सोशल

तर एकाही पक्षाला धनगर मतदान करणार नाहीत… संभाजीनगर येथे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

3)..तर एकाही पक्षाला धनगर मतदान करणार नाहीत… संभाजीनगर येथे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण

संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, तर आगामी निवडणुकीत धनगर समाज एकाही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजातर्फे घेण्यात आली. धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्यात येईल.

या आंदोलनात ५०० तरुण उपोषण करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. सकल धनगर समाजातर्फे गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. यावेळी धनगर समाजातील तरुण अभ्यासक, उपोषणकर्ते, कार्यकर्ते उपस्थित होते. धनगरांना एसटी आरक्षण, विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व, कलम ३४२ (१) नुसार राज्यपालांनी ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी, डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा, एसटी आरक्षणाची आठ दिवसांत अंमलबजावणी करावी, आदी ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील धनगरबहुल मतदारसंघातून ‘यशवंत संदेश यात्रा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button