सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 60

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
60

२३ जुलै १९१३ रोजी प्रकाशित झालेल्या मो. तु. वानखडे यांच्या ‘ब्राह्मण आणि बहिष्कार’ या ५६ पृष्ठांच्या पुस्तिकेचेही ते प्रकाशक आहेत. या पुस्तिकेला त्यांची दोन पानी प्रस्तावनाही दिली आहे.

थोडक्यात, विदर्भातील करजगावची पहिली सत्यशोधक समाजाची शाखा सतत चाळीस वर्षे खळखळत ठेवण्यात गणोरकारांचा मोठा सहभाग राहिला. संदर्भ – १. करजगावातील सत्यशोधक चळवळ सतीश जामोदकर, २. सत्यशोधक समाज परिषद अ. भा. व कार्यवृत्तान्त संपादक – प्राचार्य गजमल माळी, ३. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉ. अशोक चोपडे

गायकवाड
सयाजीराव
(११ मार्च १८६३-६ फेब्रुवारी १९३९)

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड तिसरे ऊर्फ गोपाळ काशीराव गायकवाड महाराज यांचा जन्म मौजे कवळणा, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे ११ मार्च १८६३ रोजी झाला. पुढे बडोद्याच्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांनी त्यांना दत्तक घेऊन २७ मे १८७५ रोजी महाराजांचे दत्तक विधान आणि राज्यारोहण झाले. याप्रसंगी त्यांचे सयाजीराव गायकवाड तिसरे असे नामकरण करण्यात आले. राज्यारोहणापर्यंत त्यांचे शिक्षण रखडलेले होते. मात्र, बडोद्याच्या गादीवर आल्याबरोबर ७ जून १८७५ सालापासून केशवराव पंडित व भाऊ मास्तर आदीनी त्यांच्या शिक्षणाची धुरा सांभाळली.

बडोदा येथील ‘लक्ष्मीविलास’ राजवाड्याच्या पायाभरणीस १० जानेवारी, १८८० रोजी प्रारंभ झाला. येथूनच सयाजीराव महाराजांचे लक्ष सत्यशोधक चळवळीकडे आकर्षिले गेले. १८९० साली ‘लक्ष्मीविलास’ राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले. सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार आणि मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी ‘लक्ष्मीविलास’ राजवाड्याच्या बांधणीस हातभार लावला होता. या राजवाड्याच्या बांधकामानिमित्ताने उपरोक्त दोन्ही

सत्यशोधकांशी चर्चा होऊन सयाजीरावांनी सत्यशोधक चळवळीचे महत्त्व जाणून घेतले होते. दरम्यान, १८८३ मध्ये कडवे सत्यशोधक रामचंद्र विठोबा धामणसकर हे बडोदा संस्थानात नोकरीस आल्यानंतर महाराज आणि धामणसकरांमध्ये सत्यशोधक तत्त्वज्ञानावर अधिकचा खल होत असे. सयाजीरावांच्या सूचनेवरून धामणसकर मुंबई येथे जाऊन सत्यशोधक रामजी संतुजी आवटे, दामोदर सावळाराम यंदे यांच्याशी वाटाघाटी करून ‘बडोदावत्सल’ नियतकालिक बडोदा येथे सुरू केले होते. यंदे आणि आवटे दोघेही सत्यशोधक असल्याने या पत्रात काही अंशी का होईना सत्यशोधक मताचा प्रचार-प्रसार होत असे. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर ‘बडोदावत्सल’ने जोतीरावांना ७ डिसेंबर १८९० रोजी ‘हिंदुस्थानातील मार्टिन ल्युथर’ म्हणून श्रद्धांजली अर्पित केली होती. इ. स. १८८४ सालात सत्यशोधक धामणसकर सुरसुभे (जिल्हाधिकारी) झाले. येथून पुढे चढत चढत जाऊन इ. स. १९०१ साली ते बडोदा राज्याचे दिवाण झाले. महात्मा फुले यांच्या या सच्च्या शागिदनि सयाजीराव महाराजांना फुले यांच्या समाजकार्याचे अथांगपण पटवून देऊन त्यांना बडोदे येथे बोलावून हृद्य सत्कार घडवून आणला. पुढे जोतीरावांनी बडोदा मुक्कामी महाराजांपुढे ‘शेतकऱ्यांचा असूड’ ग्रंथाच्या काही प्रकरणांचे वाचन केल्याचे सत्यशोधक इतिहास सांगतो. हा सत्कार खऱ्या अर्थाने सत्यशोधक चळवळीचा होता. पुढे जोतीराव निवर्तल्यावर वर्ष-सव्वावर्षाने महाराजांनी सावित्रीबाई फुले यांना तिमाही ५० रुपये मदत मिळेल, अशी तरतूद केली. तसेच जोतीरावांच्या निर्वाणानंतर त्यांचे उचित स्मारक करण्यासाठी महाराजांनी मदतीचा हात पुढे केला; मात्र हे स्मारक होऊ शकले नाही.

सयाजीराव महाराजांनी सत्यशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंद यांना विलायतेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. तसेच सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विलायती शिक्षणासाठी भरघोस शिष्यवृत्ती प्रदान केल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, या शैक्षणिक सवलतीनंतर दोहोंची भेट चौदा वर्षे होऊ शकली नाही. महाराजांच्या निधनानंतर डॉ. आंबेडकरांनी महाराजांवर ‘जनता’ (११-१२-१९३९) पत्रात एक स्फुट लिहून आदरांजली

वाहिली. दरम्यान, महीं विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या वतीने दिनांक २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे ‘अ. भा. अस्पृश्यता निवारण’ परिषदेचे आयोजन केले. या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हेच होते.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button