सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 83

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
83
सत्यशोधक शाखेला दान दिली. या शिष्टमंडळात चव्हाणही होते.
जागा उपलब्ध झाल्यावर सत्यशोधक नियोजित समाज भुवनासाठी चव्हाण आणि विष्ठ्ठल बिराजी डोणे यांनी सतत तीन महिने कोल्हापूर संस्थानातील खेडोपाडी फिरून व्याख्याने दिली. या उपक्रमातून ५०० रुपये उभे राहिले. या शाखेकडे १९१४ साली ५४६ रुपये जमा होते; परंतु या जमा रकमेत नियोजित इमारत बांधून होत नसल्याचे पाहून चव्हाण, डोणे आणि श्रीपतराव चव्हाण यांनी खाजगी सावकाराकडून पगारावर कर्ज काढून इमारत निधी उभा करून इमारत बांधली! इमारत पूर्ण झाल्यावर या समज भुवनात पुरोहित शाळा, ग्रंथालय आणि आठवड्याच्या सत्यशोधक व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. १९१५ सालात या नूतन समाजमंदिरात सत्यशोधकांनी अस्पृश्य मंडळींसह सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला
इ. स. १९११ च्या एप्रिल महिन्यात अधिवेशन चळवळीला प्रारंभ झाला. या चळवळीतही चव्हाण सक्रिय राहिले. सहावे अधिवेशन १९१६ साली बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे संपन्न झाले. हे अधिवेशन सफल करण्यासाठी चव्हाणांचे निपाणीला काही दिवस वास्तव्य राहिले. पुढे १९२३ साली मलकापूर तालुक्यातील वारखेडे येथे प्रांतीय पहिले सत्यशोधक अधिवेशन भरले. या अधिवेशनाला चव्हाण कोल्हापूर येथून आवर्जून उपस्थित राहिले.
हरिभाऊ चव्हाण यांनी कोल्हापूर येथून ‘हंटर’ पत्र सुरू केले. या पत्राचे एक- दोन अंक प्रकाशित झाल्यावर हे पत्र त्यांनी अॅड, खंडेराव बागल यांच्याकडे सुपूर्द केले. इ. स. १९३३ साली माधवराव बागल यांनी ‘सत्यशोधक हीरक महोत्सव’ ग्रंथ प्रकाशित केला. कोल्हापूरहून प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाच्या समितीत चव्हाण एक सदस्य होते. या सत्यशोधक ऐतिहासिक ग्रंथात चव्हाणांचे कोल्हापूर सत्यशोधक चळवळीवरील दोन लेख समाविष्ट केलेले आहेत. या लेखांमुळे कोल्हापूर सत्यशोधक चळवळीवर चांगला प्रकाश पडतो. तसे तर चव्हाणांनी विपुल सत्यशोधकी लेखन केले आहे. त्यांनी महात्मा फुले चरित्र (ओवीबद्ध) लेखन केले आहे. तसेच ‘ब्राह्मण्य जातीवर नाही (१९१७)’, ‘आमचे वडील कावळे व स्वर्गातील संतांची परिषद (१९२७)’, ‘अंत्येष्टी व श्राद्ध (१९२८)’, ‘वांग्यातील भूत’ (१९२८), ‘रामदास तुकारामांची भेट’, ‘भ्रष्ट ब्राह्मण श्रेष्ठ’, ‘व्रतांचे वंड – भाग १ ला’, ‘विधीमार्ग भाग १ व २’, ‘पुराणातील गडबडगुंडा’ आदी ग्रंथ चव्हाणांच्या नावावर आहेत. तसेच ‘जलशांकरिता कवितासंग्रह’ आणि
‘भटांचा घुला’ या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. तसेच कोल्हापूरकर सत्यशोधक दासराम यांच्या ‘ब्राह्मणाहून न्हावी श्रेष्ठ’ या पुस्तिकेचे ते प्रकाशक आहेत. तसेच त्यांनी सात-आठ स्वतंत्र निबंधांचे लेखन केले होते. प्रस्तुत निबंध अप्रकाशित आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी हरिभाऊ चव्हाण, आपले पुत्र चंद्रराव चव्हाण यांच्याकडे बडोदा राज्यातील नवसारी येथे वास्तव्यास गेले. नवसारी येथे हरिभाऊ चव्हाणांचे २५ नोव्हेंबर १९३८ रोजी निधन झाले. हरिभाऊ चव्हाणांच्या निधनाने सत्यशोधक समाजाचा एक सच्चा, निर्लेप सत्यशोधक कार्यकर्ता हरपला. संदर्भ १. सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ १९३३ – संपादक – माधवराव बागल, २. सत्यशोधक दासराम डॉ. छाया पोवार व डॉ. विलास पोवार, ३. पंढरीनाथ पाटील चरित्र ना. जा. दांडगे, ४. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य – डॉ. अशोक चोपडे, ५. राष्ट्रवीर, वेळगाव, दिनांक २ डिसेंबर १९३८, पृ. ३, ६. डॉ. भारत नार्वेकर, अध्यक्ष, सत्यशोधक समाज शाखा, कोल्हापूर यांची भ्रमणध्वनी मुलाखत
चव्हाण
दलपतसिंह
(जन्म १९०४)
अमरावती येथून दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ या साप्ताहिकाचे संपादक दलपतसिंह चव्हाण (आय. ए. जर्मनी) हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एक सत्यशोधक होत. पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या ‘महात्मा फुले’ ग्रंथापासून प्रेरणा घेऊन दलपतसिंह चव्हाण यांनी महात्मा फुले यांचे त्रोटक चरित्र १९२७ साली प्रसिद्ध केले.
‘ज्योति, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्रावर त्रोटक निबंध, नवमतवाद असे पल्लेदार शीर्षक असलेल्या २३ पृष्ठांच्या या पुस्तिकेत सामान्य व्यक्तित्व लाभलेल्या जोतीराव फुले यांचे कार्य असामान्य, अद्वितीय असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. तसेच बहुजनांनी क्षत्रिय-वैश्य वर्णाचा डौल न मिरवता अस्पृश्य बांधवांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अस्पृश्यता
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




