मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 86

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
86
मर्यादा ओलांडल्याचे कारण देत मराठ्यांना आरक्षण नाकारले. या अपयशानंतर, मराठ्यांनी आपली रणनीती बदलत, वेगळ्या
आरक्षणाची मागणी बाजूला ठेवून थेट ओबीसी कोट्यात (१९%) कुणबी असल्याचा दावा करत आरक्षणाची मागणी केली. जरांगे-पाटील यांच्या गैरराजकीय नेतृत्वाखाली ‘गरजवत’ मराठ्यांना मोठ्या प्रमाणावर एकत्रित करण्यात आले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जरांगे-पाटील यांनी पहिल्यांदा, निजाम काळात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले. नंतर, या मागणीचे स्वरूप बदलले आणि संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजांच्या काळात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होऊ लागली. अखेरीस, संपूर्ण राज्यभरातील ‘सरसकट’ मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे अशी मागणी रेटून करण्यात आली. म्हणूनच इथे प्रथमतः मराठा-कुणबी जातीच्या समूहाच्या इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेणे आवश्यक आहे.
मराठा-कुणबी जात समूह
मराठा साम्राज्यातून पुढे आलेल्या मराठा या प्रादेशिक ओळखीचे रूपांतर ब्रिटिश काळात एका जातीत झाले. सुरवातीला जेव्हा ब्रिटिशांनी त्यांचे रेस (वंश) किंवा ट्राईब (आज आपण ज्यांना आदिवासी म्हणतो) असे वर्गीकरण केले तेव्हा त्यानी मराठ्यांमध्ये दोन वर्ग पहिले शहाण्णव कुळी मराठ्यांचा अभिजन राजेशाही वर्ग आणि आणि पशुपालक आणि शेतकरी कुणबी जातींनी बनलेला सामान्य वर्ग, समाजशास्त्रीय दृष्ट्या कुणबी ही एकाच वेळी व्यावसायिक, वर्गीय, आणि जातीय ओळख आहे. शेती हा व्यवसाय अनेक जाती करत असल्यामुळे कुणबी ही जात एक खूप छिद्रे असलेल्या चाळणीसारखी आहे. यात इतर खालच्या जातींनी समाविष्ट होणे शक्य होत आलेले आहे. हेच विधान मराठा जातीसाठीही लागू होते. मराठा जातीत प्रवेश करून कुणबी जातीतील अनेकांना त्यांचे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक जातीच्या उतरंडीतील स्थान वरती नेता आले. या उतरंडीत वरचे स्थान पटकावण्याची चढाओढ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिगेला पोहोचली. त्याचे एक महत्वाचे कारण ब्रिटिशांनी सुरू केलेली जातिय जनगणना हे होते. दुसरे महत्वाचे कारण महाराष्ट्रात गाजलेला वेदोक्त-पुराणोक्त’ वाद हे होते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून क्षत्रिय असल्याचा दावा करून वेदोक्त मंत्रोच्चारणाची मागणी केली होती. पण महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी ते शूद्र असून त्यामुळे त्यांच्यासाठी
पुराणोक्त मंत्रोच्चारणच हे ठासून सांगितले.
तेव्हापासून मराठा ही ‘जातीय’ ओळख म्हणून घट्ट होत गेली आणि त्यात सुरवातीला शेतीवर उदारनिर्वाह करणाऱ्यांचा आणि स्वतःची ब्राम्हणेतर म्हणून ओळख असलेल्यांचा एक मोठा गट सामील झाला. परंतु, हळू हळू क्षत्रिय ओळख मिळवण्याची अभिलाषा इतकी तीव्र होत गेली की ब्राम्हणेतर ओळख व जात्यंताचे समाजकारण व राजकारण मागे पडले. आणि गंमत म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरवातीला मराठ्यांमधील उच्चभ्रू वर्गाने कुणबी म्हणून ओळख सांगणाऱ्यांना त्यांनी कुणबी ओळख न सांगता मराठा ओळख सांगावी म्हणून भरपूर प्रयत्न केले, जसे प्रयत्न आज मराठा नेते त्यांच्या जात बांधवांनी मराठा ऐवजी कुणबी ओळख सांगावी म्हणून करत आहेत. स्वातंत्र्यानंतर मराठे खऱ्या अर्थाने राज्यकर्ती जमात झाले आणि अनेक कुणबी मराठे झाले.
पण आजही शहाण्णव कुळी मराठ्यांची कुटुंबे मोजकीच आहेत. मराठा जाती अंतर्गत असलेल्या उतरंडीच्या तळाशी असलेला जो मोठा गट आहे त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिति मात्र तोळा मासाच आहे. पण त्याचे जे जाती अंतर्गत नाते आणि सामाजिक संबंध आहेत त्यातून त्यांना मराठा जातीकडे असलेल्या सामाजिक व राजकीय सत्तेचा थोडासा का होईना फायदा होतोच. त्यामुळेच जातीच्या अंतर्गत उतरंड असूनही महाराष्ट्रात मराठे हे अजूनही एक मजबूत आणि मोठी राजकीय शक्ती आहेत. शिवाजी महाराजांपासून सुरवात
झालेल्या मराठ्यांच्या इतिहासातून त्यांना क्षत्रिय ओळख मिळाली आहे. शेतकरी ही ओळखही यात महत्वाची होती. पण फुल्यांकडून आलेला ब्राम्हणेतरांचा वारसा मात्र आता उरलेला नाही. जरांगे-पाटलांच्या मागणी खातर गेल्या सप्टेंबर महिन्यात शिंदे सरकारने न्या. शिंदे समिती स्थापन केली. संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठे मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत याचा शोध घेण्याचे काम या समितीकडे आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे ज्यांच्याकडे कुणबी असल्याची ओळख नाही त्यांच्या मागासलेपणाची शहानिशा करण्याचे काम शिंदे सरकारने दिले आहे. परंतु नवी मुंबई पर्यंत आलेल्या मराठ्यांच्या अवाढव्य मोर्चाने सरकारला अधिसूचना काढण्यास भाग पाडले, समिती आणि आयोगाने त्यांचे काम संपवण्यापूर्वीच.
सगे सोयरेः एक विरोधी संकल्पना
अधिसूचनेच्या मसुदयाने ‘सगे सोयरे’ ही एक नवीन संकल्पना पुढे आणली आहे. या मसुदयानुसार कुणब्यांचे सगे सोयरे कुणबी जातीच्या
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




