सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः53

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः53

तमाम सत्यशोधकांचे असले तरी या अधिवेशन आयोजनांचे काही अंशी श्रेय बळवंतराव कोल्हे यांच्याकडे जाते. तसेच बळवंतराव कोल्हे अधूनमधून रामोशी शिक्षण परिषदेलाही उपस्थित राहून मार्गदर्शन करत असत.

सत्यशोधक वळवंतराव कोल्हे अधूनमधून प्रासंगिक लेखन ‘दीनमित्र’ पत्रातून करत असत. व्यवसायाने गुत्तेदार असलेले बळवंतराव कोल्हे हयातभर सत्यशोधक समाजासाठी कार्यरत राहिले. त्यांनी सत्यशोधक पंढरीनाथ पाटील यांच्या सांगण्यावरून ‘तुम्ही तर ही फुले उधळीत आहात’ ही महात्मा फुले यांच्या अनुषंगाने एक स्मरण नोंद लिहिली आहे. ती अलीकडे ‘आम्ही पाहिलेले फुले’ ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे.

इ.स. १९३१ सालच्या जुलै महिन्यात बळवंतराव कोल्हे यांचे पुणे येथे निधन झाले.

संदर्भ – १. सत्यशोधक समाज परिषद अ. भा. व कार्यवृत्तांत, संपादक – प्राचार्य गजमल माळी, २०००, दीनमित्र अंक दि.५/०८/१९३१

खडसे हरिभाऊ आनंदराव (मृत्यू १९८४)

सत्यशोधक समाज आणि ब्राहाणेतर पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, हरीच्या जलशातील स्त्रीचा (नाच्याचा) अभिनय लीलया करणारे सत्यशोधक हरिभाऊ आनंदराव खडसे हे पिंपरी (पारगोठाण), तालुका आर्वी, जिल्हा वर्धा येथील एक सत्यशोधक होते. हरिभाऊ खडसे यांचे इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झालेले होते. तसेच त्यांच्या गावाजवळील बहादूरपूर धानोडी येथील सत्यशोधक पुरोहित शाळेचे ते एक विद्यार्थी होते. शेती व्यवसाय सांभाळून ते सत्यशोधक समाजाचे कार्यही करीत असत.

जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील सुप्रसिद्ध आद्य सत्यशोधक शाहीर भीमराव विठ्ठल महामुनीच्या जलशाचे (भीमपुराण) विदर्भात इ. स. १९०७ साली ठिकठिकाणी यशस्वी प्रयोग झाले. भीमरावांच्या जलशापासून प्रेरणा घेऊन अमरावती जिल्ह्यातील नायगाव येबील खुशालराव शिसोदे यांच्या प्रेरणेने त्यांचा

मुलगा गुलाबराव शिसोदे यांनी १९१७ ला सत्यशोधक जलसा उभा केला. हा नायगावकरांचा ‘हरीचा जलसा’ विदर्भातील आद्य जलसा असून संपूर्ण विदर्भात विख्यात झाला.

या विख्यात जलशाचे हरिभाऊ खडसे एक मान्यवर कलावंत होते. या जलशात ते ‘स्त्री’चा अभिनय करायचे, त्यांच्या असामान्य ‘स्त्री’ भूमिकेमुळे या जलशाला जनतेने नायगावच्या जलशाऐवजी ‘हरीचा जलशा’ म्हणून हाक मारणे पसंत केले. आरंभी शाहू महाराजांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील खासबागेत भरलेल्या

जलसा संमेलनात ‘हरीचा जलसा’ सहभागी झाला होता. हरिभाऊंनी याप्रसंगी आपल्या अभिनयाचे सुरेख दर्शन घडविले. पुढे १९२५ साली अमरावती येथे भरलेल्या चार परिषदांप्रसंगी ‘अमरावती’ च्या इंद्रभुवन थिएटरात ‘हरीचा जलशा’चा प्रयोग झाला. प्रयोग समाप्तीनंतर कोल्हापूरकर नरेश राजाराम महाराजांनी हरिभाऊंना विचारपीठावर जाऊन प्रेमाने आलिंगन दिले, तर कोल्हापूरकर एक सत्यशोधक बाबूराव यादव यांनी हरिभाऊंना ‘लोकमान्य’ ही पदवी याप्रसंगी बहाल केली, तर दुसरीकडे विदर्भात एके ठिकाणी या जलशाचा प्रयोग होत असताना सनातन्यांनी हरिभाऊ खडसे, गोविंदराव फुटाणे आणि गुलाबराव शिसोदे यांच्यावर फौजदारी दावा दाखल केला. या दाव्यात विदर्भवीर सत्यशोधक बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांनी हरिभाऊंचे वकीलपत्र घेतले. चार महिने हा दावा चालला. शेवटी हरिभाऊ, गोविंदराव, गुलाबराव आदी सत्यशोधक या खटल्यातून निर्दोष सुटले.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांत हरीच्या जलशाला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला. खरेतर हरिभाऊंनी या जलशाच्या माध्यमातून जवळपास पंचवीस वर्षे सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार केला. या कार्यासाठी त्यांनी प्रचंड खस्ता खाल्ल्या. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचे जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले. अशा या विदर्भातील आद्य जलसा कलावंताचे १९८४ ला त्यांच्या पिंपरी गावी निधन झाले.

संदर्भ- १. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य – डॉ. अशोक चोपडे, २. जागतिक कृषक क्रांतीचा विधाता – वीर उत्तमराव मोहिते

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button