माळी राजकीय संकल्प परिषदे चा ठरावराजकीय हक्काची लढाई आणखी तीव्र करणार

माळी राजकीय संकल्प परिषदे चा ठरावराजकीय हक्काची लढाई आणखी तीव्र करणार
13 जुलै 2024 ऐरोली न्यू मुंबई येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजकीय अधिकार व हक्का चे विचारमंथन झाले माळी हा राजकीय दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे राजकीय दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे सहकार क्षेत्र , प्रशासकीय क्षेत्र ,आर्थिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, यामध्ये मागासलेला आहे महाराष्ट्रात 78 मतदार संघ हे माळी. प्राबल्य मतदारसंघ असून सुद्धा महाराष्ट्रात असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात अजूनही लोकसभा ,राज्यसभा,विधान परिषद, विधानसभा, यामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही .
त्यामुळे माळी समाजामध्ये कमालीची चीड असून महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना माळी समाजाचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली व त्या चर्चेअंती राजकीय नियोजनाचा आराखडा तयार करण्यात माळी राजकीय संकल्प परिषद द्वारा विभाग निहाय,जिल्हा निहाय ,परिषदा आयोजित केल्या जाणार आहे. ज्या ज्या मतदारसंघात माळी प्राबल्य मतदार संघ आहेत त्या त्या मतदारसंघात सुद्धा माळी समाजाचे मेळावे घेतले जाणार आहे
व आपली ताकद महाराष्ट्रामध्ये उभी करण्याच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते कामाला लागण्याचे आव्हान माळी राजकीय संकल्प परिषदेद्वारे करण्यात आले. या पर मा. बापू माळी या परिषदेचे मुख्य सत्यवान भास्कर , सूर्यकांत थोरात ऐरोली, तर प्रमुख अतिथी मा . रोहिदास लोखंडे ,मां. नितीन बनकर, मां.किरण झोडगे मुंबई, मां .अनिल जाधव नाशिक मां.देविका शिंदे, मां.सुरेशजाधव ,मा.के.आर.चौधरी,मा.ना.ना.आल्हाट साहेब ,मा.रामदास डोके, मा.तानाजी शिंदे, मा.सौ शिंदे ,मां.वसंत मगर बुलढाणा, मां.नंदू नागरकर चंद्रपूर, डॉ.जाधव परभणी, एन आय .काळे परभणी, मा.सौ.रजनी चौधरी, मा.मा.अमो मां.राजेंद्र मांदाडे, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले शिक्षण सहा कल्याण , विदर्भ माळी संस्था मुंबई ,श्री शंकर वर्हाडी, श्री कैलास शिंदे, श्री मारुती कुदळे, श्री हनुमंत माळी, श्री सुदाम गाडेकर, श्री महाजन, श्री गोपिनाथ लोखंडे श्री बच्छावजी तसेच सर्व ज्ञात अज्ञात असे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले त्या सर्वांना धन्यवाद.🙏
अशी माहिती अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली




