महत्तम फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.६

(बावीस)
शंभर वर्षातली परंपरा अधिक रुष्ट झालेली दिसते. फुल्यांवरील ह्या अन्यायाचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून तर स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत म्हणजे १८७० पासून तर सुमारे १९६० पर्यंत मराठी वाङ्मयीन संस्कृती प्रायः जातीय होती हे आहे. फुल्यांची वाड्मयीन प्रतिमा पुसट करुन टाकण्याकडे ह्या काळातील जातीय संस्कृतीचा कल दिसतो. चक्रधर, नामदेव, तुकाराम, लोकहितवादी यांना उचलून धरणाऱ्या समर्थ पंथीय भाषिक वा जातीय परंपरा मराठी समाजात होत्या म्हणून हे प्रतिभावंत गाडले गेले नाहीत. ह्या उलट फुल्यांना उचलून धरणारी कोणतीच समर्थ परंपरा महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षांत टिकली नाही. आधुनिक काळातल्या बहुतेक सर्व मराठी पुढाऱ्यांना आपापल्या जातीचे भरपूर पाठबळ मिळालेले दिसते.
परंतु फुले, वि. रा. शिंदे ह्या प्रतिभाशाली पुढाऱ्यांना मात्र असे पाठबळ मिळालेले दिसत नाही. हे पुढारी ज्या जातीत जन्मले त्या जातींना सांस्कृतिक भान फारसे नसावे किंवा फुल्यांपुरता येथे विचार करायचा असल्याने असेही म्हणता येईल की, खुद्द फुल्यांची निर्दय विवेकानिष्ठा ह्याला कारणीभूत आहे. बुवाबाजीचा अंशही त्यांच्या प्रखर व्यक्तिमत्वात नव्हता. हिंदुस्थानातील जातीय समाजरचना म्हणजे अजूनही स्थिरावलेल्या मोठमोठ्या रानटी टोळ्यांसारखी असून गुलामी संस्कृतीमुळे निकराचा वैचारिक लढा देणाऱ्या फुल्यांसारख्या व्यक्तींच्या आविष्काराला ह्या समाजात कसा आकार दिला जाईल याला काहीच नियम नाहीत.
आधुनिक समाजात भाषिक बंधुभाव सर्वप्रथम महत्त्वाचे तत्त्व मानले जाते, परंतु आपल्यासारख्या गुलामी संस्कृतीतल्या मागासलेल्या लोकांना रानटी टोळ्यांचे जातीय तत्त्वच अधिक प्रिय असल्याचे आजही दिसते. सारांश, जोतीराव फुले आणि त्यांच्या काळातली ब्राह्मणी वाड्मयीन परंपरा यांच्यात विपर्यस्त संबंध निर्माण झालेले असले तरी आज ह्या दोन्ही घटकांना एकाच वाङ्मयीन संस्कृतीचे व एकाच कालखंडाचे घटक म्हणून पाहिले पाहिजे, कारण शैलीच्या अभ्यासकाच्या दृष्टीने ह्या दोन्हींत द्वंद्व नाही. एकाच कालखंडात शैलीचे द्वंद्व असू शकत नाही. सबंध कालखंडात एकाच विशाल शैलीतत्त्वाचे सर्वव्यापी अस्तित्व शक्य असते.
महाराष्ट्राला व पर्यायाने हिंदुस्थानाला सुमारे एक हजार वर्षांपासून विवेकनिष्ठेची परंपरा नाही. तत्पूर्वीच्या संस्कृत, प्राकृत, पाली, अर्धमागधी वगैरे भाषांमधल्या विवेकनिष्ठ परंपरा दहाव्या शतकाच्या आधीच आटून गेल्याचे दिसते. बाराव्या शतकानंतरच्या देशी भाषांमध्ये पूर्वीच्या भाषांमधल्या विवेकनिष्ठ परंपरा भाषांतरित होऊ शकल्या नाहीत आणि भावनाप्रधान काव्यपरंपरेला अतोनात ऊधाण आलेले दिसते. अशा समाजात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन व स्कॉटिश6
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




