सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापिताचे राजकारण क्रमशा.89

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापिताचे राजकारण
क्रमशा.89

आगमणामुळे भारतावर औद्योगिक क्रांतीचे पडसाद उमटले. ब्रिटिशांच्या शासन काळात ओबीसी, दलित यांच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेला तडा गेला औद्योगिकिकरण, आधुनिक तंत्रज्ञानामुळे बलुतेदारी, आलूतेदारी तसेच इतर पारंपरिक व्यवसायाचा हास झाला. ओबीसी दलित देशोधडीला जाऊन आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने पूर्णतः उद्वस्त झाले.

ब्रिटिश सत्तेमुळे ओबीसीचे अर्थकारण पूर्णतः बदलले. पारंपरिक व्यवसाय संपुष्टात येऊन अक्षरशः ओबीसीला रस्त्यावर तर दलित दिशाहीन झाले. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे तंतोतंत पालनच नव्हे तर पारायण दलितांनी केले त्यामुळे शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन त्याचा गावोगावी प्रचार प्रसार करून ते प्रवाहात येण्यासाठी सतत धपडपडत राहिले याचा त्यांच्या आर्थिक, सामाजिक जीवनात सुधारणा होण्यास उपयोग झाला मात्र राजकीयदृष्टीने अपेक्षित यश मात्र मिळू शकले नाही) जमीनीच्या मालकी पूर्वी पासून क्षत्रिय समाजाच्या ताब्यात होत्या. ओबीसीकडे फक्त पारंपरिक पिढीगत व्यावसायिक कौशल्य होती. ही उत्पादक कौशल्यही ब्रिटिशांच्या आगमनानंतर कालबाह्य झाली. नवीन कौशल्य पहिल्या पिढीला घेणे शक्य नव्हते.

त्यामुळे पहिली पिढी रस्त्यावर आली आणि शहरात मिळेल ते काम करण्यासाठी बाहेर पडली. ओबीसीचा हा जीवन जगण्याचा संघर्ष स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची धडपड कुठेही नोंदवली गेली नाही की, त्यावर अभ्यास झाला नाही. ओबीसीमधील लोहार, सुतार, कुंभार, चांभार, माळी, तेली वंजारी, बंजारा, वडार, कैकाडी अशा एक नव्हे शेकडो जाती पोटाची खळगी कशी भरत होते आणि पोराबाळाचे अश्रू कसे पुसत होते? यावर कोणत्याही लेखकाने, विचारवंताने एक विचारधारा म्हणून चिंतन केले नाही.

अगदी याला ओबीसी बौद्धिक वर्गही अपवाद नाही. सगळे विचारवंत, अभ्यासक ब्राह्मणवादावर तुटून पडले होते. ब्राह्मणवाद संपला म्हणजे सामाजिक न्यायाचे तत्व आपोआप रुजेल असा विश्वासच जणू सगळ्या बुद्धीवाद्याचा होता, अजुनही आहे. भारतातील सगळ्या समस्यावर उत्तर ब्राम्हण्यवाद निर्मूलन असा समज आहे. दलित- ब्राम्हण, बहुजन- ब्राम्हण, हिंदू – मुस्लिम असा वैचारिक लढा गेल्या अनेक शतकाचा आहे. जातीच्या श्रृंखलात जखडलेला ओबीसी मात्र सामाजिक अन्याय, शोषण यामध्ये पिचला असूनही राजसत्तेपासून ते बुद्धिवंतापर्यंत कोणीही याकडे गांभीर्याने पहिले नाही.

गेल्या अनेक शतकापासून ब्राह्मणी वर्चस्वाचा लढा सुरु आहे. यामध्ये दलित, ओबीसी, कर्मठ ब्राम्हण सोडून सगळे उच्चवर्णीय या लढ्यात सामील होऊन ब्राम्हणी वर्चस्वाला शह देत आहे. वैचारिक मंथनापासून रस्

लढाई लढली आहे, लढत आहे. पण ब्राह्मणी वर्चस्व का संपुष्टात आले नाही याबाबत नव्याने मांडणी करणे गरजेचे आहे. खरं तर चार वर्णामध्ये एकच वर्ण सगळ्यावर वर्चस्व गाजवतो असे समजणे अज्ञान आणि अंधश्रद्धा असण्यासारखे होय असे वाटते. वर्चस्वाच्या स्पर्धेत पूर्वी पासून दोन वर्ग आहेत ब्राम्हण आणि क्षत्रिय. आज ही जागा ब्राम्हण आणि क्षत्रिय वर्णातून निर्माण झालेल्या जाती यांनी घेतलेली दिसते. यात प्रादेशिक विभिन्न जातीचा समावेश होऊ शकेल. ब्राम्हण आणि क्षत्रिय जाती यांनी वेळप्रसंगी हातात हात घालून ओबीसी, दलित जातींचे शोषण तर केलेच पण या जाती राजकीय, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या आपले भक्ष्य कसे राहतील यांची व्यवस्था करून ठेवली. आध्यत्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या ब्राम्हण यांची तर राजकीय, आर्थिक दृष्ट्या क्षत्रिय जाती, व्यापारी जाती यांच्या गुलामी तर मानसिक अंधत्व जाणीवपूर्वक निर्माण केले. त्यामुळे ओबीसी हा कायम ब्राम्हण आणि क्षत्रिय जाती यांच्या वर्चस्ववादी प्रवृत्ती, भावनिक आवाहन, चतुर विचारसरणीचा बळी आहे. केवळ ब्राम्हणी प्रवृत्तीनेच ओबीसी, दलित यांचे शोषण केले असे म्हणणे, समजणे म्हणजे त्यांच्या चतुर षडयंत्राच्या चक्रव्यूहात अडकणे होय. त्यामुळे ओबीसी विचारवंताने ब्राम्हणी आणि क्षत्रिय

जातीच्या षडयंत्राचा अभ्यास करून तशी मांडणी होणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात प्रत्येक जात अधिक आत्माभिमानी होत आहे.

जातीय संघटनातून उभे राहणारे संघटनं न्यायिक भूमिकाची सत्यता पडताळणी यापेक्षा लाभाचे गणिते जुळवत आहे. जाती वर्ग अंताकडे न जाता जातसमर्थनात व वर्चस्ववादी राजकारणाकडे जात आहे. पूर्वी अन्यायाच्या न्यायिक भूमिका, स्वअस्तित्वाच्या असुरक्षित भावनेतून जातीय संघटना उभ्या राहिल्या होत्या. हल्ली या अशा संघटना उभ्या राहत असताना त्यांची सुप्त भावना काय आहे ? यावर संशोधन होणे आवश्यक आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरण यामुळे वाढत जाणारी बेरोजगारी याचा फायदा संघटन वाढीसाठी करून जातीय अस्मितेला खतपाणी घातले जात आहे का? यावर चिंतन हवे. कोणत्याही समाजास जातीय भावनेची ठिणगी पेटवून त्याचा लाभ नक्कीच लाभदायक असणार नाही. अलीकडे वैचारिक भूमिका दबावात्मक दिसून येते ही भूमिकाही बदलणे आवश्यक आहे.

□□□

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

89

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button