मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 68

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
68
महाराष्ट्रातील मराठा राजकारण ते आरक्षण : एक अन्वयार्थ
डॉ. किरण गायकवाड
प्रस्तावना
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाची सुरुवात खरे तर मुंबई प्रांत निर्मिती म्हणजे १९५६ सालापासून झालेली आहे, त्यानंतर द्विभाषिक राज्य व नंतर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठीचे जन आंदोलन त्यामधून महाराष्ट्रातल्या जनतेला राजकीय प्रक्रियेचे भान आलेले दिसते. एक मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी या राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास इतर राज्यांच्या इतिहासापेक्षा सर्वाथाने वेगळा आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण एक प्रभावी व्यक्तिमत्व होऊन गेले. १९८० च्या दशकापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर काँग्रेस पक्षाची जी मजबूत पकड होती, तिला कारणीभूत यशवंतरावांचे नेतृत्वच होऊन गेलेले आपल्याला दिसून येते. महाराष्ट्राचे राजकारण समजून घ्यावयाचे झाल्यास आपल्याला सुरुवातीच्या काँग्रेस वर्चस्वाचे राजकारण, त्यानंतर आघाड्यांचे राजकारण आणि नंतर अस्मितांचे राजकारण महाराष्ट्रामध्ये घडून आले हे समजून घ्यावे लागेल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक स्थित्यंतरे घडली ती समजून घ्यावी लागतील परंतु हे मुद्दे समकालीन महाराष्ट्राचे राजकारण समजून घेण्यासाठी पुरेसे असलेले दिसत नाहीत. समकालीन महाराष्ट्राचे राजकारण समजावून घेण्यासाठी नवीन संदर्भाचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये स्थानिक संदर्भ महत्त्वाचे आहेत. आघाड्यांच्या राजकारणातून स्थानिक राजकारण आणि स्थानिक राजकारणामध्ये प्रभावी असणारे जातीगट वेगवेगळ्या जाती गटांचे वेगवेगळे हितसंबंध असल्यामुळे अनेक जाती गट आपले हितसंबंध जोपासण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडून येत आहेत व तो बदल म्हणजे जातीय अस्मितेच्या माध्यमातून अनेक जाती गट सत्तेमध्ये वाटा मिळवण्यासाठी राजकारणावर
प्रभाव पाडत आहेत हा होय. महाराष्ट्र मध्ये पूर्वी पुरोगामी विचारांचे राजकारण केल्या जात असे, परंतु समकालीन परिस्थितीमध्ये राखीव जागांचा किंवा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातींचे राजकारण होत असलेले दिसत आहे. समकालीन परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन, ओबीसी समाजाचे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजास समावेश करू नये यासाठीचे आंदोलन, धनगर समाजाचे एसटी प्रवर्गामध्ये समावेश होण्यासाठीचे आंदोलन, तर आदिवासी समाजांचे एसटी प्रवर्गामध्ये इतर जातींना समावेश करून घेण्याला विरोधाचे आंदोलन, एस सी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्यासंबंधी मातंग किंवा मांग या जातींचे आंदोलन इत्यादी आंदोलने प्रामुख्याने आरक्षणाच्या मागणीसाठी किंवा विरोधासाठी महाराष्ट्रामध्ये घडून येत असलेली दिसून येतात. १९८० च्या दशकानंतर उत्तर भारतामध्ये झालेल्या आरक्षणाच्या आंदोलनाने तेथील राजकारणामध्ये स्थित्यंतर घडवून आणले. अभिजन वर्गाकडे असणारी सत्ता मागासवर्गाकडे स्थलांतरित झालेली आपणास दिसून येते. उत्तर भारतामध्ये आरक्षणाच्या राजकारणातून अनेक राजकीय पक्षांचा उदय होऊन त्यांनी स्थानिक राजकारणाबरोबरच भारतीय राजकारणावर देखील प्रभाव पाडलेला दिसून येतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र असं स्थित्यंतर घडताना दिसून येत नाही. हे देखील महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेले दिसून येते.
मराठा राजकारण
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासूनच महाराष्ट्राचे राजकारण हे मराठा वर्चस्वाचे राजकारण म्हणून ओळखले जाते. खरे तर मराठा हा जातीवाचक शब्द नसून तो प्रदेश आणि भाषावाचक आहे. तसेच कुणबी हा शब्दही जातीवाचक नसून तो व्यवसाय निदर्शक आहे. समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र मराठा आणि कुणबी या दोन्ही शब्दाचा अर्थ बदललेला दिसून येतो. खरे तर ब्रिटिश शासन असतानाच राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळवण्यासाठी इथल्या स्थानिक जाती समूहांमध्ये स्पर्धा सुरू झालेली होती. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला शह देऊन सत्तेमध्ये वाटा मिळवण्यासाठी येथील ब्राह्मणेतर जातींनी एकत्र येऊन राजकारण केले पाहिजे, याची जाणीव ब्राह्मणेत्तर नेत्यांना होऊ लागली होती. महात्मा फुले यांच्या वैचारिक संघर्षामुळेच या जाणिवेला एक दिशा मिळालेली आपणास दिसून येते. सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषण याला ब्राह्मण
वर्ग कसा जबाबदार आहे याची सविस्तर चर्चा महात्मा फुलेंनी आपल्या लिखाणामध्ये केलेली आहे. महात्मा फुलेंच्या नंतर कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतरांच्या विकासामध्ये लक्ष घातलेले आपणास दिसून येते. छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंबामुळेच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व असणाऱ्या ब्राह्मण वर्गाला येथील ब्राह्मण्यत्तर मंडळींनी आव्हान दिलेले दिसते. या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमी मुळे संख्येने जास्त असलेला मराठा समाज येथील राजकारणामध्ये अग्रणी असलेला आपणास दिसतो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा संख्येने जास्त असलेला दिसतो आणि तो तसा आहे ही, पण नेमका किती आहे याची खात्रीशीर आणि ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. कारण ब्रिटिश कालखंडानंतर जातीनिहाय जनगणनाच झालेली नाही. १९३१ पर्यंत जातीनिहाय जनगणना होत होती. महाराष्ट्र मध्ये सद्या जी जातींची वेगवेगळी संख्या सांगितली जाते तिचा आधार हा १९३१ ची जातीनिहाय जनगणनाच आहे. १९३१ पासून जातीनिहाय जनगणनाच झालेली नसल्यामुळे मराठा समाजाची संख्या किती आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही काही अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे मराठा समाजाच्या संख्या बळांचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो. मराठा समाजाची निश्चित संख्या माहीत नसली तरीही एक मात्र निश्चित आहे की, इतर समाजाच्या तुलनेमध्ये मराठा समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचे वर्चस्व असलेले आपणास दिसते, आणि महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये मराठा समाजाला सारखेच जातभान किंवा जातीय अस्मिता असलेली दिसून येते.
महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ते पिछाडी
मराठा समाजाला मराठा समूह म्हणून आलेले जातभान हे ब्राह्मण- ब्राह्मणेत्तर संघर्ष मधून आलेल्या ब्राह्मणोत्तर चळवळी मधून आलेले दिसते. या चळवळी मधून आलेले है जातभान ब्राह्मण समाजाला विरोध म्हणूनच आलेले नाही तर आपण क्षत्रिय आहोत एकेकाळचे राजे, सत्तेचे हक्कदार आहोत ही स्वाभिमानाची जाणीव ही या जातभानामध्ये असलेली दिसते. क्षत्रियत्वाच्या दाव्यामुळे हिंदू समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या वर्णव्यवस्थेमध्ये आपोआपच हा समाज उच्च स्थानी असलेला दिसतो व त्या स्थानाबद्दल हा समाज आग्रही असलेला दिसतो. तसेच गाव गाड्यांमध्येही आपले स्थान मध्यवर्ती आहे याचीही जाणीव या जात भानामध्ये असलेली दिसून येते. त्यामुळे आपोआपच स्थानिक पातळीवर
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




