सोशल

बहुसंस्कृतीकता हीच मानवी समाजाची खरी ओळख आहे.

बहुसंस्कृतीकता हीच मानवी समाजाची खरी ओळख आहे.

कोणताही समाच एकरगी असू शकत नाही. गुच्छामध्येही विविधरंगी फुलं असली तरच गुच्छ अ दिसतो. जगण्यात रंगच नसतील जर आयुष्य बेरंग होऊन जाईल. हेच परिधारीत मंडळी सांगत आहेत. शिवाय ते आठजण आहेत. लिंगायत तत्त्वज्ञानाचा गाभ असलेल्या अष्टावरणाचे प्रतिनिधीत्त्वही करतात. पार्श्वभूमीला पृथ्वीची प्रतिमा आहे पृथ्वी वगळता अद्याप इतर कोणत्याच ग्रहावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळाल नाहीत. समस्त मानवी समूहाच्या समष्टीचा विचार महात्मा बसवण्णा आणि शरणान सांगितला आहे. शरणांच्या या कथा वैश्विक मूल्यांची शिकवण देतात. माणूसकीचा संदेश देतात. शरणांच्या वचनांतील आशय सागराहून अथांग आहे. म्हणूनच माणूस आणि माणूसकी जपायच्या, सकल जिवात्म्यांच्या कल्याणाचा ध्यास घेतलेल्या बसवण्णांच्या बॅकग्रॉउंडला पृथ्वीचा नकाशा दिसतो.

शरणांनी सर्वसामान्य लोकांना समजेल-उमजेल अशा सोप्या भाषेत जीवनतत्त्वज्ञान सांगणाऱ्या ‘इन्सानियत का खजाना’ म्हणून यथार्थ गौरव केल्या जाणाऱ्या वचन साहित्याची निर्मिती केली. शरणांचे चरित्र समजून घेतांना इतर कोणत्याही साधनांपेक्षा विश्वासार्ह साधन म्हणून वचनांचा आधार घेण्यात आला आहे. शिवाय वचनांच्या पानांवर महात्मा बसवण्णा आणि शरणांच्या प्रतिमाही सापडले आहे. बसवादी शरणांची साहित्य आणि चेहऱ्यानेही ओळख करून देण्याचे श्रेय वचनाच्या पांनाना जाते. वचनांशिवाय शरणांच्या कथांना पूर्णत्त्व येणार नाही, ही शरण साहित्य अध्यासनाची धारणा आहे. म्हणून पूर्ण कव्हरच्या बॅकग्राऊंडला वचन असणे स्वाभाविक आहे.

एकूणच बसवयुगाच्या शरणांच्या कथा सांगताना त्यांचा एकमेकांशी असलेला अनुबंध अधोरेखीत करण्याचा प्रयत्न अमित रोडगे यांनी अत्यंत कल्पकतेने केल्याचे दिसून येईल. लेखक शंभर शब्दात जे सांगू शकरणार नाही ते चित्रकार एका रेषेत सहज सांगून जातो या उक्तीला सार्थ ठरवत अमितअण्णा यांनी अत्यंत कमी वेळेत हे मुखपृष्ठ साकारल्याबद्दल शरण साहित्य अध्यासन आणि लेखक म्हणून मी व्यक्तिशः त्यांचे आभारी आहे.

१८ । शरणगाथा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button