मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 36

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 36
निर्माण झालेले शेतीक्षेत्रातील पेच, शिक्षणाचे व रोजगाराचे प्रश्न हे विधिमंडळाच्या कायद्या
द्वारे सोडवावे लागतील, त्यासाठी कल्याणकारी राज्याची व्याप्ती आणखी वाढवावी लागेल. मराठा समाजातील एक मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, याबाबत
कोणाचे दुमत नाही. सुमारे तीन दशकांपासून सुरू असलेल्या आरक्षणाच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एका निर्णायक टप्प्यावर आणले आहे. हा निर्णय स्वीकारत काही वेगळ्या पर्यायांसाठी दबावगट निर्माण करणेच समकालीन परिस्थितीत प्रासंगिक ठरेल. मराठा अभिजनांनी, मराठा संघटनांनी मराठा तरुणांना केवळ आशेवर न ठेवता त्यांना आर्थिक कार्यक्रम आखून देण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि घटनात्मक चौकट यांचा आदर ठेवत राज्यसंस्थेला, राजकीय अभिजनांना हा पेच कल्याणकारी राज्याच्या चौकटीत सोडवावा लागेल. त्यासाठी कल्याणकारी धोरणांची आणि त्याच्या अंमलबजावणीची व्याप्तीही वाढवावी लागेल आणि कल्याणकारी चौकट विस्तारताना त्यातून आश्रित आश्रयदाता संबंध आणखी घट्ट होणार नाहीत आणि योजनांतून गरीब गरजू कुटुंब वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी लागेल, तसेच त्या चौकटीतून समग्र विकासात्त्या टप्प्यांपर्यंत जाण्यासाठी त्या दिशेने कृतीतून प्रयत्नशील व्हावे लागेल. कल्याणकारी चौकट विस्तारण्यासंदर्भातील उदाहरणे पाहू. मराठा क्रांती
मूक मोर्चानंतर मराठा तरुणांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून सारथी’ संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेच्या योजनांचा लाभ प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गाला, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अधिक होताना दिसतोय. परंतु अद्यापही सारथी संस्थांच्या विविध योजना, शिष्यवृत्ती यांची माहिती मराठवाड्यात मिळत नाही. सारथीतील योजनांची व्याप्ती वाढवणे, जिल्हानिहाय केंद्र सुरू करणे, संस्थेला पुरेशी स्वायतत्ता देणे, अधिछात्रवृत्तीची संख्या वाढवणे आवश्यक आहे. अधिछात्रवृत्ती सहा महिन्यांऐवजी दर महिन्यास मिळावी अशी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य मराठा कुटुंबाची अडचण ही मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक शिक्षणासंदर्भात येत असते. अशा शिक्षणासंदर्भात मदतीची सारथीत तरतूद नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकरी, इतर लहान-सहान व्यावसायिक, वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची मुले-मुली लातूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे या शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्या १२ वी
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
७६
पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च पालक कसेतरी भागवतात पण मेडिकल, इंजिनिअरिंग, इतर व्यावसायिक कोर्स, उच्च शिक्षणाचा खर्च त्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे. मराठवाड्यातून डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागातील पालकांना मेडिकल कॉलेजची फिस भरणे परवडत नाही. त्यामुळे शासकीय अनुदानिक प्रवेशाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे. शिवाय
समारोप
मराठा आरक्षण आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचल्याने २०२४ सालव्या
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनू शकतो.
आरक्षणासंदर्भातील तात्त्वीक मुद्दे, घटनात्मक उद्देश आणि आरक्षणाचे सामाजिक
अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सारथी व अण्णासाहेब पाटील मंडळाचे बजेटही वाढविणे आवश्यक आहे. तसेच शेतीप्रश्न, सिंचन प्रश्न, हमी भावाचे प्रश्न सोडविणे आणि सर्व शासकीय-निमशासकीय विभागातील रिक्त जागा नियमितपणे भरणे आवश्यक आहे. समजा आरक्षण मिळालेच तर त्याच्या अंमलबजावणीसाठी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासन नोकरभरती करणार आहे का?, हा ही प्रश्नच आहे.
निकष इत्यादी मुद्दे समजून घेण्याची आंज कोणाचीही तयारी दिसत नाही. त्यामुळेच भविष्यातील दोन समूहांतील संघर्ष टाळायचा असेल आणि एकूणच महाराष्ट्रीय समाजाची सामाजिक वीण बांधून ठेवायची असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविणे आवश्यक आहे आणि सोबतच जातवार जनगणना प्रारंभ करणेही आवश्यक आहे. आयोग आणि सर्वेक्षणात वेळ न दवडता राज्याने आरक्षणासंदर्भातील विधिमंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणे आवश्यक आहे. याशिवाय मराठा कुणबीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा मराठा विरुद्ध ओबीसी वाद टाळण्यासाठी ओबीसी आरक्षणाची १९ टक्क्यांची मर्यादा वाढवण्याचा एक मार्ग आहे. भविष्यात आरक्षणही मिळेल पण त्यातून काही प्रश्नही निर्माण होणार आहेत.
२० जानेवारी २०२४ पर्यंत ५७,४१,२४१ एवढ्या कुणबी नोंदी सापडल्याचा सरकारचा दावा आहे. पण यातील १९६७ पूर्वीच्या म्हणजे जुन्या नोंदी किती आणि नवीन नोंदी किती हे स्पष्ट नाही. कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे अशांची संख्या किती आहे हे शासनाने स्पष्ट करायला हवे. महत्वाचे
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




