हरिभाऊ नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! सत्यशोधक शंकरराव लिंगे

हरिभाऊ नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! सत्यशोधक शंकरराव लिंगे
☘🌻🌼🌸🌺🪷🪻🥀🌹🌷💐🌾🪨🪸🍄🟫🍄
गेल्या आठदहा दिवसात समाज माध्यमांवर अनेकांना अचानक महात्मा जोतीराव फुले यांचा आठव येऊ लागला आहे. पाऊस भले लांबला असेल पण महात्मा फुले यांच्या नावाला सुगीचे दिवस आलेत. फुल्यांचा वारसा लोकांना वारंवार आठवणे हे चांगलेच आहे. फुले यांच्या नावाला आलेली ही भरती बघून मला खूपखूप आनंद होत आहे❗
काही प्रश्न मात्र आहेत.
१) जे आज महात्मा फुले यांच्या नावाचा जप करीत आहेत वा नामस्मरणाचा रतीब घालीत आहेत त्यातल्या किती लोकांनी महात्मा फुले व सावित्रीबाई समग्र वाड्मय किंवा त्यांची चरित्रं वाचली आहेत❓
२) महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राहत्या घराला आयुष्यात एकदा तरी भेट दिली आहे का❓
३) सावित्रीमाई यांचे माहेर असलेल्या नायगाव येथील स्मारक व शिल्पसृष्टी बघितली आहे का❓
४) प्रतिगामी शक्तीने जेव्हाजेव्हा महात्मा फुले सावित्रीमाई यांची बदनामी केली तेव्हा त्यांना सप्रमाण उत्तर द्यायला यातले कितीजण पुढे आले होते❓ बाळ गांगल, मनोहर भिडे, इंडीक टेलस आदींचा निषेध कुणी कुणी केला होता? तेव्हा जे या अपप्रवृत्तीविरुद्ध लढले निदान त्यांना पाठींबा तरी दिला होता का❓ मनोहर भिडे हा फुले देशद्रोही होते असे सतत बोलत असतो. सांगली जिल्ह्यात या भिड्याचे दोन राजकीय आश्रयदाते. (जे पुरोगामी पक्षाचे होते/ आहेत) त्यातले एक वारले. एक सध्या एका पुरोगामी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते परवा सावित्रीबाईंची बदनामी करणारासोबत तुम्ही कसे जाता वगैरे भंकस करीत होते. मालक, तुम्ही भिडेचे पोशिंदे. तुम्हाला तरी असे बोलणे शोभत नाही हो❗
५) समता भूमी म्हणजेच फुलेवाड्याची स्थिती १९६७ ते १९९२ उकिरड्यासारखी होती तेव्हा त्याचे भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी यातले कितीजण झटले होते❓
६) संसद भवनाच्या प्रांगणात महात्मा यांचा भव्य पुतळा उभा रहावा, त्यांच्या साहित्याचे सर्व भारतीय आणि महत्वाच्या जागतिक भाषांमध्ये भाषांतर व्हावे यासाठी यातल्या कोणी कोणी पुढाकार घेतला होता❓
७) भिडेवाड्याचा प्रश्न गेली ३० वर्षे प्रलंबित आहे. त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी कधीतरी यातल्या कुणी ब्र शब्द उच्चारला होता का❓ यासाठी आंदोलने करणे सोडा, साधे वाचकांच्या पत्रव्यवहारात चार ओळी तरी लिहिल्या होत्या का❓
८) त्यांचे साहित्य पाठ्यपुस्तकात यावे यासाठी किती बहुजन शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, महिला व पुरुष बुद्धिजीवी यांनी प्रयत्न केलेत❓
ही यादी आणखी खूप मोठी आहे.
ज्यांना आपले कर्तव्य आठवत नाही, जबाबदारी कळत नाही, ते उठसूठ कशाच्या आधारावर प्रमाणपत्रांचे घाऊक वाटप करीत सुटले असतील बरे❓
कुणाही उपटसुंभ किंवा सटरफटर फेबुविराने उठावे आणि फुले यांचा वारस कोण हे ठरवावे किंवा पुत्नामावशीचे प्रेम दाखवून फुले यांचे मालक व्हावे इतके फुले स्वस्त झालेत❓
आधी काही फुले विचार स्वतःच्या जगण्यात येऊ द्यावेत. त्या विचारांसाठी काही त्याग करावा. किमान एखादी तरी छोटी कृती करावी. मगच वारस असल्याचा किंवा मालकी हक्काचा दावा ठोकावा. नाही तर उगा देणं ना घेणं नी कंदील घेऊन उभं रहाणं❗
:- प्रा. हरी नरके
टीप: ही पोस्ट राजकीय नाही. तर सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रखर स्वपरीक्षण करणारी आहे. कृपया मलाच उलटे प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला विचारावेत.
शिवक्रांती टीव्ही तीन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


