शरण गाथा क्रमशा.15

शरण गाथा क्रमशा.15
मधुवरस आणि शीलवंत या तिघांनाही हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. समतेच्या लढाईतले ते पहिले शहीद ठरले. विषमतेच्या धर्माच्या सैनिकांनी एकेका शरणाला वेचून वेचून ठार मारलं. रक्ताचे पाट वाहिले. वचन जाळण्यात आली. अनुभव मंटपाला आग लावण्यात आली. क्रांतीला प्रतिक्रांतीने संपवण्याचा प्रयत्न झाला. त्या अत्याचारांची सैराट सिनेम तिल्या शेवटाशी तुलना करून त्याची भीषणता आजच्या संदर्भात पहिल्यांदा दाखवून दिली ती ज्येष्ठ संपादक आणि वारकरी विचारांचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी, हे इथे नमूद करायला हवे. या तुलनेचा प्रभाव इतका आहे की, आज अनेक
ठिकाणी शरणांच्या कत्तलीचं वर्णन करताना सैराटचा उल्लेख हमखास केला जातो. कर्नाटकातल्या संस्कृतीचा मुख्य प्रवाह लिंगायत विचार आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा मुख्य प्रवाह वारकरी विचार आहे. गेल्या तीस चाळीस वर्षांत झालेल्या अभ्यासाने या दोन्ही विधानांविषयीच्या शंका-कुशंका दूर केलेल्या आहेत. या दोन्ही परंपरांचा सुटा सुटा विचार करता येतोच. तसा तो नेहमी केला जातोही. पण सुंदर वेणी बांधावी तसे हे दोन्ही विचार एकमेकांत गुंफले गेलेले आहेत. स्वतंत्रपणे अभ्यास करूनही या दोन्ही परंपरा समजून घेता येतातच. पण या परंपरांचा सहसंबंध समजून घेताना अनेक शतकांचा दख्खनचा इतिहासच डोळ्यासमोर सलग उभा राहतो.
त्यामुळेच चन्नवीर भद्रेश्वरमठ आजच्या पिढीचा पत्रकार ‘शरणगाथा: कल्याणपर्वातील निवडक शरणांच्या कथा’ या पुस्तकात बसवण्णांच्या सहकाऱ्यांचा परिचय करून देतो तेव्हा त्याला आठवण होते ती महाराष्ट्रातल्या वारकरी संतपरंपरेतल्या मांदियाळीचीच. चन्नवीरच्या शहरात म्हणजे सोलापुरात त्याला कटिंगच्या दुकानात सेना महाराजांचं चित्र दिसतं. तेच दुकान लिंगायताचं असेल तर अप्पणांचा फोटो आवर्जून असतो. हे निरीक्षण तो पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या मनोगतात नोंदवतो. त्यावरच त्यांचे मतही महत्त्वाचे असते, ‘जातविरहित समाजाची निर्मिती केलेल्या या धुरिणांच्या जाती शोधण्यात आल्या आणि त्यांच्याभोवती चिरेबंदी भिंती उभारण्यात आल्या. संत आणि शरणांचा अभ्यास करताना ही बाब प्रकर्षाने जाणवते.’
राज्याची निर्मिती ही भाषेच्या आधारावर करण्यामागे अनेक महान नेत्यांची सद्भावना आणि सहज पटण्यासारखी कारणे आहेत. पण त्यामुळे आज भाषेच्या अतिरेकी अस्मितेतून देशातले वेगवेगळ्या भाषा बोलणारे समाज आजवर कधीच नव्हते तेवढे दुरावलेले दिसतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गोवा या चार
राज्यांच्या सीमा आज आहेत तशा इतिहासात क्वचितच असाव्यात. ही चारही




