मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः56

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाणे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः56
आहे की निराशा झाल्यानंतर, आणि जातीय अस्मितांची निरर्थकता जाणतू लागल्यानंतर, देशाला ‘एक’ करण्याच्या नावाने मुस्लिमविरोधाला धार देऊन हिंदुत्वाच्या अस्मितेचा विचार अजून पुढे ढकलता येतो. आसाममधील प्रादेशिक अस्मितेचे आंदोलन असो, वा या अगोदरचे मराठा अस्मितेचे, वा इतर राज्यातील जाट, गुर्जर, इ. अस्मितांचे, यांनी अंतिमतः भाजपलाच फायदा पोहोचवला आहे.
बेरोजगारीची भीषण स्थिती
आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा चर्चाविश्व व्यापले गेले आहे आणि कोट्यवधी युवकांच्च्या जीवनाची भीषण स्थिती झाकोळली गेली आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरणाने पक्क्या रोजगाराला जवळपास संपवले आहे. यामुळेच मुठभर सरकारी नोकऱ्यांकरिता प्रचंड संघर्ष निर्माण झालेला आहे. वार्षिक रोजगार वाढीचा दर १९८०-१९०० मधील अल्प अशा २ टक्क्यांवरून २०१०-२०२० मध्ये ०.२ असा अत्यल्प झाला आहे. ९ वर्षात २२ कोटी अर्ज प्राप्त जालेले असताना मोदी सरकारने फक्त ७ लाख रोजगार दिले आहेत. एकेका जागेकरिता ५ हजारापर्यंत अर्ज येणे ही आज सामान्य बाब झाली आहे आणि कोट्यवधी तरुण हताश होऊन मिळेल ते जुजबी काम करायला तयार आहेत हे धडधडीत वास्तव समोर आहे. जागाच नसताना आरक्षणाच्या मागणीला काय अर्थ उरला आहे?
ओबीसीचेच उदाहरण घेऊन गणित करुयात. काही शे जागा देऊ करणाऱ्या एम.पी.एस.सी. परिक्षेचा अर्ज भरणाऱ्यांची संख्या आता ४ लाखापर्यंत आली आहे. २०२२ मध्ये ४२० जागांकरिता ३.७ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. ४२० जागांपैकी २७ टक्के दराने ११३ जागा ओबीसींच्या वाट्याला येतात, जेव्हा की ३.७ लाख चे २७ टक्के (उदाहरणाकरिता असे मानूयात की तेवढ्याच ओबीसी उमेदवारांचे अर्ज आले, तरी) जवळपास १ लाख होतात. १ लाख लोकांमागे फक्त ११३ इतक्या नाममात्र जागा आरक्षणातून ओबीसी उमेदवारांना मिळत असताना, या ११३ जागांपैकी मराठा/कुणबी व ओबीसी अशी वाट्याची भांडणे चालू असताना जागाच नाहीत या वास्तवाला, नोकरीची संधी नाकारल्या जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या हिताला, रोजगार अधिकाराच्या मागणीला तिलांजली दिली जात आहे! खाजगीकरण, कंत्राटीकरण वाढवणाऱ्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना याची चांगलीच जाणीव आहे, आणि म्हणूनच मराठा व ओबीसी या दोन्ही आरक्षणाच्या बाजूने, आणि जातीय तणाव भडकावण्यात सुद्धा सर्वपक्षीय युती दिसून येत आहे.
अजून एक उदाहरण बघूयात. पुण्यात नेट-सेट पीएचडी धारक उत्त्चशिक्षित विद्यार्थी, जे महिन्याला ६ ते ७ हजारात काम करण्यास मजबूर आहेत, रोजगाराच्या मागणीला घेऊन आंदोलन करत आहेतः प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात, तासिका तत्त्वावरील काम बंद करावे, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ भरती करावी अशा मागण्या करत आहेत. खरे तर या मागणीला घेऊन अनेक वर्षांपासून आंदोलन होत आले आहे. या प्रश्नाने सर्वजातीय विद्यार्थी ग्रस्त आहेत. अशाच प्रकारची आंदोलने इतर अनेक राज्यात झाली आहेत. एमपीएससी च्या विद्यार्थ्यांची असंख्य आंदोलने, शिक्षकभरतीची अनेक राज्यातील आंदोलने, अग्नीवीर योजनेविरोधातील आंदोलने, रेल्वेभरतीचे आंदोलन, अशा अनेक आंदोलनांतून दिसून येते की बेरोजगारीविरोधात देशात राजकीय वातावरण तापत आहे. नुकतेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोर जात शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सरकारी कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला, परंतु कंत्राटीकरण मात्र थांबलेले नाही.
अशी असंख्य उदाहरणे आहेत. परंतु आज जातीय अस्मितांचे आरक्षणाचे आंदोलन या सर्व लक्ष्यांच्या विरोधात काम करत आहे. आरक्षण ही गरिवी हटावची योजना नाही. ते प्रतिनिधित्व आहे असे छगन भुजबळ पुन्हा एकदा ओरडले. आरक्षणाचे पारंपारिक समर्थक आज ही घोषणा सतत करत आहेत. परंतु गरिबी हटावची, म्हणजेच पर्यायाने सर्वांना रोजगाराची योजना काय आहे यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही! कोणत्याही जातीतील अत्यल्प युवकांना संधी मिळाल्याने त्या जातीतील इतर कामगार-कष्टकऱ्यांचे कोणते हित साध्य होते ह्या प्रश्नाला झाकोळण्याचे काम अस्मितावादी राजकारण करते. ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी सारखे नारे देत आज सरकारी पदांमध्ये, म्हणजेच राज्यसत्तेमध्ये व पर्यायाने लुटीमध्ये प्रत्येक जातीतील मूठभरांना संधी देण्याचा नारा जोर धरत आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या फॅसिस्ट राजकारणाला पर्याय म्हणून काँग्रेससारखे भांडवली पक्षही या अस्मितावादी नाऱ्याला उचलत आहेत! उदारीकरणाचे वारे १९९१ मध्ये आणल्यापासून वाढलेल्या प्रचंड विषमता आणि बेरोजगारीच्या स्थितीत तर मुद्दा भरकटवण्याकरिता जातीय ध्रुवीकरण हे राजकारणाचे एक अत्यंत महत्त्वाचे हत्यार आहे याची सर्व प्रमुख भांडवली पक्षांना जाणीव आहे, आणि म्हणूनच ही सर्वपक्षीय एकता निरर्थक मागण्यांच्या उभी राहून एकीकडे जनतेला भरकटवत आहे, भडकावत आहे आणि दुसरीकडे मागण्या मान्य झाल्या तरी तोंडाला पाने पुसण्याचेच उद्दिष्टही साध्य करणार आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




