राज्यातील तेलुगु भाषिकांच्या आग्रहास्तव

राज्यातील तेलुगु भाषिकांच्या आग्रहास्तव
महाराष्ट्र राज्य तेलुगु भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना
राज्य निमंत्रक डॉ. गोवर्धन सुंचू, राज्य अध्यक्ष-श्रीनिवास (भाऊ) संगा यांची निवड सोलापूर- महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, धाराशिव, पुणे, मुंबई, भिवंडी, संगमनेर, अ.नगर, इचलकरंजी, नांदेड, नाशीक, जालना, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर, मालेगांव तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतील सर्व तेलुगु भाषिकांच्या आग्रहानुसार महाराष्ट्र राज्य तेलुगु भाषिक एकता संघर्ष समितीची स्थापना करुन महाराष्ट्र राज्य निमंत्रक पदी डॉ. गोवर्धन सुंचू व महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्रीनिवास (भाऊ) संगा यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच लवकरच महाराष्ट्र राज्य तेलुगु एकता संघर्ष समितीची राज्यातील सर्व तेलुगु समाज बांधवातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित करुन महाराष्ट्र राज्य तेलुगु भाषिक कार्यकारिणी जाहिर करण्यात येईल.
तेलुगु भाषिकांसाठी तुर्तास प्रमुख मागणी राहणार आहे. तेलुगु भाषिक
आर्थिक महामंडळ स्थापन करणे व १००० कोटी रुपये अनुदान तेलुगु भाषिकांसाठी महामंडळास मंजूर करणे.
अल्पभाषीक समाजातील सर्व सवलती मिळाव्यात.
SBC व OBC साठी सवलती कायम ठेवाव्यात.
तेलुगु भाषिकांना वीज कमी व माफक दरात मिळावेत.
तेलुगु भाषिकांना GST मध्ये सवलत मिळावी.
राज्यातील महिला विडी कामगारांना तेलंगणाच्या धर्तीवर किमान ३०००/-
पेन्शन महाराष्ट्र शासनाकडून मिळावा.
महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त प्रमाणात तेलुगु बिडी कामगार काम करीत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन धुम्रपान कायदयातून विडी उद्योग वगळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करावे.
तसेच तेलुगु भाषिकांसाठी शिक्षण क्षेत्रात आरक्षण वाढवून मिळावा.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोलापुर शहर जिल्हयात नवीन उद्योग निर्माण करण्याठी प्रयत्न व्हावेत.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले यंत्रमाग कल्याणकारी महामंडळास त्वरीत स्थापना करावे व यंत्रमाग कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून पेन्शन मंजुर करुन मिळावा.
समितीचे निमंत्रक डॉ. गोवर्धन सुंचू, राज्यअध्यक्ष श्रीनिवास (भाऊ) संगा, व समितीचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्यातील तेलुगु भाषिक असलेल्या भागात भेटी देऊन नवीन कार्यकारिणी लवकरच जाहिर करण्यात येईल या पत्रकार परिषदेत तिपण्णा गणेरी, अंबादास देवरे, गोविंदराज एकबोटे, नागप्पा कनकी, बालाजी श्रीचिप्पा, देविदास गुंडेटी, हणमंतु सायबोळु, बालाजी जक्का, वेणुगोपाळ म्याना पंतुलु, रामुलु पोतु, राजु झंपाल, भास्कर तमनूर, शंकर द्यावरकोंडा आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
आपले विनित,
निमंत्रक डॉ. गोवर्धन सुंचू
राज्य अध्यक्ष-श्रीनिवास (भाऊ) संगा महाराष्ट्र राज्य तेलुगु भाषिक एकता संघर्ष समिती, सोलापूर

