सोलापूर

अखिल भारतीय माळी महासंघाची नाशिक येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक;

 

📢 दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

अखिल भारतीय माळी महासंघाची नाशिक येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक;


सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचे आवाहन

अखिल भारतीय माळी महासंघाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० ते ३.०० या वेळेत हॉटेल स्टेअर्न्स स्टे, पवार बँकेट हॉल, पेठ रोड, आर.टी.ओ. जवळ, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे (सोलापूर), विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकार (बुलढाणा), राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वस्त विठ्ठल तोडकर, प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षीरसागर (तुळजापूर), विश्वस्त भीमरावजी कोथिंबीरे (अहिल्यानगर), विश्वस्त तथा पुणे जिल्हाध्यक्ष अमर बोराटे (इंदापूर), राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभयजी तायडे (चिखली), बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयजी खरात, जालना जिल्हाध्यक्ष गणेशजी हरकळ तसेच भोकरदन तालुकाध्यक्ष श्रीहरी मगर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाशिक शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून संघटनात्मक कामकाजाचा आढावा व आगामी नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक अरुणभाऊ थोरात व प्रशांत दादाजी शेवाळे यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button