा झगडा चालूच होता. परंतु स्वतंत्रपणे विचार करणारे काही नवशिक्षित तरुणही महाराष्ट्रात होते. खिस्ती धर्मातील तथ्यांश ग्रहण करण्याची त्यांची तयारी होती. परंतु विल्सन, स्टिव्हेन्सन प्रभृति धर्मोपदेशकांच्या प्रचाराला बळी न पडण्याची त्यांनी दक्षता घेतली होती. त्यांच्यापैकी काही नास्तिक होते, काही अज्ञेयवादी होते, तर काही सृष्टिजन्य ईश्वरी विद्येचा पुरस्कार करणारे होते. हिंदू व खिस्ती समाजातील या विचारप्रवाहांचे विरोधक पुष्कळदा या निरनिराळ्या मतप्रणालींची

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button