मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशा भाग 9 प्रथम आपण 340 या कलमाचे स्पष्टीकरण समजूया

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशा भाग 9 प्रथम आपण 340 या कलमाचे स्पष्टीकरण समजूया
राज्य सरकार त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या नोकऱ्यात आरक्षणाची तरतूद करू शकते परंतु त्यासाठी त्यास दोन गोष्टीची पूर्तता करावी लागेल.
२. मागासवर्ग : ती जात वा समूह हा मागासवर्गीय असला पाहिजे आणि मागसवर्गाची चाचपणी करण्यासाठी असलेल्या कलम ३४० नुसार हा मागासवर्ग सामाजिक वशैक्षणिक मागासवर्ग असला पाहिजे किंवा ३४१/३४२ नुसार अनुसूचित जाती/जमातीचा
असला पाहिजे. ३. पर्याप्त प्रतिनिधित्व : त्या जाती वा समूहास पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले नाही असे
राज्याचे मत असले पाहिजे. इंदिरा साहनी केस नी पर्याप्त चा अर्थ लोकसंख्यानिहाय नव्हे तर पुरेसे प्रतिनिधित्व म्हटले आहे. उदाहरणार्थ, एखाद्या राज्यात एखाद्या मागासवर्ग समूहाची लोकसंख्या १० टक्के आहे तर त्यांना १० टक्के जागा राखीव करणे म्हणजे लोकसंख्या निहाय आरक्षण, आता ह्या समूहास फक्त १ किंवा २ टक्के प्रतिनिधित्व आहे तर आपण त्यास पुरेसे प्रतिनिधित्व म्हणू शकत नाही परंतु हा समाज ५ ते ७ टक्के प्रतिनिधित्व स्वबळावर मिळवत असेल तर त्यास पुरेसे प्रतिनिधित्व म्हणता येईल. अर्थातच ही कसोटी तेव्हा लागू होईल जेव्हा तो समूह कसोटी १ मागासवर्ग परिभाषेत पास
झाला असेल तर. ३. राज्याच्या मते : राज्यकर्ते निवडणुकीत एखाद्या जातीची मते घेण्यासाठी; त्या
जातीस आरक्षण यादीत टाकू शकते आणि म्हणूनच आरक्षणासारख्या समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या धोरणाचा राजकीय वापर होऊ नये म्हणून १९९२ ला मंडल केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्रास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्यास राज्य मागासवर्गीय आयोग कायद्याद्वारे स्थापण्याचे आदेश दिले; त्यामुळे आता या आयोगान मागासवर्ग व पर्याप्त प्रतिनिधित्व या मुद्दयास धरून; सर्वेक्षण करून दिलेला रिपोर्ट राज् सरकारला देणे अनिवार्य केले; आणि राज्यकर्त्यांच्या मनमानीस प्रतिबंध घातला.
सर्वसाधारण चर्चेत आपण मराठा समाजास मागासवर्ग म्हणू शकतो का आजच्या घडीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा मराठा आहे. महाराष्ट्राती बरेचसे अनुसूचित जाती/जनजाति आणि मागासवर्गीय जातीचे केंद्रीय सेवेत नोकरी करण नोकरदार जेव्हा मध्यप्रदेश वा राजस्थान राज्यात जातात आणि घर भाड्याने घ्यान झाल्यास ते आपली जात लपवितात आणि आपण मराठा आहो असे सांगतात. ब्राह्म सांगू शकत नाही कारण गळ्यात जानव नाही. त्यांनी आपली खरी जात सांगितली त्यांना भाड्याने घर सुद्धा मिळत नाही. ह्या अर्थाने मराठा जातीचे फार मोठे उप मागासवर्गीय वर्गावर आहेत. मराठा म्हटल्या बरोबर उत्तर भारतीयांच्या डोळ्यास छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि घर भाड्याने मिळते. जरांगे पाटलांनी न सरसकट सर्व मराठ्याना कुणबी दाखले द्या म्हटल्यावर कोकणातील मराठ्यांनी कुन म्हणून आरक्षण घेण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. कारण मराठा ही ओळख सामा श्रेष्ठता दर्शविते आणि ती त्यागण्याची मानसिकता अनेक लोकात नाही; आणि काही वाईट आहे; असे मला ही वाटत नाही. आरक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय ही अवा
टिकवून ठेवणे; खूप काही गौरवास्पद नाही; परंतु मागासवर्गीय लोकांची ती मजबूरी आहे; आणि हे केव्हा पर्यंत तर? समाजात सर्व जातीत समानता निर्माण होईल पर्यंत. आरक्षणाचे मुख्य तत्व समाजात समानता निर्माण करण्याचे आहे; न की फक्त काही नोकऱ्यासाठी चिरकालीन विषमता टिकविणे, हे आपण समजून घेतले पाहिजे, कॉलेजच्या दिवसात मला आठवत. अनेक अनुसूचित जाती / जमातीचे मित्र पीरियडला चाट मारून गुपचाप मागासवर्गीनाच्या शिष्यवृतीचा फार्म भरायला जायचे. परंतु त्यांचे तसे वागणे ही मला आवडायचे नाही. जन्म मागासवर्गीय कुटुंबात झाल्याची लाज कशाला? जरांगे पाटील ह्यांच्या समर्थनार्थ आरक्षण मागणाऱ्या अनेक सार्वजनिक साखळी उपोषण करणारे कार्यकर्ते आपल्या पेंडाल मध्ये फुले आंबेडकरांचा फोटो लावत नाही. मागासवर्गीयांना बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून सर्व प्रथम ब्रिटिश सरकार पुढे आरक्षणाची मागणी करणारे महात्मा फुले, आरक्षण आपल्या राज्यात राबविणारे राजर्षी शाहू महाराज आणि आरक्षणास संवैधानिक आकार देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तिघेच तर आरक्षण धोरणाचे प्रमुख शिल्पकार आहेत. ह्या तिघांचा फोटो पेंडाल मध्ये असलाच पाहिजे. ताकास जावे आणि भांडे का लपवावे? जरांगे पाटील यांनी या तीन महापुरुषांचे फोटो पेंडाल मध्ये लावण्याचा सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिल्या पाहिजेत.
तरी ही थोड्या वेळासाठी कसोटी १ नुसार मराठा समाजास आपण मागासवर्गीय मानून; कसोटी २ कडे वळूया. फडणवीस सरकारने गायकवाड कमिशनच्या शिफारशी दाखविल्या परंतु रीपोर्ट विधानसभेत दिला नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा रिपोर्ट मागितला आणि पर्याप्त प्रतिनिधीत्वाच्या कसोटी बाबत काही महत्वाचे निरीक्षण रिपोर्ट मधीलच आकडेवारी सहित नोंदविले.
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴
२३




