बेडा जंगम, बुडगा जंगम, माला जंगम समाजाविषयी आक्षेपार्ह विधानांचा निषेध; समाजाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

🟥 दिनबंधू न्यूज
बेडा जंगम, बुडगा जंगम, माला जंगम समाजाविषयी आक्षेपार्ह विधानांचा निषेध; समाजाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
सोलापूर | प्रतिनिधी
बेडा जंगम, बुडगा जंगम, माला जंगम समाज, जिल्हा सोलापूर यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे समाजाविषयी काही माध्यमे व सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या विधानांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
प्रसिद्धीपत्रकात समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असून संविधान व शासनाच्या नोंदीनुसार त्यांना मान्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. समाजाची परंपरा, इतिहास व सामाजिक योगदान याबाबत चुकीची माहिती पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना अनेक वर्षे विविध शासकीय कार्यालयांत वारंवार पडताळणी, चौकशी व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, मानवी हक्क आयोग तसेच शासनाच्या विविध आदेशांनंतरही अनेकांना न्याय मिळण्यात विलंब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकात समाजाची बदनामी करणारी वक्तव्ये त्वरित थांबवावीत, अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अफवा व खोट्या प्रचारापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे निवेदन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र हड्डंगेकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे
✍️ संपादकीय
कोणत्याही समाजाविषयी अपमानास्पद किंवा दिशाभूल करणारी विधाने करणे हे सामाजिक सलोखा बिघडविणारे ठरते. समाजातील वाद संवाद, कायदेशीर प्रक्रिया आणि पुराव्यांच्या आधारे सोडविणे हीच लोकशाहीची योग्य दिशा आहे. प्रशासनानेही अशा प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, हीच अपेक्षा.
🟥 दिनबंधू न्यूज
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801
👉 हा नंबर आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कॉमेंट करा • बेल आयकॉन दाबायला विसरू नका!






