मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 63

मराठा आरक्षण विरुद्ध एडवोकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
63
एका तपस्वी शम्बुकाचा रामाला शिरच्छेद करायला भाग पाडले तर महाभारत काळात गुरू द्रोणाचार्याने गुरुदक्षिणेत निषाद पुत्र एकलव्याला हाताचा अंगठा मागून त्याला प्रवाहपतित केले. तात्पर्य हिंदू धर्म संस्कृतीने शूद्रातिशुद्रांकडे कधीही भांडवल उपलब्ध
होणार नाही अशी तजवीज करून ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या हाती कधीही भांडवल आले नाही. जगात कारागीर आणि सेवेकरी वर्गातून अनेक उद्योजक, कॉर्पोरेट वा त्यांच्या उत्पादनाचे ब्रँड’ निर्माण झाले. उदाहरणार्थ पादत्राणे बनविणाऱ्या बाटा कंपनीचे मालक थॉमस बाटा हे झेक कॅनेडियन. त्यांचा तीन पिढ्यांपासून चर्मकराचा व्यवसाय होता. त्यातून त्यांनी बाटा’ हा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित केला. ६. भारतात मात्र जात बंदिस्त कारागीरांच्या कित्येक पिढ्या खपूनही असे काही होऊ शकले नाही. याचे कारण उच्चवर्णीयांकडून कारागीरांच्या होणाऱ्या आर्थिक शोषणात दडलेले आहे. या संदर्भात व्ही.आय. पावलोव्ह ‘द इंडियन कॅपिटलिस्ट क्लासः अ हिस्टॉरिक स्टडी’ या ग्रंथात नमूद करतात की,’ भारतीय उच्चजातवर्गाकडे आलेले भांडवल हे बौद्धिक संपदेतून वा कौशल्य कारागिरी, श्रमांतून आलेले नाही ते सर्व शोषण, सावकारी आणि फसवणूकीतून आलेले आहे. ‘७ त्यामुळे इथे भांडवल हे नेहमी उच्चजातवर्गाकडेच राहिले.
स्वातंत्र्योत्तर लोकशाही भारतात जातीव्यवस्थेमधून आर्थिक विपन्नावस्था प्राप्त झालेल्या कारागीर वर्गातील जाती समूहांना विकासाची समान संधी देणे, त्यांच्या हितांचे संरक्षण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘अशा मागास जातीसमूहांच्या उन्नतीचा मार्ग एससी, एसटी प्रमाणे राज्यघटनेतील अनुच्छेद ३४० मध्ये आधीच आखून ठेवला होता. ८ त्याचाच आधार घेऊन मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार सन १९९० मध्ये देशातील इतर मागासवर्गीयांना शिक्षण, प्रशासन आणि राजकारणात २७% आरक्षण लागू करण्यात आले तरी, त्याचा मूळ आधार हा संविधानातील निकषांनुसार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हाच होता. राज्यघटनेतील आरक्षणाशी संबंधित अनुच्छेद १४, १५ (४) व १६ (४) मध्ये कुठेही आरक्षणासाठी जात आणि आर्थिक मागासलेपणाचा आधार घेण्याची तरतूद नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली असली तरी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत उच्चवर्णीय समाजसुद्धा मागे राहणार नाही, याचीही पुरेपूर
काळजी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील अनुच्छेद ४६ मध्ये नमूद केले आहे की, ‘राज्य लोकांच्या विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना विशेष काळजीने प्रोत्साहन देईल आणि त्यांचे संरक्षण करेल. ‘१ अर्थात आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नसून तो प्रतिनिधित्वाचा, सामाजिक न्यायाचा कृती कार्यक्रम (Ac- tion Plan) आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आरक्षण ही समतलनाची प्रक्रिया (Leveling Process) आहे. निसर्गाने निर्माण केलेली अपघातवजा विषमतेची दरी कमी करून सामाजिक न्यायाची पुनर्स्थापना करण्याची ती कायदेशीर तरतूद आहे. क्षमता, सत्ता, गुणवत्ता इत्यादींबाबत माणसे असमान असतात. त्यामुळे केवळ निःपक्षपात, समान न्यायबुद्धी, आनुपातिक समानता, न्याय्य वाटणी या गोष्टी माणसांना समान प्रतिष्ठा, दर्जा व विशेषाधिकार मिळवून देण्याच्या दृष्टीने अपुऱ्या पडतात. म्हणून शोषित, पीडित समाजघटकांचा वेगळा विचार करून त्यांना विशेष सोयी, सवलती व संरक्षण देणे आणि त्याद्वारे स्पर्धेत उतरण्याची त्यांची क्षमता इतरांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करणे हा आरक्षणाचा मूळ उद्देश आहे. भेदभावाची बुद्धिगम्य कारणे’ या संज्ञेखाली देण्यात येणारी ती ‘संधीची समानता आहे. परंतु पोकळ क्षमता व गुणवत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या प्रस्थापितांनी सुरुवातीला आरक्षणाच्या संकल्पनेला ‘भीकेचे तत्त्वज्ञान’ म्हणून हिणवले. ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन च्या नावाखाली आरक्षणाच्या संकल्पनेला कडाडून विरोध केला. आरक्षित लोकांचा प्रचंड द्वेष केला. परंतु आरक्षणाच्या धोरणामुळे आरक्षित समाजाची जसजशी सामाजिक व आर्थिक उन्नती होण्यास सुरुवात झाली तसतशी बिगर आरक्षित समाजात एक प्रकारे असुरक्षिततेची भावना निर्माण व्हायला लागली. बिगर अरक्षित जात समुहात वृद्धिगंत होत असलेल्या असुरक्षित भावनेतूनच पुढे देशभरातील विविध राज्यांत आरक्षित विरुद्ध अनारक्षित असा एक अनामिक संघर्ष सुरू झाला, तो अजूनपर्यंत चालू आहे. विशेष हे की, मंडल आयोग लागू होईपर्यंत अनारक्षित जात समूहातील लोकांचा आरक्षणाला विरोध होता मात्र मंडल आयोगाची अंमलबजावणी होताच विरोधाचा सूर आरक्षणाच्या दिशेने वळला, कारण अनारक्षित जात समूहाला हे आता कळून चुकले होते की, आरक्षणाचे धोरण हे काही आता रद्द होणारे नाही. तेव्हा आपणच आरक्षणवादी बनून आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बगल दिली पाहिजे, या अनारिक्षतांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आरक्षणाच्या सामाजिक व्याप्तीची मागणी वाढली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




