सोशल

लोकशाहीचा उत्सव आनंदाने धुमधडाक्याने आपणच साजरा करायचा ना!

लोकशाहीचा उत्सव आनंदाने धुमधडाक्याने आपणच साजरा करायचा ना!
आपण आपला हक्क व कर्तव्य विसरतोय का!
आपण सर्व भारतीय फार उत्सव प्रेमी! प्रत्येक सण, उत्सव आपण मोठ्या आनंदाने, धुमधडाक्याने साजरा करतो आणि ह्याच आपल्या उज्वल परंपरे कडे जग मोठ्या कुतूहला बरोबरच आशेने पहात असते. आज जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची एक अभिमानास्पद ओळख आहे. याच लोकशाहीचा उत्सव म्हणजेच सार्वत्रिक निवडणुका! मग हा उत्सव आपण मोठ्या आनंदाने, धुमधडाक्याने साजरा करायलाच हवा ना!
पूर्वीच्या काळापासूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या भारतासारख्या देशातील लोक आपला मतदानाचा हक्क विसरताहेत काय? असा प्रश्न अनेक वेळा पडतो. कारण शासनाने अनेक उपाययोजना करूनही निवडणुकी मधील मतदानाची टक्केवारी ही समाधानकारक वाटणारी नाही! असेच सर्वजण म्हणतात.
भारतीयांना मतदानाचा हक्क असा सहजासहजी मिळालेला नाही. अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, भारतामध्ये सर्व लोकांचे राज्य येऊन लोकशाही नांदण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. पात्र असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा संविधानिक अधिकार आपणास यातूनच मिळालेला आहे. याच लोकशाही मधील एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे सार्वत्रिक निवडणूक! परंतु यातील आपला सक्रिय सहभाग आपण मतदानाचा अधिकार बजावून दाखवण्यास कमी पडतो की काय असे अनेक वेळा वाटते! त्यासाठी प्रत्येक पात्र भारतीय नागरिकांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा आपला अधिकार बजावलाच पाहिजे. कारण मतदान हक्का बरोबर आपले कर्तव्य ही आहे.
जगामध्ये स्त्रियांना तर मतदानाच्या हक्कासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. आपण फार नशीबवान आहोत कारण भारतातील स्त्रियांना स्वातंत्र्यप्राप्ती बरोबरच मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्रातील महिलांना 144 वर्षांनी, तर ब्रिटन मधील महिलांना 100 वर्षानंतर मतदानाचा हक्क मिळाला. परंतु दुर्दैवाने आजही स्वतःला पुरुष सत्ता पद्धतीचे प्रणेता म्हणणाऱ्या घरातील स्त्रिया उंबऱ्या बाहेर येऊन वैचारिकता बाळगत मतदानाचा हक्क बजावत नाहीत.किंबहुना त्यातील अनेकांना हा आपला मोठेपणाच वाटण्याची शक्यता असते! गंमतीचा भाग असा की,भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महिलांनी स्वतःचे नाव न सांगता कुणाची तरी पत्नी, आई, बहीण असे सांगितल्याने 28% महिलांची नावे मतदार यादीतून कमी झालेली होती. कदाचित यापुढील सर्व निवडणुकांमध्ये स्त्रियांना 33% उमेदवारीचा हक्क मिळण्याची शक्यता आहे! अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के महिलांनी मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडायला हवे. त्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण देशाच्या प्रत्येक प्रगतीच्या टप्प्यामध्ये महिलांचा वाटा हा प्रचंड आहे.
इंग्रजांनी भारतीयांना सार्वभौम मताधिकार दिला नव्हता. निवडणुका या मर्यादित स्वरूपात होत्या. त्यात धार्मिक, सामुदायिक व व्यावसायिक बाबींना आधारभूत समजून वर्गीकरण केलेल्या जागांवर उमेदवार उभे केले जात असत. त्यासाठी निवडक लोकांना मतदान करण्याची परवानगी असे.
स्वतंत्र भारतात मात्र आपल्या संविधानाने सर्व मतदार जे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत, त्यांना व्यक्तिगतरीत्या मतदान करण्याचा अधिकार बहाल केला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रभावाखाली, दबावाखाली न येता जात, धर्म, पंथ, आर्थिक स्थिती याचा विचार न करता पसंतीच्या उमेदवारास गुप्त पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. हाच अधिकार आपण आपले कर्तव्य म्हणून बजावायचा तर आहेच, परंतु आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील, परिसरातील, गाव- शहरातील सर्वांनाच मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावण्यासाठी प्रवृत्त करायचे आहे.

आता तर दिव्यांग व 80 वर्षांपुढील सर्व मतदारांना स्वतःच्या घरूनच मतदान करता येईल. त्याचबरोबर शहरी भागातील सोसायटी मध्ये मतदानाचे बूथ असणार आहे. अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदान बूथ ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. देश सेवेत असणारे व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे स्वतःचे मतदान करता येणार आहे. वैद्य मतदार असणाऱ्या अनिवासी भारतीयांनाही 2010 पासून आता मतदान करता येते.

जगामधील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशातील या निवडणुकीच्या या उत्साहामध्ये आपण मतदान केल्यास लोकशाही व्यवस्था टिकेल व बळकट होईल. आपण सरकारने काय केले किंवा काय करायला हवे अशी चर्चा नेहमीच करत असतो. परंतु आपण सर्वांनीच मतदानाद्वारे निवडलेले लोकप्रतिनिधी सरकार स्थापन करायला मदत करतात. योग्य लोकप्रतिनिधींची निवड झाल्यास ते निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाहीची वैधता व विश्वासनीयता मजबूत करतील.ते लोकप्रतिनिधी लोकांची इच्छा व आकांक्षांचे प्रतिबिंब असतात. निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी प्रक्रिया असल्याने ती सामाजिक व राज्य नैतिक समानतेला नेहमीच प्रोत्साहन देत असते. आपण केलेल्या मतदानाद्वारे राष्ट्र विकासात आपले योगदान महत्त्वाचे ठरेल.

देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग व योगदान याच मतदानामुळे दिसेल. आपल्यातील काही लोकांनी मतदान केले नाही तर ठराविक लोकच देशाला प्रभावित करतील व नंतर बोलण्याशिवाय आपल्याजवळ काही राहणार नाही. म्हणूनच मतदानाचा आपला हक्क आपण न विसरता बजावायलाच हवा.आपण करत असलेले मतदान हे आपल्या हक्का बरोबर आपले कर्तव्यही आहे याची जाणीव आता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपण सर्वांना करून दिली पाहिजे. त्यासाठी शंभर टक्के मतदान करण्यास आपण सर्व मतदारांचे आपण प्रबोधन केले पाहिजे. 🦚 प्रशांत वाघमारे 9860786735 (कृपया प्रतिक्रिया कळवा व सर्वांना पुढे पाठवा.)

शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील ज्या महत्वाच्या बातम्या व्हिडिओ असतील ज्याची कुणी दखल घेत नसेल अशा बातम्या व्हिडिओ फोटो पाठवा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button