महात्मा फुलेसाहित्य आणि चळवळ क्रमशा.19

महात्मा फुलेसाहित्य आणि चळवळ क्रमशा.19
शाळांतून कोणत्याच घर्माचे शिक्षण द्यावयाचे नाही असे ठरले. मात्र निधर्मीपणाचा हा निर्बंध विद्यालयाच्या चार भिंतीपुरताच मर्यादित राहिला. सरकारी शिक्षणसंस्थांतील ब्रिटिश अध्यापकांची ख्रिस्तीधर्मावर अढळ श्रद्धा होती. विद्यालयाबाहेर शहरात खिस्ती धर्मोपदेशकांची जी जाहीर भाषणे-प्रवचने होत, ती ऐकायला जाण्यास आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची नेहमीच मूक संमती असे. एल्फिन्स्टन इन्स्टिट्युटमधील विल्यम हेंडरसन, डॉ. जॉन बेल आणि पुण्याच्या इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक डी. ए. इज्देल यांचे आपल्याला धर्म प्रचाराच्या कार्यात अप्रत्यक्षपणे पुष्कळच साह्य होत आहे असे डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या एका भाषणात अगत्यपूर्वक नमूद केले आहे.
पुण्यातील संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर कॅन्डी यांना खिस्ती धर्मसंस्थांच्या कार्याविषयी आस्था होती. इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी त्यांनी ‘भाव कोणावर ठेवावा याचा विचार’, ‘खरा मार्ग कोणता?’ ‘खऱ्या धर्माची चिन्हे’ इत्यादी पुस्तिका लिहून दिल्या होत्या. जेम्स मिचेल, मरे मिचेल, कॅन्डी, एज्देल या सर्वांशी जोतीरावांचा चांगला परिचय होता आणि त्यांचे विचार आणि कार्य यांची छाप जोतीरावांच्या मनावर पडल्याखेरीज राहिली नाही. आपल्या विचारांना परिपक्वता कसकशी येत गेली ते सांगताना त्यांनी “पुण्यातील स्कॉच मिशनचे व सरकारी इन्स्टिट्युशनचे ज्यांच्या योगाने मला थोडेबहूत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यमात्राचे अधिकार कोणते हे समजले” अशा शब्दांत खिस्ती धर्मोपदेशक आणि सरकारी विद्यालयातील अध्यापक व अधिकारी यांचे ऋण प्रांजळपणे
मान्य केले आहे.
ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी होणाऱ्या चर्चेमधून जोतीरावांची धर्मजिज्ञासा जागृत झाली. त्या काळी शहरात राहणाऱ्या काही बहुजनसमाजातील विद्यार्थ्यांच्या वाचनात हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, भक्तिविजय इत्यादी धर्मग्रंथ येत असत. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर जुन्या सनातनी परंपरेचे संस्कार होत असत. अशा तन्हेचे धार्मिक संस्कार जोतीरावांच्या मनावर झाल्याचा उल्लेख त्यांच्य लेखनात आढळत नाही. उलट त्यांच्या आयुष्यातील एका विशिष्ट घटनेमुळे अगदी संस्कारक्षम वयातच त्यांचे लक्ष खिस्तप्रणीत मानवतावादाकडे वेधले गेले होते. त्यांची मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर यांना बालपणीच वैधव्य आल्याने त्यांनी उदरनिर्वाहासाठी जॉन नावाच्या खिस्ती
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




