महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः 11

त्यातून हा कालखंड हिंदू संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा असल्याने नानात-हेचे निकराचे वैचारिक संघर्ष ह्याच वेळी सुरू होते. त्यामुळे भाषेच्या बदलत्या रचनेला फरफटत नेणारी अर्थरचनेची विलक्षण धार फुल्यांच्या गद्यशैलीला आलेली दिसते. वाक्यांमधील पदरचना आणि वाक्यांवाक्यांमधील कृत्रिम साखळ्या नव्या अर्थसंभाराला अनुरुप करून नवे विचार व नवी तर्कपद्धती मराठी गद्यात व्यक्त करण्याच्या किती विविध पद्धती फुल्यांनी अवलंबिल्या हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. परंतु उदाहरण म्हणून खालील उतारा पहा. ह्यातील इंग्रजी पल्ल्याचे वाक्य आणि मराठीची लय मधूनमधून व्यक्त करणारी पदरचना अभ्यसनीय आहे. परंतु त्याचबरोबर इंग्रजी वसाहतवादाचा निषेध, सूक्ष्मलक्षी तपशीलापुरता राजकीय व सांस्कृतिक दृष्टिकोन, सूक्ष्म उपहास, स्वदेशी अर्थशास्त्राचे महत्त्व, श्रमिक संस्कृतिला दिलेले महत्त्व, स्वातंत्र्यमूल्य, करूणा आणि एकूण संस्कृतिव्यापक दृष्टी इत्यादी नानाविध पातळ्यावरून विचार करण्याची फुल्यांची शैली मुख्यतः पाहण्यासारखी आहे
“पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेते असत, व ज्यांचा आपले शेतीवर निर्वाह होत नसे, ते आसपासचे डोंगरावरील दऱ्याखोऱ्यातील जंगलातून उंबर जांबूळ वगैरे झाडांची फळे खाऊन व पळस, मोहा इत्यादी झाडांची फुले, पाने आणि जंगलातून तोडून आणलेला लाकूडफाटा विकून पट्टीपासोडीपुरता पैसा जमा करीत व गांवचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गाया व दोनचार शेरड्या पाळून त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपआपल्या गावीच रहात असत. परंतु आमचे मायबाप सरकारचे कारस्थानी युरोपियन कामगारांनी आपली विलायती अष्टपैलू अक्कल सर्व खर्ची घालून भले मोठे टोलेजंग जंगलखाते नवीनच उपस्थित करून, त्यामध्ये एकंदर सर्व पर्वत, डोंगर टेकड्या, दरीखोरी व त्याचे भरीस पडित जमिनी व गायराने घालून फॉरिस्ट खाते शिखरास नेल्यामुळे दीनदुबळ्या पंगु शेतकऱ्यांचे शेरडाकरडास या पृथ्वीचे पाठीवर रानचा वारासुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही. त्यांनी आता साळी, कोष्टी, सणगर, लोहार, सुतार वगैरे कसबी लोकांच्या कारखान्यात त्यांचे हाताखाली किरकोळ कामे करून आपली पोटे भरावीत तर इंग्लंडातील कारागीर लोकांनी रुचीरुचीच्या दारू बाटल्या, पाव, बिस्कुटे, हलवे, लोणची, लहानमोठ्या सुया, दाभण, चाकू, कातऱ्या, शिवण्याची यंत्रे, भाते, शेगड्या, रंगीबेरंगी बिलोरी सामान, सूत, दोरे, कापड, शाली, हातमोजे, पायमोजे, टोप्या, काठ्या, छत्र्या, पितळ, तांबे, लोखंडी पत्रे, कुलपे, किल्ल्या, डांबरी
[22/9, 15:31] LGSushant: केला असेल! तसेच सत्यशोधक तत्त्वज्ञानाच्या पायाभूत तत्त्वज्ञानावरही त्यांनी भाष्य केले असेल !
सत्यशोधक समाजाची १९११ ते १९३० पर्यंत राज्यात आणि कर्नाटक राज्यात एकंदर १३ अधिवेशने संपन्न झाली. यानंतर १९३०, १९४० आणि १९५० साली समाजाची तीस वर्षांत अवघी तीन अधिवेशने भरली. असे असले तरी प्रस्तुत तिन्ही अधिवेशनांचे संयोजक भास्करराव जाधव हेच होते. भास्करराव जाधव यांच्या हयातीतील समाजाचे सोळावे अधिवेशन ‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ मे १९५० रोजी कोल्हापूर येथील पॅलेस थिएटरमध्ये पार पडले. या प्रसंगी भास्करराव जाधव ८३ व्या वर्षी अंथरुणाला खिळून होते. अशाही विपरीत परिस्थितीत त्यांचे ‘राम राम पाव्हणं’ हे भाषण त्यांचे एक पुत्र अप्पासाहेब जाधव यांनी वाचून दाखविले. या भाषणाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. या कडव्या सत्यशोधकाने आयुष्याच्या शेवटपर्यंत कोल्हापूर येथील शाहू कापड मिलचेच कापड वापरले. या कडव्या सत्यशोधकावर पुणे येथील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या ग. म. नलावडे यांनी प्रसंगी त्यांच्यावर एकांगी कडवट टीका केली. प्रस्तुत कडवट टीका जाधवरावांनी पचविली.
दलित बहुजन समाजाची समूळ सुधारणा व्हावी या उद्देशाने महात्मा फुले यांचा हा शागीर्द आयुष्यभर कार्यरत राहिला. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांना पक्षाघाताच्या आजाराने जर्जर केले. डोळ्याला काचबिंदू झाला. अशाही परिस्थितीत त्यांनी समाजाचे सोळावे अधिवेशन सफल केले. शेवटी दिनांक २६ जून १९५० रोजी हा बिनीचा सत्यशोधक कोल्हापूर मुक्कामी इहलोकाची यात्रा संपवता झाला. त्यांच्या निधनाने दुःखी होऊन ‘दीनमित्र’ पत्राने अत्यंत दुःखी अंतःकरणाने मृत्युलेख लिहून त्यांच्यात वसत असलेल्या अजातशत्रुत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले.
संदर्भ- १) सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ-१९३३-संपादक – माधवराव बागल, २) शाहू महाराजांची माणसे-कृ. भा. बाबर, ३) मराठा शिक्षण परिषदेचा इतिहास, १९४१-संपादक जयवंत जगताप, ४) सत्यशोधक समाज परिषद- अ.भा. व कार्यवृत्तांत, संपादक – प्राचार्य गजमल माळी, ५) सत्यशोधक समाज प्रबोधन पत्रिका – संपादक- जयवंत गुजर, ६) दीनमित्र अंक – ५ जुलै १९५०
सत्यशोधकांचे अंतरंग / १८१




