सत्यशोधक समाज स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

सत्यशोधक समाज स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन.
सत्यशोधक समाजाच्या 151 व्या स्थापना दिनानिमित्त ,महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ तर्फे सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्सव. सत्यशोधक बंधू-भगिनींनो ,जय सत्यशोधक .आधुनिक भारताच्या इतिहासात शूद्राती शुद्रांच्या ,अर्थातच बहुजनांच्या जीवनाची पहाट ज्या दिनामुळे आली, तो दिवस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाज स्थापनादिन. अर्थातच 24 सप्टेंबर. 1873
भारतातील तमाम चळवळीची मातृ संघटना म्हणजेच सत्यशोधक चळवळ .सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चळवळीमुळे भारतीय संविधानाची बीज पेरल्या गेलीत .अर्थातच सत्यशोधक समाज म्हणून आपल्या सर्वांची ही नैतिक जबाबदारी आहे. की आपण हा दिवस सण उत्सवासारखा साजरा करायला पाहिजे.
चला तर मग आपण सर्व एकत्रित येऊन ,सत्यशोधक समाजाची सप्तसूत्री समजून घेऊ या ,त्यांचा आपल्या जीवनात अंमल करूया. गुलामीला जुगारून देऊन मुक्त आत्मविश्वासयुक्त व अधिक सुंदर जीवन जगूया.
यासाठी स्वतःसाठी जगता, जगता, कुटुंबासाठी समाजासाठी , व एकमय राष्ट्रासाठी सुद्धा झटू या.
कार्यक्रमाध्यक्ष :डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ. यवतमाळ.
मा. प्रा. काशिनाथ लाहोरे ,महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ .
मा.डॉक्टर विलास काळे निर्देशक महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ .
प्रमुख उपस्थिती :- माननीय एडवोकेट अरुण मेत्रे अध्यक्ष ज्योतिबा दिनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ.
प्रा सविताताई हजारे महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ.
मा नीताताई दरणे . सत्यशोधक महिला अध्यापक विचार मंच यवतमाळ
मा. सविता ताई कावलकर अध्यक्ष सावित्रीबाई फुले महिला मंडळ यवतमाळ.
मा.महेंद्र पिसे अध्यक्ष क्रांतीसुर्य युवा मंच यवतमाळ.
सत्यशोधक गीत गायन :-ललिता वाघ ,सुनीता काळे, अनिता गोरे ..
प्रस्तावना:- प्रा. दीपक वाघ अध्यक्ष सत्यशोधक स्टडी सर्कल यवतमाळ.
आभार :-मा. मायाताई गोरे संचालिका महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ.
संचलन :- प्रा नम्रताताई खडसे अध्यक्ष सत्यशोधक महिला अध्यापक विचार मंच. यवतमाळ.
वेळ:- सायंकाळी (सहा तीस) .6:30 वाजता .मंगळवार.दिनांक 24 सप्टेंबर 2024 .
स्थळ :-महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ मोहाफाटा यवतमाळ . सत्यशोधक समाजाच्या तसेच फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या मान्यवरांनी सदर कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे

