सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 33

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 33
कवडे पांडुरंग बाळाजी (११ मार्च १९०१ – १७ डिसेंबर १९७८)
सत्यशोधक पांडुरंग बाळाजी कवडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील, निफाड तालुक्यातील विंचूर या गावी ११ मार्च १९०१ रोजी झाला, मुख्यतः पांडुरंग बाळाजी कवडे यांचे मूळ गाव मौजे धांदरफळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर हे असून त्यांचे वंशज पुढे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कायम वास्तव्य करून राहिले म्हणून पांडुरंग बाळाजी कवडे हे नांदगावचे सत्यशोधक म्हणून सत्यशोधक चळवळीत ओळखले गेले. सत्यशोधक
पांडुरंग बाळाजी कवडे यांचे मराठी सातवी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेले होते. वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मराठी सातवी परीक्षा पास झाल्यावर उपजीविकेसाठी त्यांनी नांदगाव तहसील कार्यालयात कारकून म्हणून उमेदवारीस प्रारंभ केला. दरम्यान, ६ मे १९२२ रोजी राजवीं शाहू महाराजांचे मुंबई येथे अकस्मात निधन झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या अकस्मात निधनामुळे नांदगाव तहसीलमध्ये एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत नांदगाव तहसीलदारांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल अप्रासंगिक अपशब्द वापरले. प्रस्तुत अप्रासंगिक अवमानकारक अपशब्द बिनीचे सत्यशोधक पांडुरंग कवडे यांना खटकले. जिव्हारी लागले. त्यांनी कुठलाही विचार न करता ताडकन उठून तहसीलदारांच्या श्रीमुखात भडकावली, इतकेच नव्हे, तर तत्क्षणी नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्यासारखे अनेक तहसीलदार तयार करून दाखवीन अशी घोषणा करत विचारपीठ सोडले. पुढे नाशिक जिल्ह्याचा सत्यशोधक चळवळीचा इतिहास सांगतो की, पांडुरंग कवडे यांनी लगोलग नांदगाव येथे दलित-बहुजन विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह सुरू केले. अनेक खस्ता खाऊन त्यांनी हे वसतिगृह चालू ठेवले आणि खरोखरच अनेक सत्यशोधक तहसीलदार ‘शिवाजी मराठा बोर्डिंग’ या वसतिगृहातून तयार झाले. पांडुरंग कवडे हे नांदगाव परिसरात सातत्याने सत्यशोधक चळवळीचे कार्य करत राहिले. आपले शब्द वाऱ्यावर विरून जाऊ नयेत म्हणून त्यांनी
सत्यशोधक वाङ्मयाची निर्मिती केली. ती पुढीलप्रमाणे:
१. संत गाडगे महाराज यांचे चरित्र (इ. स. १९३९), २. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे चरित्र (इ. स.१९५२), ३. महात्मा जोतिराव फुले यांचे चरित्र (इ.स. १९६८), ४. श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र (इ. स. १९७४), ५. श्री संत साईमहाराज यांचे चरित्र (इ. स. १९५६)
अशा या मराठी सातवी पास असलेल्या आणि व्यवसायाने शेतकरी असलेल्या सत्यशोधकी लेखक-विचारवंताचे १७ डिसेंबर १९७८ रोजी नांदगाव येथे निधन झाले.
कळसाईत
राजेंद्र महादेव
(जन्म-११-१-१९६५)
राजेंद्र महादेव कळसाईत हे पिंपरी मेघे, वर्धा येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म ११ जानेवारी १९६५ रोजी झाला. से उच्चविद्याविभूषित सत्यशोधक असून इ.स. १९८८ पासून सत्यशोधक चळवळीत सहभागी आहेत. वर्धा आणि नागपूर येथे संपन्न झालेल्या सत्यशोधक अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.
कळंबे कृष्णाजी मारुतराव
प्रतिभासंपन्न लेखक, फाँ वक्ता, संपादक, कराड गावचे (जि. सातारा) क्रांतिकारक, सत्यशोधक कार्यकर्ते कृष्णाजी मारुतराव ऊर्फ भाऊसाहेब कळंबे.. भाऊसाहेब कळंबे यांनी प्रारंभी प्राथमिक शिक्षकाचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




