नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते विकास पुरुष भगीरथ पाणीदार नेता छगनरावजी भुजबळ साहेब!

अभिनंदन!… माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या 76 व्या वाढदिवसा निमित्त पंकज दादा भुजबळ यांची विधानपरिषद आमदार म्हणून निवड करून शपथविधी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!..
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा जन्म
१५ ऑक्टोबर, १९४७, ला नाशिक मध्ये झाला आई-वडिलांचे छत्र लवकरच वयाच्या सहाव्या वर्षी हरपले त्यांचा त्यांच्या भावाचा मावशीने सांभाळ केला.
मुंबईतील माटुंगा “व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट” मधून त्यांनी “मेकॅनिकल इंजिनियरिंग” मधील पदविका घेतली. तरुणपणी ते शेती व शेतीवर आधारित भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करत होते. भायखळ्यात पत्रा चाळीमध्ये राहत होते. अतिशय छोटे दुकान होते. पुढे ते दुकान ही भाडेकरू ने बळकावले होते. स्थानिकाच्या मदतीने त्यांना त्या दुकानचे दोन रुपये भाडे येऊ लागले. त्यामधूनच ते पाच-सहा किलोमीटर चालत जाऊन भायखळा मंडईतून भाजीपाला डोक्यावर आणून विकत होते. ते काम अतिशय कष्टाचे होते.
त्यांचे मात्र अगदी सुरुवाती पासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड होती. शिवसेनेची स्थापना 1967 झाली. त्या स्थापनेपासून शिवसेनेत ते काम करत होते.
१९७३ मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले, तर १९८५ मध्ये महापौर झाले. याच काळात ते मुंबईचे महापौर आणि देशातील सर्व महापौरांचे अध्यक्ष बनले. फार मोठी अभिमानाची गोष्ट होती. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा महापालेकेत मुंबईचे महापौर झाले.
मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम. पहात होते
वांद्रे (मुंबई) येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
१९९१ मध्ये केली. आज ती संस्था अतिशय सुंदर देखणी आणि सर्व सोयींनी युक्त, क्रीडांगण, इमारत, नावाजलेली आहे. राजकीय सामाजिक कामाबरोबर, त्यांनी चित्रपटसृष्टी मध्ये सुद्धा नायक हिरो चे काम केले आहे. त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी “मंडल आयोग” आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोकाचे मतभेद झाले. आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी सुरुवातीला कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले. ते राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याच वर्षी राष्ट्रवादीची प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.
१९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवडून आले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री होते. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
१८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३, बांधकाममंत्री, ८ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होते.
भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.
भुजबळ हे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उद्धव ठाकरे सरकार मध्ये अन्न व नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते.
2022 ला अजित दादा पवार यांच्या बरोबर युती, सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री झाले. आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत त्या पदावर आहेत. त्यांनी स्थापन केलेली अखिल भारतीय समता परिषद आणि त्यांचा ओबीसी मधील वाढता प्रभाव पाहून त्यांच्यावर पहिल्यांदा 2003 मध्ये तेलगी घोटाळ्या मध्ये त्यांना मंत्रीपद काढून घरी बसविले. 2004 च्या निवडणुकी मध्ये स्वतंत्र हेलिकॉप्टर देऊन स्टार प्रचारक पुन्हा बनविले. युतीच्या काळामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्यांच्या आरोपाखाली भारतीय जनता पार्टीने 26 महिने तुरुंगात डांबून ठेवले. मेडिकलची सुद्धा अपुरी सोय देण्यात आली. त्यानंतरही 2019 मध्ये पुन्हा आघाडी सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले. 2004 पासून येवला मतदार संघात सलग चार वेळा निवडून विधान सभेवर आले.
आजपर्यंत त्यांचे राजकीय कारकिर्दी मध्ये सामाजिक योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. शिवसेनेत असताना मुंबईमध्ये मराठी माणसावर होणारा अन्याय अत्याचार याविरुद्ध हजारो आंदोलन माननीय भुजबळ साहेब यांनी केले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर एक अनोखे आंदोलन त्यांनी केलेलं होतं. त्यावेळी बेळगाव मध्ये मोठा मोर्चा, मराठी माणसांच्या सभा आंदोलन चालू होती. त्याला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव मध्ये येण्यासाठी बंदी होती. त्यावेळी स्वतःच्या मिशा काढून वेश बदलून गनिमी काव्याने गोवा मार्गे बेळगाव मध्ये शिरकाव केला. आंदोलना मध्ये जाऊन त्या ठिकाणी भाषण ठोकलं पोलिसांना समजल्या नंतर लाठ्या काठ्याही खाल्ल्या, त्या वेळेला हाताला लागलेला मार अजूनही त्यांचा हात वर जात नाही. एक मनापासून आंदोलन, मनापासून काम करणारा, जिद्दी धाडसी, आक्रमक, सुशिक्षित, अभ्यास करून बोलणारा शेर शायरी च्या माध्यमातून कधी हसवणारा आणि कधी रडवणारा कधी धमकावणारा सभा गाजवणारा नेता म्हणून त्यांची आक्रमक नेता अशी ओळख होती.
1991 ला पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे राष्ट्रीय स्मारक स्मृती शताब्दी दिना निमित्त मुख्यमंत्री शरद रावजी पवार साहेब राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्राला अर्पण केले. फुले आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य सावित्रीबाई फुले यांचे चरित्र साहित्य, फुले शाहू आंबेडकर यांच्यासारख्या अनेक संत महापुरुषांचे साहित्य, अनेक भाषेतून लाखो प्रती छापून शासना मार्फत मोठ्या प्रमाणात नाममात्र दरात प्रकाशित केले. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव फुले नायगाव सावित्रीबाई फुले स्मारक, सावित्रीबाई फुले अध्यापिका शिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले चित्ररूप सृष्टी, 4 ऑगस्ट 2024 रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण ला 729 वर्षानंतर पहिल्यांदा “अ” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. अरण विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली. पुण्यातील देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आंतरराष्ट्रीय स्मारका साठी 200 कोटी रुपयाचा निधी राखून ठेवला, भूमिपूजन केले
175 वर्षानंतर या पहिल्या मुलींच्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन भूमिपूजन केले. दिल्ली संसद भवनाच्या पटांगणात पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा बसविण्या मध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्ली मधील महाराष्ट्र सदन एक देखणी सुबक इमारत. त्यामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे उभारण्याचं महत्त्वाचं काम छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या कारकिर्दी मध्ये झालं. त्यामुळेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्या सरकारने आरोप केले त्या सरकारने पुन्हा त्यांच्याच मंत्रिमंडळा मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना घेतले यावरून भ्रष्टाचार नव्हता हे सिद्ध होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सर्व महाराष्ट्रातील शासकीय निवास विस्तारी करण सुशोभी करण फर्निचर अतिशय सुंदर व्यवस्था त्यांनी केलेली होती. बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्रातील डबघाईला आलेली अर्थव्यवस्था त्या परिस्थिती मध्ये बांधा वापरा हस्तांतरण करा या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व रस्ते चकाचकीत केले होते. गृहमंत्री असताना कायदा व सुव्यवस्था चोखपणे बजावली होती. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दी मध्ये अनेक रेशन कार्डांची कागदपत्र मर्यादा, अटी शिथिल करून सर्व थरातील लोकांना रेशन कार्ड देऊन जास्तीत जास्त प्रमाणात मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. आजही तो चालू आहे याबाबतीत सामान्यातील सामान्य माणसांची सुद्धा तक्रार त्यांनी निवारण करण्याचा प्रयत्न कसोशिने केलेला आहे. 1992 पासून आज पर्यंत त्यांनी ओबीसी समाजाच्या सर्व अडीअडचणी आरक्षणावर येणारी गदा, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, खुनी हल्ले, अंबड हिंगोली इंदापूर बीड पंढरपूर सांगली वर्धा भिवंडी अहिल्यानगर अहमदनगर येथे लाखोचे एल्गार मेळावे घेऊन जरांगेच्या आक्रमणाला चोख उत्तर दिले. वरचेवर समर्थपणे मंत्रिमंडळात अधिवेशनात ओबीसीची बाजू मांडून आरक्षणाचे संरक्षण केले आहे 2004 साली ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तेलगीच्या आरोपांमध्ये घरी बसल्यानंतर 2004 साली माननीय सुशील कुमार शिंदे सरकार यांच्या काळातच कुणबी – मराठा, मराठा – कुणबी एकच असल्याचा बेकायदेशीर जीआर निघाला आणि
आज पर्यंत त्याची सजा ओबीसी समाज भोगत आहे. त्या जीआर चा आधार घेऊन जरांगे यांनी महाराष्ट्रा मध्ये घातलेले थैमान ओबीसी वर झालेले, होत असलेले हल्ले, अन्याय केलेल्या बेकायदेशीर मागण्या थांबविण्याचे काम एकमेव छगनरावजी भुजबळ साहेब यांनी केलेले आहे. अन्यथा ओबीसी आज नेस्तनाबूद झाला असता. अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा बिहार मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश दिल्ली या ठिकाणी ओबीसी समाजाचे लाखोचे मेळावे घेऊन जनजागृती केली. त्याचाच परिणाम म्हणून अनेक राज्यांमध्ये ओबीसीचे आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री महामंडळाचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. आत्ताच हरियाणा मध्ये बलाढ्य डॉमिनेट शासनकर्ती अडमुठ जमात जाट यांना हरवून ओबीसी ने आपला दबदबा कायम केला आणि नायब सिंग सैनी हे आता मुख्यमंत्री झाले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अनेक सोयी सुविधा, गोदावरी नदीची स्वच्छता, त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्र याचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. नाशिक शहरामध्ये भुजबळ नॉलेज सिटी निर्माण करून सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय केलेली आहे. मोठे मोठे लांब लांब उड्डाणपूल अनेक महत्त्वाची काम केलेली आहेत.
ऑक्टोबर 2024 रोजी आत्ताच नाशिक हायवे रोडवर मुंबई नाक्याजवळ महाराष्ट्रातील सर्वात मोठा “सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले” यांचा ब्राॅंझ धातूचा अर्ध-पुतळा बनवून अतिशय सुंदर सुबक आणि नेत्र दीपक स्मारक बनविले आहे. त्याचबरोबर येवल्यामध्ये अतिशय सुंदर प्रेक्षणीय शिवसृष्टी बनवण्यात आली आहे. चार वेळा निवडून आलेल्या येवला मतदारसंघां मध्ये . अनेक विकासाची कामे केली आहेत.
शंभर किलोमीटर लांब कालवा असलेला मांजरपाडा प्रकल्प या कालव्याच्या प्रवासामध्ये 11 किलोमीटरचा डोंगर बोगदा अनेक नद्या नाले ओढे गाव वस्त्या पार करण्यासाठी पूल डोंगरदऱ्यातून अनेक अडचणीतून हा कालवा पूर्ण झाल्याचा आनंद येवला लासलगाव मतदार संघात आणि भुजबळ साहेबाचा मनाला झाला येवल्यामध्ये शासकीय संकुल भक्तनिवास राम ग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा ज्या ऐतिहासिक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली त्या ठिकाणी 38 गावाचा पिण्याच्या पाणी प्रकल्प योजना पूर्णत्वास गेल्या
त्यामध्ये डोणगाव पाणी प्रकल्प प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नदीचे समुद्राकडे वाहून जाणारे पाणी डोंगरातून बोगदा काढून दुष्काळी येवला मतदारसंघां मध्ये आणले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे शेतकऱ्याचे काम छगनरावजी भुजबळ साहेब या पाणीदार नेत्यांनी केलेले आहे. म्हणून त्यांना आधुनिक युगाचे भगीरथ असेही म्हटले जाते
पाणी तोच नेता आणू शकतो
ज्याच्या अंगात पाणी असते
त्याच्या घरात पाणी
त्याच्या दारात पाणी
त्याच्या शेतात पाणी
त्याच्या गावात पाणी
त्याच्या मतदार संघात पाणी पाणीच पाणी आणल
पाणीदार नेता छगनरावजी भुजबळ साहेब
यांच्या 76 व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
सत्यशोधक शंकरराव लिंगे
राजकारणाचा गंधही नसणाऱ्या साध्या भोळ्या साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या गृहिणी मीनाताई भुजबळ साहेब यांचा विवाह 24 मे 1970 साली झाला होता त्यांचे भाऊ समीर यांचे वडील वारले आहेत पुतण्या समीर आणि मुलगा पंकज या दोघांच्या पत्नी आणि त्यांची मुलं मुली सर्व आनंदी आणि एकत्रित आहेत दोन्ही सुना सुद्धा व्यवस्थितपणे शिक्षण संस्थेचे कामकाज इतर उद्योग व्यवसायाचे कामकाज पहात आहेत समीर भुजबळ साहेब ही नाशिक मधून लोकसभेवर निवडून गेलेले आहेत पंकज दादा भुजबळ ही विधानसभेवर निवडून गेलेले आहेत दोघेही राजकारण उद्योग व्यवसाय व्यवस्थित हाताळत आहेत याचा सर्वांना आनंद वाटत
आहे
दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचा 76 वा वाढदिवस आहे. याच वाढदिवसाची जणू भेटच म्हणून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनी खुशखबर दिलेले आहे पंकज दादा भुजबळ यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करून शपथविधी पार पाडलेला आहे असा हा दुग्ध शर्करा योग आहे याचा डबल द्विगुणित आनंद भुजबळ प्रेमी यांना झाला आहे. अशीच राजकारणात भुजबळ साहेब आणि त्यांच्या उद्योग व्यवसायांची कुटुंबीयांची दीनदुग्नि रात चौगुनी प्रगती व्हावी. भुजबळ साहेबांना दीर्घायुष्य लाभावे. हीच सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले सर्व महा पुरुषांच्या चरणी व निर्मिकास प्रार्थना करतो भुजबळ साहेब महारष्ट्राचे
मुख्यमंत्री व्हावेत त्यांच्या हातून ओबीसी चे तिसरे शेडूल लागू होऊन मंडल आयोगाची पूर्ण अंमल बजावणी व्हावी. ओबीसी अरक्षाणा मधील होत असलेली प्रस्थापित मराठ्यांची घुस खोरी थांबावी अनेक रंजले गांजले यांचे प्रश्न त्यांच्या हातून सुटावेत. हीच निर्मिकाची इच्छा आहे असे मला वाटते म्हणून छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त पंकज दादा भुजबळ आमदार झाल्याबद्दल यांना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो
ओबीसी नेते राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन सत्यशोधक शंकरराव लिंगे
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




