मंडलनामा क्रमशः24.विलास सोनवणेंची भेट

मंडलनामा क्रमशः24.विलास सोनवणेंची भेट
राष्ट्रीय पातळीवर संघटना स्थापन झाल्यानंतर माझे दौरे वाढले. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर मुस्लिमांमधील ओबीसींना लाभ मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याची माझी धडपड होती. त्यासाठी मी जीवाचे रान करत होतो. याच टप्प्यावर १९९४ नंतर विलास सोनवणे यांची भेट झाली. ते कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. त्यांना मुस्लिम ओबीसींसाठी काम करण्याची इच्छा होती. जनार्दन पाटील व कपिल पाटील या दोघांनी त्यांची व माझी गाठभेट घालून दिली. सुरुवातीच्या ओळखीपाळखीनंतर आमच्यात चांगलीच घसट निर्माण झाली. विलास सोनवणे यांना सोबत घेऊन मुस्लिम ओबीसी चळवळीचे काम करावे, असे दोन्ही पाटलांनी सुचवले. मला पण अभ्यासू जोडीदाराची गरज होतीच. विलास सोनवणे यांना राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ही पदे देण्यात आली.
विलास सोनवणे अत्यंत बुद्धिमान व कुशल संघटक होते. मांडणी अभ्यासू व परखड होती. कम्युनिस्ट चळवळीत जडणघडण झाल्याने सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वर्ग, जात, धर्म याचा पक्का अभ्यास होता. राज्याच्या विविध भागातील विविध पुरोगामी चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संपर्क होता. आम्ही दोघांनी मिळून राज्यभर दौरे सुरू केले. अत्यंत लाघवी व सोप्या भाषेत ते संवाद साधत. यापूर्वी संघटनेचे काम करताना माझा वैयक्तिक गाठीभेटीवर जास्त भर असायचा. लहान-लहान बैठकांमधून अनेक जण वाद घालत. त्यांच्या मते, मी मुस्लिम धर्मात जाती निर्माण करण्यासाठी निघालो होतो व इस्लाममध्ये जाती नव्हत्या. मुळात माझी भूमिका ‘कास्ट’ नव्हे तर ‘क्लास’ (जात नव्हे तर व्यवासायिक वर्ग), अशी होती. पण मी मुसलमान व ऐकणारेही मुसलमान. त्यामुळे ते माझ्याशी वाद घालत. अनेकदा मला गावातील मुस्लिम मोहल्ल्यात बंदी घालण्यात आली. मला जाहीरपणे काफीर संबोधले जायचे.
या काळात विलास सोनवणे यांचे संघटनेत सक्रिय होणे अत्यंत उपयोगी ठरले. जेथे मला प्रवेशच बंद होता, तेथे सोनवणे कुशल संवाद साधून प्रवेश मिळवून देत. तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या, अशी गळ घालत, मुद्दे मांडत. एकदा संवाद सुरू झाला की, मत मतांतरे होतात. आधी संवाद फार होतच नव्हता, त्यामुळे वाद विवाद होत. आता मत मतांतरे सुरू झाली. मुस्लिमांसोबत संवाद सुरू झाला. आमच्या कामाचा झपाटा वाढला. बैठका, चर्चा, संवाद, गाठीभेटी, परिषदा, परिसंवाद होऊ लागले. त्या काळात महाराष्ट्रात आम्ही सुमारे तीन हजार बैठका घेतल्या. त्यामुळे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




