*सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग सहावा

*सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशः भाग सहावा
💐💐💐💐
🟡🟡🟡🟡राहिले. सत्यशोधक** ‘दीनमित्र’ पत्र मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी ५७ वर्षे* सोमठाणे व तरवडी येथून एकहाती चालविले. सतत ५७ वर्षे त्यांनी ‘दीनमित्र’ पत्रात
सत्यशोधक* 💐💐💐💐💐मताचा राबता ठेवला
. हे पत्र बंद पडून आज पन्नास वर्षे होत आहेत. तरीही या पत्राने केलेला सत्यशोधक मताचा पुरस्कार वाखाणण्याजोगा आहे. हे खरे आहे की, हे पत्र खेड्यातून प्रसिद्ध होत होते, त्यामुळे या पत्राला ‘ग्रामीण’पत्र आणि संपादक मुकुंदराव पाटलांना ‘ग्रामीण पत्रकार’ म्हणून हाक मारली जात आहे. हे पत्र खेड्यातून प्रसिद्ध होत होते, तरी सत्यशोधकी मत हृदयाशी कवटाळून हे पत्र प्रसिद्ध होत होते. तेव्हा ‘दीनमित्र’ला ‘सत्यशोधकी आमीण पत्र’ आणि मुकुंदरावांना ‘सत्यशोधकी ग्रामीण पत्रकार’ अशी सत्यशोधकी हाक या पत्राच्या अनुषंगाने मारायला हवी होती. मात्र या संदर्भाने सत्यशोधकी जागर मोठ्या प्रमाणात व्हायला हवा होता, तो झाला नाही.
‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील यांच्या अनुषंगाने एक वाणगीदाखल उदाहरण पाहणे उचित ठरेल. त्याचे असे झाले की, इंग्रजांचे राज्य येऊनही खेड्यात कुळकर्णी पदावरील कुळकर्णी अप्पा खेडुतांचे प्रशासकीय हक्काखाली ग्रामीण कष्टकऱ्यांचे प्रचंड रक्त शोषत असत. हा जुलूम असह्य झाल्याने संपादक मुकुंदराव पाटील यांनी क्रमशः दर बुधवारी ‘दीनमित्र’ पत्रातून कुळकर्णीलीलेचा एक एक अंश काव्यछंदातून प्रसिद्ध केला. हे काव्य जनतेसमोर एकसंघ यावे म्हणून ‘कुळकर्णी लीलामृत’ खंडकाव्य ग्रंथरूपाने १९१३ साली प्रसिद्ध केले. ‘कुळकर्णी लीलामृत’ या ग्रंथावर टीका करताना ‘केसरी’ पत्राने दोन अग्रलेख प्रसिद्ध केले (३०-९-१९१३ व ७-१०-१९१३). या अग्रलेखात वाङ्मयाच्या भाषेच्या अंगाने हे काव्य सरस असून मराठी भाषेचा अलंकार असल्याचे न. चिं. केळकरांनी आरंभीच म्हटले. मात्र, आशयाच्या अंगाने ‘कुळकर्णी लीलामृत’ ब्राह्मणांच्या निंदेने भरलेले असून प्रसंगी या काव्यग्रंथाला तुरूतुरू चालणारा विंचू, दुष्ट लांडगा अशी अनेक दूषणे देऊन या निंदाजनक काव्य प्रसिद्धीमागे राजर्षी शाहू महाराजांचे मार्गदर्शन असणार असेही म्हटले होते. शेवटी ब्राह्मणनिंदेचा हा कवितासंग्रह जप्तीच्या लायकीचा असल्याचे म्हणून अग्रलेखाचा समारोप केला होता.
१९१३ साली या खंडकाव्याची पहिली आवृत्ती कोल्हापूरकर सत्यशोधक विठ्ठल बिराजी ढोणे यांनी प्रसिद्ध केली. दुसऱ्या आवृत्तीचा कालखंड उपलब्ध नाही. तिसरी आवृत्ती १९२० मध्ये आणि चौथी इ. स. २००५ मध्ये गणिझाली. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या चौथ्या आवृत्तीत ‘केसरी’ पत्रातील अग्रलेख परिशिष्ट विभागात जोडले आहेत.
‘केसरी’च्या या ब्राह्मणी अहंकाराने गुरगुरणाऱ्या या अग्रलेखांना दस्तुरखुद्द ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांनी ‘केसरीचा दाह!’ या मथळ्याखाली दोन अग्रलेख लिहून सडेतोड उत्तर दिले होते (१५-१०-१९१३ व २२-१०- १९१३). तसेच या ब्राह्मणी अहंकाराला सासवड, जिल्हा पुणे येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या चौथ्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाचे प्रेरक ज्ञानगिरी बुवा यांनी निबंध लिहून सडेतोड उत्तर दिले होते. मात्र असे असताना या काव्यसंग्रहाचे प्रस्तावनाकार ना. भास्करराव जाधव या काव्यसंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीतही ‘केसरी’च्या अग्रलेखासंदर्भात आणि ‘दीनमित्र’कारांनी दिलेल्या नकट उत्तरासंदर्भात अवाक्षर लिहीत नाहीत. चौथ्या आवृत्तीत तर ‘केसरी’चे अग्रलेख समाविष्ट असून या आवृत्तीचे प्रस्तावनाकार प्रा. डॉ. अशोक एरंडेही वा अनुषंगाने ना. जाधवांनाच वाट विचारत असल्याचे जाणवते.
ना. भास्करराव जाधव आणि डॉ. अशोक एरंडे हे दोघेही प्रस्तावनाकार कडवे सत्यशोधक आहेत यात तिळमात्र शंका नाही. तरीही ‘केसरीचा दाह’ ते उलगडून दाखवू शकले नाहीत. या प्रकरणी दोघेही सत्यशोधक प्रस्तावनाकार कमी पडले. थोडक्यात, या क्रांतिकारी कस्तुरीचा दाह पूर्णतः हे सत्यशोधक दिग्दर्शित करू शकले नाहीत. त्यामुळे साहजिकच सत्यशोधकांचे अंतरंग बांधणीच्या दस्तऐवजाची वानवा राहत आली. त्यामुळे लेखनाच्या प्रसंगी प्रेरणा नीण होत गेल्या.
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




