ओबीसी आरक्षण वाचवायचे असल्यास खोट्या खाडाखोड करुन केलेल्या कुनबी नोंदी रद्द करायलाच हव्यात.

ओबीसी च्या बातम्या
2) ओबीसी आरक्षण वाचवायचे असल्यास खोट्या खाडाखोड करुन केलेल्या कुनबी नोंदी रद्द करायलाच हव्यात.
त्या रद्द होण्याचे चित्र अज तरी कुठेही दिसत नाहीत.
नेतृत्वांनी पक्षाचे मफलर फेकून दिले पाहिजे.
सामान्यांनी नेतृत्वास जिथे मिळेल तिथे मराठा समाजास कुनबी नोंदीतून केल्या गेलेल्या इंट्रीबाबत जाब विचारला पाहिजे.
पक्षाची चादर पांगरुन मतासाठी आल्यास ओबीसीतूनचे दिलेले दाखले रद्द करुन या.
ओबीसी बांधवांनी,
हा लढा कुणा एकाचा नाही.
माझं ह्या लढ्यातील योगदान…
माझं, माझ्या कुटुंबातील एकाचेही मत मराठा आणि प्रस्थापित वर्गातील उमेदवारास देणार नाही.
जो ओबीसी आरक्षणाचा मारक ठरला तो यापुढे काहीही केले तरी सभागृहात जाता कामा नये.
कुनबी नोंदीतून ८०% मराठा समाजास ओबीसीत आणले. मा मंगेश ससाणे, मा. प्रकाशआण्णा शेंडगे यांनी त्याविरोधातील याचिका फेटाळली जावी असे राज्यसरकारवतीने निवेदन दिले.
सरकारचे खायचे दात ओळखा.
बीजेपी, काॅंग्रेस, दोन्ही सेना व दोन्ही राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण संपविण्याच्या प्रश्नावर एकमत आहेत.
त्यांना तुम्हाला संपवायचेय.
तुम्ही संपण्याअगोदर त्यांचे राजकीय अस्तित्व आपल्या ओबीसी मतामुळे संपवायला हवे.
माझा नेता, माझा पक्ष म्हणून त्यांचेसोबत राहिलात तर
आपल्या विवेकशुन्यतेमुळे, आपल्या तात्पुरत्या फायद्यामुळे, स्वत:पुरते बघण्याच्या वृत्तीमुळे, आपल्या आरक्षाणबाबत अज्ञानीपणामुळे, अगदी बेजबाबदारपणामुळे पुढील पिढीची गुलामी ओढवून घेणार हे नक्की.
ही पुढील पिढीस गुलामी येवू द्यायची नसेल तर,
येते अडीच महिने तुमच्या हातात आहेत.
एकाही ओबीसी बांधवाने, अगदी मायक्रोतील मायक्रो ओबीसी बांधवाने आपले मत केवळ ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रामाणिक कार्य करणार्या ओबीसी बांधवास द्यावे.
सभागृहात तुमच्या मताशिवाय कुणीही जावू शकत नाही.
मतरुपी दुध पाजलेल्यांनी आरक्षणरुपी डंका मारला.
त्यावर औषध ओबीसीचे मत ओबीसीलाच.
मा. प्रकाशआण्णा शेंडगे साहेब आणि सहकारी दोन वर्ष सातत्याने यावर आपले सर्वस्व पणास लावून लढत आहेत.
मा. प्रा. लक्ष्मण हाके, मा. नवनाथ वाघमारे, मा अॅड मंगेश ससाणे यांनी प्राणांकित उपोषण करुन थोडं थोपविले आहे.
सत्तेत असुनही मा. छगन भुजबळ साहेब, मा. गोपिचंद पडळकर साहेब आणि काही प्रयास करत आहेत.
या सर्वांनी मिळून कुनबी नोंदी रद्द करुन दिलेले दाखले थांबवावेत.
नाही झाले तर
सामान्य ओबीसींनी ओबीसी पक्षाच्या छताखाली येवून ६०% मताच्या जोरावर
सत्ता स्थापन करुन, सत्तेच्या जोरावर जसे अन्यायी आदेश काढले ते सर्व अन्यायी आदेश सत्तेच्या जोरावरच रद्द करु.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

