सोशल

शरणागाथा क्रमशा.19

शरणागाथा क्रमशा.19

पतंजलींनी अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यातलाच हा एक. ते सांगतात, वीतरागी महामानवांना आपला चिंतनाचा विषय बनवा. महामानवांच्या चारित्र्याचे, त्यांच्या विचारांचेच चिंतन करा. हे पुस्तक आपल्याला अशा वीतरागी महामानवांची ओळख करून देते. या पुस्तकातील शरणांची चरित्रे अधिक सविस्तर आहेत. खूप जीव ओतून लिहिलेली आहेत.

चन्नवीरची भाषा सोपी आहे. ती वर्तमानपत्री भाषा आहे. आजवर त्याच्या गाजलेल्या रिपोर्ताज आणि लेखांसारखीच यातली भाषाही ओघवती आहे. एका पत्रकाराने हे पुस्तक लिहिलेले असल्या मुळे त्यात विद्वतेचा बडेजाव नाही. कठीण शब्द नाहीत. कन्नडमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण झालेला चन्नवीर गेल्या वीस वर्षांहून जास्त काळ मराठी दैनिकांत काम करतोय. बहुदा तसा तो एकमेव मराठी पत्रकार असावा. त्यामुळे या दोन भाषांच्या संस्कृतींना जोडण्याचे काम त्याच्याकडून आपसूक होत राहते. या पुस्तकाच्या निर्मितीतही त्याचे हे वेगळेपण लक्षात येते. लिंगायत परंपरेतली सगळे संदर्भसाहित्य हे कन्नडमध्ये आहे. त्यामुळे चन्नवीर या मूळ संदर्भाचा आधार घेऊनच मांडणी करतो. त्यासाठी तो मराठी किंवा इंग्रजीत अनुवाद झालेल्या संदर्भावर अवलंबून राहत नाही. पत्रकार असल्यामुळे चन्नवीर शरणांच्या इतिहासात रमतोच. पण, तो त्याला आजच्या काळाशी जोडून घेतो. आजच्या काळाच्या संदर्भात लिहिलेल्या शरणांच्या छोट्या चरित्रांचा संग्रह, असे या पुस्तकांचे स्वरूप सांगता येईल.

गेल्या साठ वर्षांत बसवण्णांचा, त्यांच्या अनुयायांचा आणि त्यांच्या लिंगायत धर्माचा इतिहास नव्याने शोधण्यात आलाय. या परंपरेतला विद्रोह खऱ्या अर्थाने अधोरेखित होऊ लागला आहे. आजही बंडखोर वाटणारे विचार जवळपास आठ नऊ शतकांआधी फक्त मांडणेच नाही तर समाजात प्रत्यक्षात उतरवण्याचे काम बसवण्णांनी केले. आंतरजातीय लग्न लावले. सर्व प्रकारचे सुतक नाकारले. त्यात मासिक पाळीचे सुतकही होते. त्यांनी वेद नाकारले, पुराणे नाकारली. जात नाकारली. वर्ण, आश्रम, संस्कार, मुक्ती, पुनर्जन्म, मूर्तिपूजा इतकेच नाही तर कर्माचा सिद्धांतही नाकारला. हे सारे नाकारून एक नीती आणि तर्काच्या आधारावर उभी असलेली जीवनशैली दिली. खरे तर त्यांनी काही नाकारले नाही. त्यांनी दिलेल्या धर्मामुळे जुन्या गोष्टी आपोआप मागे पडल्या. तेव्हाची ही क्रांती आजच्या विज्ञानयुगात अधिक ‘रिलेवण्ट’ ठरतेय. पण आजच धर्माच्या आणि जातीच्या नावावर पुन्हा एकदा तमोयुगात ओढून नेण्याचे काम सर्व धर्मांतल्या कट्टरतावादी शक्ती करत आहेत. त्यामुळे बसवण्णांचा

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button